लग्न जमवण्यसाठी प्रविणने दिले चाळीस हजार,ना लग्न, ना पैसे परत, नरेशने केले केले त्यालाच ठार!

CRIME BORDER | 17 September 2022 12:13 PM

पनवेल : आपल्या भारत देशामध्ये बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा गुंजत असून मुली ह्या मुलांपेक्षा कमी नाहीत, मुली व महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे ,परंतु अजूनही पुरुषांची मानसिकता बदललेली दिसत नाही. त्यांना त्यांच्या वंशाला दिवा लावण्यासाठी मुलगाच हवा आहे. त्यामुळे मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कमीच आहे .काही समाजामध्ये तरुण मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही हे वास्तव आहे.मुलांचे लग्नाचे वय निघून जात असल्याने जो तो मुलगी मिळवण्यासाठी अनेक खटपटी करून पैसे खर्च करून लग्न करतो काहींना मुली लग्नासाठी मिळतात परंतु काही तरुणांना तर पैसे देऊन लग्नासाठी मुली मिळत नाही याचाच फायदा गोरख धंदे करणारे घेताना दिसतातअलीकडे तर काही टोळ्या महाराष्ट्र राज्यात कार्यरत असून काहींना पोलीसांनी पकडले सुद्धा आहे.या टोळ्यांमध्ये काही तरुण मुलं,मुली, मध्यमवयीन मुली, मुलं   यांना घेऊन पुरुष व महिला एकत्र होऊन ज्यांना लग्नासाठी मुलगी हवी आहे,

अशांना शोधून ते संपर्क साधतात व त्यांच्यातीलच एखादी सुंदर मुलगी लग्नाची असल्याचे दाखवतात .कुणी त्या मुलीचा भाऊ होतो तर कुणी आई ,वडील ,बहिण असे संपूर्ण कुटुंब ते तयार करतात ते कुटुंब संपूर्णतः आभासी असते , खोटे असते आणि अशा या भुलथापा देणाऱ्या कुटुंबाच्या शब्दांवर विश्वास ठेवून अनेक कुटुंबे व ज्यांना कुणीच नाही परंतु लग्नासाठी मुलगी हवी आहे असे तरुण याला बळी पडतात फसतात.अशाच प्रकारे काही समाजकंटक लोकं अशी दुकानं थाटून लग्न लावून देतो आमच्याकडे अनेक स्थळ आहे असे सांगून रजिस्ट्रेशनच्या  नावाखालीही पैसे उकळतांना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचे लोन हे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे .काही बहाद्दर तर ...अंती दुर्गम भागातील आदिवासी व गरीब कुटुंबातील अल्पवयीन व तरुण मुली मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये नोकरीच्या निमित्तानेआणतात व त्यांचा वापर अशा खोट्या लग्नासाठी करतात किंवा त्यांना ते गरजू लग्नाळू मुलांना/ कुटुंबांना विकतात.काही कुटुंबामध्ये जास्त मुली असतात व त्यांचं पालक पोषण होत नसल्याने काही महाभाग आई-वडील मुलींना थोड्या पैशासाठी विकूनही टाकतात अशा घटना अधून मधून वृत्तपत्रातून प्रकाशित होतांना आपण वाचतो .पोलीस व सामाजिक संस्था अशा घटना घडवू नये म्हणून यासाठी ते प्रयत्न करतात परंतु यातून खूपच कमी लोक शिकवण घेतांना आपल्याला दिसतात.अशाच प्रकारे नवी मुंबई जवळील पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील अविवाहित तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्या दिवशी पनवेल तालुका पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या टावरवाडी ,गालडुंगे गाव ,पोस्ट वाजे ,तालुका पनवेल या शिवारातील टावरवाडी ते वांगणी बदलापूर या पायवाटेने एक इसम जात असतांना त्याला कसला तरी उग्र दर्प आला त्याने नाकाला रुमाल लावत कुठून वास येत आहे हे उत्सुकतेपोटी हा वास कशाचा आहे याची खात्री करण्यासाठी तो त्या पायवाटेपासून वासाच्या दिशेने गेला असता त्याला झाडी  झुडपात वास येत असल्याचे दिसले त्याने जवळ पाहून पाहिले असता त्याला एक इसम कुजलेल्या अवस्थेत मरून पडलेला दिसला त्याचा चेहरा तिक्ष्ण हत्याराने घाव घालून विद्रूप करून केलेला व तो ओळखू येत नव्हता ते पाहून तो इसम घाबरला आणि त्याने तात्काळ टावरवाडी गाव गाठले व तेथील गावकऱ्यांना या संदर्भात माहिती दिली.