संस्थेची घोडदौड - क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या ,९ व्या वर्धापन दिना निमित्त विविध ठिकाणी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमा चे आयोजन -संस्थेचा लेखाजोखा -
डोंबिवली (मुख्य कार्यालय) : क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन - संस्थापक राजेंद्र वखरे यांनी या सामाजिक संस्थेची स्थापना दि. १४ जून २०१३ रोजी करण्यात आली असून सदर संस्था ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ठाणे जिल्ह्यात विविध शाळांमधून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते त्याचबरोबर आदिवासी ,कातकरी ,वीट भट्टी कामगार यांच्यासाठी वीटभट्टीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध संस्थांना विशेष करून ज्या ठिकाणी अनाथ मुली मुले राहतात तसेच वृद्धाश्रमांना अंध व्यक्तींच्या संस्थांना संस्था साहित्य पुरवीत असते.त्याच बरोबर संस्थेतर्फे समुपदेशन उपक्रम राबविला जातो घरगुती भांडणं सोडवली जातात. घटस्पोट मागणाऱ्या कुटुंबांचा समेट घडवण्याचा प्रयत्न संस्था करते.वृक्ष लागवड व संवर्धन ,ब्लँकेट वाटप ,मुक्या प्राण्यांना अन्न पुरवणे त्यांची देखभाल करणे.याच बरोबर महिलांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना पोलीस स्टेशन व इतर ठिकाणी नेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे ,विविध राष्ट्रीय सण साजरे करणे असे एक ना अनेक उपक्रम संस्था गेल्या नऊ वर्षापासून अविरतपणे राबवित आहे.नैसर्गिक संकटात संस्थेने सांगली ,सातारा ,चिपळूण आदी ठिकाणी अन्नधान्य व गृहोपयोगी वस्तू पुरविल्या आहेत.
यावर्षी संस्थेचा ९ वा वर्धापन दिन दि. २५ जून ते दि. ३१ जुलै २०२२ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे . यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे ,जळगाव, नाशिक व पालघर जिल्ह्यात संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक आदिवासी पाड्यातील शाळा व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, साहित्य व कपडे ,छत्र्या, रेनकोटवाटप करणार आहेत.विविध ठिकाणी सामाजिक प्रबोधन ,कार्यशाळा ,मेडिकल कॅम्प ,स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रभरातील संस्थेचे पदाधिकारी व स्वयं सेवक राबविणार आहेत . ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयाची संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले असून इच्छुकांनी पुढील मोबाईल क्रमांकावर- 9619630035 संपर्क साधावा.
संस्थेने १४ जून २०१३ पासून खालील प्रमाणे आत्तापर्यंत राबविलेले उपक्रम खालील प्रमाणे
१) नैसर्गिक संकटात सापडलेले अतिवृष्टीमुळे डोंगराखाली सापडलेल्या माळीण गावाचे पुनर्वसन झाले. त्यानंतर तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.व १५ ऑगस्ट कार्यक्रम .
२) कोल्हापूर,सांगली, सातारा, राजापूर, सैनिक टाकळी या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना अन्नधान्य व गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
३) डोंबिवली नगरीत स्टेट लेव्हल अचीव्हमेंट अवॉर्ड सोशल कल्चरल प्रोग्राम चे आयोजन विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा व कलाकारांना वाव सन२०१८ जानेवारी
४) कोकणातील चिपळूण व परिसर अतिवृष्टीमुळे संकटात सापडला होता तेव्हा संस्थेतर्फे अन्नधान्य व गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
५) पुणे जिल्ह्यातील स्नेहवन या संस्थेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
६) पुणे येथील रेड लाईट एरियातील मुलांचे संगोपन करणारी किलबिल संस्थेला शैक्षणिक साहित्य व फळ वाटप कार्यक्रम
७) टिटवाळा येथे अनाथ मुलींच्या परिवर्तन आश्रमातील मुलींसाठी आवश्यक व शैक्षणिक साहित्य वाटप.
८) भारतातील पहिली पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील NAB लायन्स होम फॉर ब्लाइंड खंडाळा येथील अंध बंधू-भगिनी साठी साहित्य व धान्य,फळ वाटप.
९) जळगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाजातील विविध समाज सेवकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.सन २०१३
१०) जळगाव येथे पोलीस दलातील अधिकारी यांचा व समाजसेवकांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.सन २०१७
११) डोंबिवली नगरीत स्टेट लेवल अवार्ड २०१३
१२) डोंबिवली नगरीत स्टेट लेव्हल डॉक्युमेंट अवार्ड व सोशल कल्चरल प्रोग्राम सन २०१५ सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर
१३) मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत काव्यसंमेलन व संस्थेचा वाढदिवस साजरा करून साहित्य वाटप करण्यात आले.
१४) डोंबिवली नगरीत स्टेट लेव्हल अचीव्हमेंट अवॉर्ड सोशल कल्चरल प्रोग्राम चे आयोजन विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा व कलाकारांना वाव सन२०१८ जानेवारी
१५) डोंबिवलीतील स्टेशन परिसर स्वच्छता मोहीम
१६) सन २०१८ नोव्हेंबर मध्ये यशोगाथा कार्यक्रमाचे आयोजन व महाराष्ट्राची संस्कृती जतन कार्यक्रम१७) संस्थेतर्फे जर्नालिझम ट्रेनिंग देऊन सन्मानपत्र कार्यक्रम व सन्मान सोहळा
१८) नव पत्रकारांसाठी आकाशवाणी ,मंत्रालय, प्रिंटिंग प्रेस आदी ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन
१९) डोंबिवली शहरा जवळील वृद्धाश्रमात फळं व साहित्य वाटप
२०) शहापूर तालुक्यातील आदिवासी शाळांमध्ये भेट देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप
२१) रस्त्यावर व रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या मुलांचा सांभाळ करणारी खडवलीतील पसायदान संस्थाला शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
२२) पुणे जिल्ह्यातील स्नेहवन संस्थेला शैक्षणिक साहित्य वाटप व फळे वाटप व प्रबोधन.
