Filmfare Awards 2022 : ऋतुराज वानखेडेला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जयंतीची ‘फिल्मफेअर’वर शिक्कामोर्तब
Filmfare Awards 2022 : ऋतुराज वानखेडेला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जयंतीची ‘फिल्मफेअर’वर शिक्कामोर्तब
जयंती सिनेमामध्ये 'संत्या'च्या मुख्य भूमिकेत असलेला ऋतुराज वानखेडे हा सर्वोकृष्ट अभिनेता (पदार्पण) या पुरस्काराने सन्मानित झाला आहे.मुंबई : लॉकडाऊननंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ‘जयंती’ (Jayanti Movie) प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून गेला. सदर सिनेमा चित्रपटगृहात तब्बल १० आठवडे चालला. सिनेमाचा एकंदर विषय, गाणी तसेच अभिनय या बळावर प्रेक्षकवर्ग या सिनेमाकडे खेचला गेला. रसिक प्रेक्षकांसोबतच जयंतीने समीक्षकांचीदेखील मने जिंकली आणि याचाच परिणाम म्हणून यंदाच्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये (Filmfare Awards 2022) जयंतीचा समावेश झाला. सिनेमामध्ये “संत्या”च्या मुख्य भूमिकेत असलेला ऋतुराज वानखेडे (Rituraj Wankhede) हा सर्वोकृष्ट अभिनेता (पदार्पण) (Best Actor-Debut) या पुरस्काराने सन्मानित झाला आहे.
कोरोनामुळे मागील २ वर्ष रखडलेले काही मानाचे पुरस्कार सोहळे यंदा पार पडले. यात सर्वात प्रतिष्ठित असलेला “मराठी फिल्मफेअर पुरस्कार” हा सोहळा हल्लीच पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार मंडळींनी यावेळी हजेरी लावली होती. जयंती सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कारांची 5 नामांकने मिळाली होती त्यातील पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ऋतुराजला मिळाला असून त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जयंती सिनेमाला हा पहिलाच पुरस्कार प्रदान झाल्या कारणाने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ऋतुराज वानखेडे हा नागपूर स्थित अभिनेता असून त्याने अनेक नाटकं गाजवली आहे परंतु, जयंती हा त्याचा पहिलाच चित्रपट असल्या कारणाने त्याला या चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याने अभिनय आणि पर्सनॅलिटीवर विषेश लक्ष दिले होते आणि यात तो यशस्वीदेखील झाला. लोकांनी “संत्या” हे कॅरेक्टर अक्षरशः डोक्यावर घेतले. याचीच पोचपावती म्हणून त्याला यंदाचा प्रतिष्ठित ‘मराठी फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाला.साभार टीव्ही९