त्याची ही माहिती ऐकताच टावरवाडी गावातील काही मोजके लोकं हे त्या घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सुद्धा पाहिले की त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसम मरून पडलेला असून त्याचा कुणीतरी     खून करून त्याची बॉडी त्या ठिकाणी टाकून दिली आहे. हे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी पनवेल तालुका पोलीसांना माहिती दिली की ,साहेब टावरवाडी- मालडुंगे गाव , पोस्ट वाजे तालुका कल्याण जिल्हा रायगड येथून आम्ही नागरिक बोलत असून  टावरवाडी वांगणी बदलापूर या रस्त्याच्या पायवाट्याने एक इसम जात असतांना पाय वाटेपासून काही अंतरावर  झाडी झुडपात एका इसमाचा कुजलेला मृतदेह त्याला दिसला असल्याची माहिती त्याने दिली व आम्ही गावकरी या ठिकाणी आलो असता त्याने दिलेली माहिती खरी असल्याचे आम्हाला दिसले आहे ,तरी तुम्ही ताबडतोब या ठिकाणी या अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांने तात्काळ या गंभीर घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली.वरिष्ठांनी या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी पोलिसांना टावरवाडी वांगणी बदलापूर जाणाऱ्या पायवाटेच्या काही अंतरावर दाट झाडी झुडपात अनोळखी मृतदेह दिसला. पोलीस जसजसे त्या मृतदेहाजवळ जात होते तस तसा तेथून घाणेरडा दर्प परिसरातून त्यांना येत होता .पोलीसांनी नाकावर रुमाल ठेवून त्या प्रेताजवळ ते गेले ते प्रेत कुजलेले होते व  त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून विद्रूप केलेला पोलीसांना दिसला.पोलीसांनी सदर मृतदेहाची व आजूबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली असता पोलीसांच्या असे निदर्शनात आले की ,सदर इसमाचा कुणीतरी अज्ञात कारणावरून खून करून तीक्ष्ण हत्याराने व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून घाव घालून तो विद्रुप करून त्याच्या खांद्यावरील भाग ,मान, चेहरा हा ज्वलनशील पदार्थाने जाळून टाकलेला दिसत होता, सदर इसमाचा खून करून चार-पाच दिवस झाले असावेत कारण की तो मृतदेह कुजून त्यावर किडे लागलेले पोलीसांना दिसत होते. सदर घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी वरिष्ठांना दिली असता घटनास्थळाला डीसीपी शिवराज पाटील परिमंडळ -२, एसीपी भागवत सोनवणे पनवेल विभाग, एसीपी धनाजी शिरसागर पोर्ट विभाग यांनी भेट देऊन मार्गदर्शन करीत काही महत्त्वपूर्ण सूचना देऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.सदर इसमाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले दिसत होते परंतु घटनास्थळी आरोपींनी कुठलाही धागा दोरा मागे सोडलेला नव्हता तसेच आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज नव्हते त्यामुळे पोलीसांना अनेक अडचणी येत होत्या त्याकरिता या अनोळखी इसमची ओळख पटवून त्याचा खून कोणी व का केला याचा तपास करून आरोपींना पकडण्यासाठी डीसीपी  शिवराज पाटील यांनी तातडीने आरोपीला पकडण्यासाठी पाच पथक तयार करण्याचे आदेश दिले.

