त्याच असं येण अन नजरेनं जीव घेणं ....

माहित नाही का पण आजकाल सारखाच तो स्वप्नात येतो . त्याच असं स्वप्नात येण मनाला अस्वस्थ करून टाकत. त्याच हसण पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत. त्या हास्याने त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज चमकत मन त्याच्या चेहऱ्यात गुंतून जात. हल्ली मनाने त्याला भेटण्याची भलतीच ओढ घेतली आहे. हरप्रकारे समजावून झालं पण दिल है कि मानता नहि ... पुन्हा पुन्हा त्याचाच विचार सुरवातीला वाटलं सारखं सारखं त्याला पाहिल्यामुळे असं होत असावं पण आताशा ते प्रामुख्याने जाणवू लागलय. त्याला भेटण्याची तळमळ मनाला सारखी बोचू लागलीय.
कधी कल्पनेच्या दुनियेत त्याची भेट होते तो असा हाताच्या अंतरावर उभा आहे त्याच माझ्याकडे पाहून हसण माझं भान हरपून टाकत. मी एकटक त्याच्याकडे नुसती पाहतच राहते. पांढरा शुभ्र शर्ट त्याला इतका खुलून दिसत होता कि क्षणभर माझीच दृष्ट तर नाही ना लागणार हा विचार मनात येऊन गेला. चष्म्याआड लपलेले त्याचे डोळे खूपच बोलके होते पाहताक्षणी प्रेमात पाडणारे. त्याला स्पर्श करण्याचा मोह न आवरून पटकन त्याच्या हाताला स्पर्श केला अन सर्रकन अंगावर काटा आला. त्याने मान वर करून पहिल अन बस नजरेला नजर भिडली अन मी माझं अस्तित्व विसरून त्याच्या नजरेत विरून गेले. पुढचे काही क्षण नुसती नजरेची भाषा त्यात मधूनच त्याच मनमुराद हास्य आता ह्या क्षणी जीवच जाईल माझा असं झालेलं. इतक्यात बोलता बोलता त्याने हात हातात घेतला अन सगळं संपल पुढचे काही क्षण तो बोलतोय मी पाहतेय ऐकायला काहीच येत नव्हतं. फक्त त्याचा चेहरा त्याच हास्य आणि तो.
ते स्वप्न रोज पडावं म्हणून त्याच्या आठवणी उशाशी घेऊन झोपते. अन रोज तो भेटायला येतो तोच पांढरा शर्ट घालून गालात हसत. तीच घायाळ नजर काळजाला पार करून गेली अन श्वासा श्वासात उरला फक्त तो. आदी अन अनंतहि तो ....
- स्नेहा शिंदे.