२३) लोणावळा येथील कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम व मैगझिन वृत्तपत्र बांधणी मार्गदर्शन कार्यक्रम.
२४) दिवा येथील जीवन दीप शैक्षणिक संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन
२५) अंबरनाथ तालुक्यातील कमलधाम वृद्धाश्रमला भेट
२६) पसायदान संस्था खडवली येथे पुन्हा शैक्षणिक साहित्य वाटप व विद्यार्थ्यांसोबत विरंगुळा कार्यक्रम
२७) शिवनेरी व सिंहगड किल्ले भ्रमंती व स्वच्छता मोहीम
२८) शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शालेय परिसरात वृक्षारोपण
२९) शिवनेरी किल्ला स्वच्छता मोहीम
३०) डोंबिवली शहर व परिसरातील महिला व मुलींना पोलीस स्टेशन चा कारभार कसा चालतो याची माहिती व प्रात्यक्षिक विष्णुनगर पोलीस स्टेशन३१) महिला दिनानिमित्त विदर्भातील जळगाव जामोद येथे महिलांचा सत्कार समारंभ व महिलांच्या हक्क जनजागृती कार्यक्रम. २०१६
३२) महिला दिनानिमित्त विष्णुनगर पोलीस ठाणे डोंबिवली येथे महिलांचा सत्कार व सन्मानपत्र वाटप २०१७
३३) कोरोना काळात पोलीस रेझिंग डे निमित्ताने मास्क वाटप व जनजागृती कार्यक्रम विष्णुनगर पोलीस ठाणे२०२०/ आणि २०२१
३४) अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाड्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आदिवासीं कुटुंबाना रेशन वाटप कार्यक्रम सन २०२० व २०२१
३५) अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाड्यावर बोहनोली येथे अंबरनाथ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आदिवासींसाठी रेशन वाटप कार्यक्रम सन २०२१
३६) अंबरनाथ तालुक्यात आदिवासी पाड्यावर आदिवासी दिन साजरा करून गृहपयोगी वस्तूंचे वाटप सह्योग अंबरनाथ पोलीस स्टेशन
३६) जळगाव येथे वारकरी लोकांना अन्नदान
३७) अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
३८) वरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळेस स्वच्छता मोहीम
३९) देशभक्ती कार्यक्रम कॅन्डल मार्च दहशतवाद्यांनी केलेला हल्ला याचा निषेध करून कॅन्डल मार्च काढण्यात आला सहभाग सर अकॅडमी चे विद्यार्थी
४०) दीपावली मध्ये एक पणती सैनिकांसाठी डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळ कार्यक्रम उपस्थिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार व ट्रॅफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांची विशेष उपस्थिती
४१) डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थान च्या वतीने गुढीपाडवा शोभायात्रा रॅली यामध्ये स्त्रीभ्रूणहत्या चित्ररथ बेटी बचाव, बेटी पढाव संदेश
४२) रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलीस ठाण्यात इन्चार्ज सपोनिरी.अविनाश पाटील यांच्या विशेष उपस्थितीत रक्षाबंधन व वृक्षारोपण कार्यक्रम व संस्थेच्या संकेतस्थळाचे अनावरण
४३) सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम किल्ले जतन व स्वच्छता मोहीम
४४) कोरोना काळात डोंबिवली परिसरातील पोलीस बंधू भगिनींना मास्क वाटप व चहा बिस्किट फराळ याची व्यवस्था
४५) कोरोना काळात भटक्या कुत्र्यांना व पशुपक्ष्यांना अन्न व पाणी पुरविले
४६) कोरोना काळात लोणावळा येथील संस्थेच्या स्वयंसेवक /पदाधिकारी सौ.चित्रा कामत यांनी भटक्या जनावरांना व पशुपक्ष्यांना अन्न पुरविले तसेच आदिवासी महिलांसाठी आवश्यक सामग्री पुरविली
४७) अंबरनाथ तालुक्यातील बोहनोली गावात महिलांसाठी विशेष कार्यक्रम व सॅनिटरी पॅड शैक्षणीक साहित्य व कपडे यांचे वाटप आणि महिलांच्या समस्या यावर डॉक्टरांचे व्याख्यान
४८) हिवाळ्यात वीट भट्टी कामगारांसाठी त्यांच्या वीटभट्टीवर जाऊन त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व त्यांच्यासाठी ब्लँकेट वाटप ,भोजन आणि जनजागृती कार्यक्रम
४९) AVK संस्थेच्या सहकार्याने अंध अपंग बांधवांना दिवाळी सण साजरा करता यावा यासाठी रेशन किटचे वाटप २०२१
५०) राजगुरुनगर येथे अपंग युवकाला स्वयंसेवक /पदाधिकारी नितीन सैद यांच्या हस्ते दैनंदिन उदरनिर्वाहासाठी एका छोट्या दुकानाचे बांधकाम करून देण्यात आले.
५१) खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मानसिक रुग्णांना शोधून रेहाबिलिटेशन सेंटर मध्ये दाखल करण्यात आले
५१) राजगुरुनगर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
५२) महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे आयोजन
५३) रांजणी जि . जळगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षरोपण