यामध्ये एपीआय अविनाश पाळदे, एपीआय संजय गळवे , एपीआय निलेश फुले ,एपीआय विवेक भोईर व फौजदार आकाश पवार अशा पाच जणांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टीम तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सांगितले.सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे निर्जनासाठी असल्याने घटनास्थळी व आजूबाजूला व परिसरात सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे नसल्याने उपलब्ध नव्हते सतत चार दिवस पोलीस त्या परिसरामध्ये सिव्हिल ड्रेस मध्ये फिरत होते व त्यांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून अत्यंत मेहनतीने व बुद्धी चातुर्याने आजूबाजूच्या गावांमधून  घटनास्थळाकडे येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यांचे एकूण पंधरा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांनी प्राप्त केले आणि प्रेत ज्या ठिकाणी मिळून आले होते त्या घटनास्थळाकडे चार दिवस अगोदर आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या व गेलेल्या इसमांची यादी त्यांनी तयार केली व त्या फुटेज मध्ये मयत इसम किंवा कोणी दिसून येतो का याची पाहणी सुरू केली असता त्यामध्ये मयताचे अर्धवट जळालेले कपड्याचे साधर्म्य असलेली हाफ पॅन्ट घातलेली एक व्यक्ती ही एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एका स्कुटी वरून तीन इसमांसो सोबत टावरवाडीच्या दिशेने जातांना पोलीसांना दिसला.तोच धागा पकडून त्याबाबत पोलीसांनी सखोल तपासआरभंला आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी व्यक्ती ही कोण आहे? व तीच व्यक्ती  कुणाला माहित आहे का? याचा तपास सुरू केला आणि सदर स्कुटी ही झूम करून तिचा नंबर शोधून काढला व ही स्कुटी कुणाची आहे, याचा पोलीसांनी तपास केला असता त्यांना एका दुकानांमध्ये सदर हाफ पॅन्ट घातलेला इसम किरकोळ खरेदी करतांना गुगल पे च्या माध्यमातून पेमेंट करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले सदर प्राप्त झालेल्या माहितीवरून व तांत्रिक तपासावरून माहिती शोधून काढण्यासाठी पोलीसांनी तपास सुरू केला.

पोलीसांना मयत यांचे नाव प्रवीण सुरेश शेलार असल्याचे समजले  आणि पोलिसांनी त्याची ओळख फोटो वरून गावकऱ्यांकडून करून घेतली गावकऱ्यांनी त्या सीसीटीव्ही फुटेज मधील इसम हा प्रवीण सुरेश शेलार असल्याचेच सांगितले. मग पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज मधील हाफ पॅन्ट घातलेला प्रवीण सुरेश शेलार व मयत झालेला इसम हे एकच असल्याचे त्यांच्या लक्षात आले मग पोलीसांनी मयत प्रवीण चे घर शोधून काढले व ते तेथे गेले. *प्रवीणच्या घरी पोलीस पथक तपासासाठी गेले असता त्याच्या घरी त्याची वृध्द आई व  भाऊ त्यांना मिळून आले परंतु ते दोघेही मनोरुग्न असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे पोलीसांनी प्रवीण कुठे आहे ?याबाबत विचारणा केली असता त्या दोघेही मायलेकांना प्रवीण कुठे आहे याची काही एक सुतराम माहिती नव्हती. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्या स्कुटी वरील तिघा इसमांचा शोध सुरू केला आणि पोलीसांनी ते सर्वजण प्रवीणला घेऊन कुठे गेले याची चौकशी परिसरात केली व त्यांना त्यांच्या गुप्त खबऱ्याने माहिती दिली galweकी ,साहेब याच तिघांनी प्रवीणला २५ तारखेला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या स्कुटीवर बसवून ते कुठेतरी घेऊन गेले होते .त्या सर्वांचे नावं पोलीसांना समजले आणि पोलीसांनी मग या तांत्रिक माहितीच्या आधारे व प्रत्यक्ष प्रवीणला घेऊन जातांना ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांच्या साक्षीवरून नरेश शांताराम बेटकर वय वर्ष ४२ त्याचे मूळ गाव मु.पो. मेघी,ता. संगमेश्वर ,जि. रत्नागिरी यास तांत्रिक तपासावरून त्याला विसरली बुद्रुक येथून ताब्यात घेतले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे प्रवीणच्या खूनासंदर्भात चौकशी केली असता तो सुरुवातीला काहीही माहिती देत नव्हता. तो उडवाउळवीची उत्तरे देऊन पोलीसांची दिशाभूल करीत होता .परंतु पोलीसांनी त्याला खास पोलिसी इंगा दाखविला असता तो सुता सारखा सरळ झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली देत या गुन्ह्यांमध्ये त्याचे दोन साथीदार सहभागी असल्याचेही त्याने पोलीसांना     सांगितले. ते तुझे दोघे मित्र कुठे आहेत याबाबत विचारणा केली असता ते दोघेही त्यांच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे नरेशने सांगितले. मग पोलसांनी *पनवेल पोलीस ठाण्यात गु. रजि. नं.१७०/२०२२ भा.द.वि.कलम ३०२,२०१,३४   प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली*. आणि प्रवीण च्या खुणा संदर्भात नरेश बेटकर याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावली आता पनवेल पोलीसांना पाहिजे असलेले दोन संशयित आरोपी पकडायचे होते. या कामासाठी एपीआय संजय गळवे यांचे पथक उत्तर प्रदेशांमध्ये रवाना झाले अगोदरच पोलीसांनी संशयित आरोपींच्या घराबद्दल व ते कुठे मिळू शकतील याबद्दल माहिती काढलेली होती. हे सर्व पथक उत्तर प्रदेशात पोहोचले तिथे त्यांनी उत्तर प्रदेश पोलीसांच्या स्पेशल टास्क फोर्स च्या मदतीने पाहिजे असलेले संशयित आरोपी दिलीप प्रेमराज शुक्ला वय ३४ वर्ष व अमरसिंग दया शंकर सिंह २५ वर्ष हे दोघेही राहणार खेमेपुर ,खैरुद्दिन्दपूर, ता. फुलपूर ,जि.अजमगड राज्य उत्तर प्रदेश  या दोघांची एस पी एफ पुणे माहिती काढून या दोघांनाही त्यांच्या घरातून अटक केली.

