अंगोला मध्ये भारतीयांनी गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा केला

CRIME BORDER | 13 September 2022 04:00 PM

Angola: सातासमुद्रापलीकडे आपल्या देशातील काही बंधू-भगिनी नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत परंतु ते आपले संस्कृती अजूनही विसरलेले नाही .अंगोला देशामध्ये आपले काही भारतीय आहेत त्यांनी आपली संस्कृती जतन करण्याचा त्यांच्यापरीने प्रयत्न केला आहे त्यांनी या वर्षी प्रथमच गणपती बाप्पांना वाजत-गाजत आणले होते तर यावर्षी सुद्धा त्यांनी गुढीपाडवा हा सण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दिले.

गुढीपाडव्याचे काही क्षण चित्र पाठवले आहेत मयुर शिर्के यांनी.


 

information of gudi padwa in marathi गुढीपाडवा का साजरा केला जातो?  

गुढी पाडवा (gudi padwa) हा वसंत ऋतू काळात साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे, जो मराठी आणि कोकणी भाषिकांसाठी पारंपारिक नवीन वर्षाचा उत्सव आहे. चंद्र-हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाच्या सुरूवातीस चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र गोवा आणि काही इतर राज्यात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. 

 

गुढीपाडव्याची काही इतर नावे,गुढीपाडवा कसा साजरा करावा ‘पूजा-विधी’,गुढीपाडव्याला केले जाणारे खाद्यपदार्थ,सांस्कृृतिक आख्यायिका,गुढीपाडव्याचा इतिहास,सातवाहन,गुढीपाडव्याच्या सुरुवात,संवत्सर,शालिवाहन शक,दोन गुढीपाडवा तेही एकाच वर्षी

 

गुढीपाडव्याची काही इतर नावे

गुढीपाडवा हा सण काही इतर नावाने सुद्धा साजरा केला जातो जसे की..पाडवा

पाडवो

पाड्ड्वा

पाड्ड्वो

पाडयो- सौसार पाडवो, सौसार पाडयो- कोंकणी

पोडिया, युगादि- कन्नड़

पद्यमी- तेलगू

चेटी चंद- सिंधी समाज

वरील काही नावे ही संस्कृत शब्द प्रतिपदा (प्रतिपाद) आणि संवत्सर या शब्दांशी साधर्म्य असणारी आहेत.

 

गुढीपाडवा कसा साजरा करावा ‘पूजा-विधी’

गुढी पाडवा (gudi padwa) या सणाला आपल्या घराच्या दारासमोरील उजव्या बाजूला उंच गुढी उभारली जाते. Gudi Padwa Puja Vidhi Marathi उत्साहात मनोभावे गुढीची विधिवत पूजा केल्या जाते ती पुढील प्रमाणे..

 

गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पहाटे लवकर उठावे.

लवकर उठून घर आणि अंगण (आवार) स्वच्छ झाडून घ्यावे.

सर्व कामे उरकून स्वच्छ आंघोळ करावी.

पारंपरिक स्वच्छ पोशाख परिधान करावा.

दारासमोर पूजास्थळी स्वस्तिक चिन्ह काढावे.

यांनतर पाटावर गंध, फुले, वाहावे.

बांबूची काठी स्वच्छ करून त्यावर गुढी उभारायला घ्यावी.

गुढीच्या टोकावर कडूलिंबाची पाने व आंब्याची माळ लावावी.

त्यांनतर गुढीच्या टोकावर रेशमी कापड बांधावे.

तांब्याचा किंवा चांदीचा कलश/लोटा स्वछ करून घ्यावा.

त्यावर स्वस्तिक काढून पाच टिळे लावावे.

कलश काठीच्या टोकावर अडकावावा.

देवाचं नामःस्मरण करून साखरेची माळ गुढीवर लावावी.

गुढी किंचित झुकलेल्या अवस्थेत उभी करावी.

याशिवाय नववर्षयाच्या स्वागतासाठी ढोल ताश्यांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने लेझीम खेळत प्रभात फेरी शोभायात्रा काढावी. संपूर्ण परिसर चैतन्याने आनंदून सोडावा.

 

21 सकारात्मक विचार – जे बनवतील तुम्हाला आयुष्यात 100% यशस्वी

गुढीपाडव्याला केले जाणारे खाद्यपदार्थ

महाराष्ट्रीयन जेवणामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी खास बेत असतो. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याला काही खास महाराष्ट्रीन खाद्यपदार्थ आवर्जून केले जातात. गुढी पाडवा (gudi padwa) साजरा करतांना सुगरणींचा उत्साह ओसंडून वाहट असतो, विविध खाद्यपदार्थांची अगदी रेलचेल असते. तर चला जाणून घेऊया गुढीपाडव्याला बनवले जाणारे खास महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ.

