Rani Padmavati - राणी पद्मावतीची चित्तथरारक कथा/Story/ History of Chittorgarh Fort चित्तोड गडाचा इतिहास

Rani Padmavati - राणी पद्मावती म्हटले किंवा चित्तोड गडाचा इतिहास म्हटला की, सगळ्यात आधी आठवणारा प्रसंग म्हणजे तो राणी पद्मावती यांचा सती ( जोहर ) जाण्याचा प्रसंग. २६ ऑगस्ट १३०३ आणि आज सन २०२२ साल सुरू आहे . एवढा मोठा कालावधी तरी गेला परंतु आजही तो प्रसंग सगळ्यात आधी आठवतो .
- राणी पद्मावती ,पद्मिनी Rani Padmavati कोण होती?
- राणी पद्मावती चा विवाह Who is Rani Padmavati Husband.
- राणी पद्मावती चा मृत्यू -पद्मावती चा जोहर कुंड मध्ये समर्पण -Death of Rani Padmavati.
सिहल द्वीप (श्रीलंका) राजा गंधर्व सेन व त्यांची पत्नी राणी चंपावती यांची ती मुलगी होती. पद्मावती (पद्मिनी) ही बालपणापासूनच खूप सुंदर होती. पद्मिनी जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या सुंदरतेचे बोल बाले चारही बाजू होऊ लागले त्याच बरोबर तिच्या बुद्धिकौशल्याची चर्चा होऊ लागली .पद्मावतीचा उंच शरीर बांधा खोल सरोवर सारखे डोळे आणि परी सारखा रंग असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधीत करणारे होते. राणी पद्मावतीला १३ आणि १४ व्या शतकातील भारतामधील एक महान राणी म्हणून ओळखले जाते.
- Who is Rani Padmavati Husband-राणी पद्मावतीचा विवाह
राणी पद्मावतीचा स्वयंवर (पण) होता की जो कोणी तिच्या निवडलेल्या सैनिकाशी युद्ध हरेल त्याच पुरुषाशी लग्न करेल आणि असेही म्हणतात की ,तो सैनिक दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः पद्मावती असे.पुढे राणी पद्मावती ने घेतलेला असा हा (पण ) चित्तोड मेवाडात रावळ वंशाचा राणा रावल रतन सेन यांनी पूर्ण करून पद्मावतीशी विवाह केला. राजा रतन सिंह हे रणकौशल्य आणि राजनीतीमध्ये निपूण होते त्यांच्या दरबारात एक पेक्षा एक महान योध्दा होते. चितोडची युद्धकला लांबवर प्रसिद्ध होती.
- Death of Rani Padmavati.राणी पद्मावती चा मृत्यू / पद्मावतीचे जोहर कुंड मध्ये समर्पण
राघव चेतन नावाचा एक कलाकार रतन सिंहा च्या दरबारात कसल्या तरी गुन्ह्याखाली अपमानित करून त्याला दरबाराबाहेर हाकलण्यात आले.त्याने झालेल्या अपमानाचा सूड घेण्याचे ठरवले. व तो दिल्ली राज्याच्या एका वनात जाऊन बसला .त्याच वनात शिकार करण्यासाठी दिल्लीच्या गादीवर असलेल्या अल्लाउद्दीन खिलजी यायचा .याच गोष्टीचा फायदा घेत राघव चेतन याने एका दिवशी खिलजी चे सैन्य येताना पाहून बासरी वाजवायला सुरुवात केली व अल्लाउद्दीन खीलजी याने सूर ऐकताच राघव चेतन यास आपल्या समोर हजर राहण्यास सांगितले .त्याच वेळी त्याने संधी साधून आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अलाउद्दीन खिलजी यास भडकावून (ऊकसवून) चित्तोड वर आक्रमण करणे व अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले .आणि पद्मावतीचे सुंदर वर्णन करून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले .व त्याला सांगितले की तुझ्यासारख्या वीर पुरुषाच्या जनानखान्यात एवढी सुंदर राणी नसणे म्हणजे तुझा अपमान असल्यासारखेच आहे.एवढे ऐकताच खिलजीच्या मनात पद्मावती प्राप्तीची इच्छा बाळगून जानेवारी १३०३ मध्ये खिलजीने स्वारी केली व चित्तोडगडला वेढा घातला .
परंतु आठ महिने होऊन गेले तरी राजपूतांच्या चिवट प्रतिकारामुळे व किल्ल्याच्या तटबंदीमुळे त्याच्या हाती काहीच यश मिळाले नाही . पुढे त्याने राजा रतन सिंहाला (खलिता) निरोप पाठविला .की मला जर राणी पद्मावती चे दर्शन घडविण्यात आले तर तो दिल्लीला परत निघून जाईल .परपुरुषाला राजपूत स्त्रियांनी चेहरा दाखवणे म्हणजे हा राजपूतासाठी एक प्रकारचा अपमान होता.पण युद्ध टाळण्यासाठी राजा रतन सिंह यांनी त्याचा प्रस्ताव स्विकारला व मुखदर्शन आरशाद्वारे होईल अशी अट घालण्यात आली .
पुढे ठरल्याप्रमाणे राणी पद्मावतीने तिच्या सौंदर्याचे दर्शन आरशातून दिले मात्र राणी पद्मावतीला बघताक्षणी खिलजी याचे विचार बदलले व बाहेर सोडायला येताना राजा रतन सिंह यास खिलजी ने कैद केले.व सांगितले की, जोपर्यंत पद्मिनी त्याच्या शरण जात नाही तोपर्यंत राजा रतन सिंह यास सोडणार नाही अशी धमकी दिली .
राजपुतांचे सेनापती गोरा व बादल यांनी एक युक्ती केली व खिलजीला एक निरोप पाठविला की राणी पद्मावती त्यांच्या ७०० दासी सोबत येईल आणि खिलजी तयार झाला.दुसऱ्या दिवशी पालख्या बघून खिलजी खुश झाला परंतु पालखीतून सैनिक बाहेर पडून खिलजीच्या छावणीवर त्यांनी आक्रमण केले व राजा रतन सिंह यांना सुखरूप गडावर घेऊन गेले पण यात त्यांचा सेनापती गोरा वीर गतीस प्राप्त झाला .त्यानंतर अपमानित खिलजीने युद्ध छेडले आणि लढाईत चितोडचे अनेक सैनिक मारले गेले आणि राजा रतनसिह यांचाही मृत्यू झाला.त्यानंतर न भेदता येणारा चितोड चा किल्ला मोघलांनी भेदला.
पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा सती जाण्याचा निर्णय किल्ल्यात असलेल्या स्त्रियांनी घेतला. खिलजीने स्त्रियांना बंदी बनवून घेण्याच्या उद्देशाने व पद्मावतीला मिळवण्याच्या हव्यासापोटी किल्ल्याच्या आत शिरकाव करता क्षणी राणी पद्मावती यांनी चितेत उडी घेतली .व त्यांच्या सहा सोळा हजार स्त्रियांनी सामूहिक उडी घेतली .चितेत उडी मारणाऱ्या याच प्रकाराला राजस्थानमध्ये “ जोहर “ असे म्हणतात .
अशा या महान Rani Padmavati यांनी स्वतः सह इतर स्त्रियांची अब्रू वाचवली व इतिहासाच्या पानांवर कायमचे आपले नाव नोंदवले .