त्यानंतर तेथील कोर्टात त्यांना हजर करून त्यांना महाराष्ट्रातील पनवेल पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना कोर्टात हजर केले असता आधी चौकशीसाठी कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडी दरम्यान या सर्वांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली देऊन त्यांनी गुन्हा का? व कशासाठी केला याची पोलीसांना माहिती दिली. यातील यापूर्वीच अटकेत असलेला संशयित आरोपी नरेश शांताराम बेटकर व ज्याचा खून झाला तो मयत प्रविण शेलार हे दोघेजण चांगले मित्र होते ‌.यातील प्रवीण हा अविवाहित असून त्याला लग्नासाठी एका मुलीची आवश्यकता होती परंतु त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती परंतु नरेश प्रवीणला म्हणाला की तू काही काळजी करू नको मित्रा अशा मुली लग्नासाठी मिळत असतात मी तुला मुलगी मिळवून देईल परंतु त्यासाठी तुला खर्च करावा लागेल तेव्हा प्रवीण म्हणाला की ठीक आहे.जर माझे लग्न होत असेल तर मी त्यासाठी पैसे द्यायला तयार आहे मग या कामासाठी नरेशने प्रवीण कडून ४०,०००/- हजार रुपये घेतले व तो म्हणाला की, तू काळजी करू नकोस मी आता त्या मुलींच्या आई-वडिलांकडे जाऊन त्यांना हे पैसे देतो व तुमचं लग्न पक्का करून लावून देतो .प्रवीणला वाटले की आता आपले लग्न होईल कारण त्याला माहीत होते की काही मुलींचे आई-वडील पैसे घेऊन मुलींचे लग्न करून देत असतात अशाच प्रकारे आपला मित्रही आपले लग्न करून देईल या आशेवर तो बसला दिवसा मागून दिवस जात होते. प्रवीणला लग्नाची घाई झाली होती कारण त्याच्या घरामध्ये त्याची आई व भाऊ मनोरुग्ण असल्याने सगळेच कामकाज प्रवीणला करावे लागत होते ‌त्यासाठी त्याला त्याची हक्काची पत्नी हवी होती की ती त्याचे व त्याच्या घरातील आई व भावाचेही काम करेल व त्याचा संसार सुखाचा होईल असे तो भावी सुखी स्वप्न बघत होता परंतु दिवसा मागून दिवस जाऊनही आपला मित्र नरेश हा आपले लग्न जुळवून देत नाही म्हणून त्याला शंका आली की आपली फसगत तर झाली नसावी शेवटी तो म्हणाला की ,मित्रा नरेश तुझ्याकडून जर माझे लग्न जमत नसेल तर तू माझ्याकडून घेतलेले चाळीस हजार रुपये तू मला परत कर मी माझे लग्न दुसरीकडून कुणाकडूनही करून घेईल.