 

Gudi Padwa Special Recipes in Marathi

पुरणपोळी

बटाट्याची भाजी

पुरी

वरण-भात

खीर

घाटलं

श्रीखंड

खोबऱ्याची चटणी

लोणचं

पापड

कुरडया

भजी

रायगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी तुम्हाला या १० गोष्टी माहित असणे आवश्यक आहे

सांस्कृृतिक आख्यायिका

प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण याचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला अशी मान्यता आहे.

ब्रम्हदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असे सुद्धा सांगितले जाते.

शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला असेही म्हटले जाते.

गुढीपाडव्याचा इतिहास

प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळ उभारणी सातवाहन काळात झाली.

 

“तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन” अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली. पुर्वी रट्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले.

देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढी पाडवा (gudi padwa) हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो.

 

गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…नवीन संवत्सर सुरु करुन यादगार बनवले. आजही आपण गुढ्या उभारून गुढी पाडवा (gudi padwa) हा विजयोत्सव साजरा करत असतो.

 

सातवाहन

आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.

 

तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपुर्वी सातवाहन घराण्यातील लोक अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. पुढे काण्व आले आणि नंतर स्वतंत्र राज्य स्थापन केली जी पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही.

 

मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे.

 

World’s No.1 Richest Man Elon Musk  कोण आहेत?

हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. हा मुळचा पशुपालक समाज. महाराष्ट्र प्राचीन काळापासुन अपवाद वगळता निमपावसाळी प्रदेश असल्याने येथे मेंढपाळी हाच मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे त्याच समाजातुन राजे निर्माण होणे स्वाभाविक होते. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे.

 

औंड्र समाज हा पुंड्रांसोबत दक्षीणेत पुरातन काळापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही “आंदर मावळ” असे म्हटले जाते. “आंदर मावळ” हे नांव आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा.

 

सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. सातवाहन हे सहिष्णू होते. पांचरात्र या अवैदिक संप्रदायाशी निष्ठा ठेवत त्यांनी बौद्ध लेण्यांना उदार राजाश्रय दिला तसेच अनेक यज्ञही करवून घेत वैदिकांनाही दानदक्षीणा दिल्या.सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता.

 

भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत.केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची “गाथा सप्तशती”, गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या.

 

हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत तत्कालीन मोकळ्या ढाकळ्या समाजाचे प्रतिबिंब पडले आहे. नेक स्त्रीयांच्या काव्य रचना या काव्यग्रंथात सामाविष्ट केलेल्या आहेत. सातवाहन घराण्यात महिलांचे स्थान किती उच्च दर्जाचे होते हे नागणिका, बलश्री सारख्या किर्तीवंत राजनिपूण महिलांवरुनही दिसून येते.एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते.

 

गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती.साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले.

 

इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला.

 

महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला.

 

‘गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही. शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले.

 

गुढीपाडव्याच्या सुरुवात

नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्राबद्दक्ल अभिमानाने नोंदवले गेले… “खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस”एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले.

 

पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही. नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा (gudi padwa) होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढी पाडवा (gudi padwa). अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.


 

संवत्सर

या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. ‘तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन’ अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.

 

आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मपुराणात व व्रतराजात येते.कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

 

प्राचीन काळी अगदी एखाद्या घरातील आनंदवार्ताही घोषित करण्यासाठी गुढ्या उभारल्या जात. हा तर एक जनतेच्व्हा स्वातंत्र्योत्सव होता त्यामुळे सर्वांनीच गुढ्या उभारणे स्वाभाविक होते आणि तीच पुढे परंपरा कायम झाली. हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 

शालिवाहन शक

दुसरे महत्वाचे असे कि “शालिवाहन शक” असा मुळात शब्दच नाही. या नांवाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील ‘सालाहन’ असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले.

 

सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही “सालाहन” अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. परंतू संस्कृतीकरणाच्या नादात सालाहनचे “शालिवाहन” केले गेले व शालिवाहन नांवाचा कोणताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.

 

खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले.

 

नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिळाला तो आपण गुढी पाडवा (gudi padwa) म्हनून साजरा करतो.

 

जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढी पाडवा (gudi padwa) साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे.. पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. त्या इतिहासाला आता जीवंत करून महाराष्ट्राच्या संस्थापकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मानवंदना देणे आपले कर्तव्य ठरते.

 

दोन गुढीपाडवा तेही एकाच वर्षी

साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एकच गुढी पाडवा (gudi padwa) येतो. पण शके 1938 मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.

 

८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढी पाडवा (gudi padwa) आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.

 

लेख - संदीप सावंत