bhoirहे ऐकताच नरेशेच्या पायाखालची वाळू सरकली प्रवीण हा त्याच्या पैशासाठी त्याच्याकडे तकादा लावू लागला होता . प्रवीणला ४०,०००/-रुपये न देता त्याने घरासाठी दिलेले सहा लाख रुपये आपल्याला मिळावे म्हणून नरेशने एक मोठा प्लॅन केला रचला होता .त्याने या कामासाठी त्याचे दोन्ही मित्र दिलीप शुक्ला व अमरसिंग दयाशंकर सिंह यांना गोड बोलून या कटात सामील करून घेतले होते की ,मी प्रवीण कडून लग्नाच्या निमित्ताने चाळीस हजार रुपये घेतले आहे त्यातील काही पैसे मी तुम्हाला देईल त्यानंतर आपण प्रवीणचा खून करून टाकू कारण की प्रवीणने त्याच्यासाठी नवीन घर बुक केले होते व त्याचे सहा लाख रुपये त्याने भरलेले होते आपण प्रवीणला मारून टाकल्यानंतर त्याच्या मनोरुग्ण असलेल्या आईकडून अंगठा घेऊन त्याने बुक केलेले घर रद्द करू व ते सहा लाख रुपये तिघांमध्ये वाटून घेऊ असा त्याचा प्लान झाला होता व त्यानुसारच त्यांचे काम सुरू होते जेव्हा प्रवीणने पैशाची मागणी केली तेव्हा नरेशने कटकारस्थान रचून मित्रांच्या मदतीने प्रवीणला गोड बोलून त्यांच्यासोबत घेतले व  स्कूटरवर बसवून तो टावरवाडी ते वांगणी बदलापूर या सूनसान रस्त्याने त्याला घेऊन गेले सायंकाळची वेळ असल्याने तिकडे चिटपाखरूही नव्हते. त्या ठिकाणी या तिघांनी त्याचा गमचा अर्थात रुमालाने त्याच्या गळ्याला फास देऊन त्याचा खून करून टाकला त्याचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून त्या सर्वांनी धारदार शस्त्राने व दगडाने त्याचा चेहरा विद्रूप करून टाकला . जेणेकरून त्या प्रेताची ओळख पाठवू नये.यासाठी या तिघांनी प्रवीण चा खून करण्याच्या दोन दिवस अगोदर दारू पिण्याच्या बहाण्याने प्रवीणच्या घरी दोन दिवस टाईमपास केला .त्याचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्यानंतर त्याचा विश्वास संपादन केल्यावर घटनेच्या दिवशी गोड बोलून दारू प्यायला आपण बाहेर जाऊ व निसर्गाचा आनंद घेऊ अशा बहाण्याने त्याला ज्युपिटर स्कूटीवर बसवून निर्जन स्थळी ते घेऊन गेले आणि सायंकाळी साधारणता सात वाजेच्या दरम्यान यांनी गमच्याने गळा आवळून प्रविणचा खून केला आणि धारदार शस्त्र व दगडाने प्रवीण चा चेहरा ठेचून मृतदेह दाटज झाडी झुडपात टाकून दिला.एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता घटनास्थळी हे तिघेजण अंधारातच स्कुटीवर येऊन ते प्रेत कोणी ओळखू नये यासाठी त्यांनी एका बाटलीत पेट्रोल पंपावरून पेट्रोल विकत घेऊन आणले होते ते प्रवीणच्या चेहऱ्यावर व मानेवर टाकले आणि ते पेटवून दिले व तिथून ते पळून गेले. त्यांना वाटले की मयत कोण आहे? याचा पोलीसांना तपास लागणार नाही व पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही .तेथून मग ते परत आले आणि नरेशने त्या दोघांना थोडेफार पैसे दिले व म्हणाला की आपण काही दिवसानंतर प्रवीणने जे घर बुक केले आहे ते त्याच्या आईचा अंगठा घेऊन रद्द करूशरु व ते पैसे आपण तिघे घेऊ त्यानंतर ते तिघात सम प्रमाणात वाटणी करू असे सांगून त्या दोघांना त्याने त्यांच्या मूळ गावी पाठवून दिले आणि तोही तेथून पसार झाला असा सर्व प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे.

या गुन्ह्या संदर्भात पनवेल पोलीसांकडे कुठलाही धागा दोरा नसताना  निव्वळ तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व परिसरातील खबरे आणि साक्षीदार मिळवून खऱ्या आरोपींना पोलीसांनी गजाआड केले परंतु या घटनेत प्रवीण तर बायको मिळावीम्हणून जीवानिशी गूला ४० हजार रुपये पण गेले परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता त्याची मनोरुग्ण असलेली आई व भाऊ याचे काय? हा मोठा गहन प्रश्न उभा राहिलेला आहे, कारण प्रवीण शिवाय त्या दोघांचं कुणीही नाही अशा या दोघांच्या डोक्यावरील छत्रछाया या नालायक महामूर्ख नराधम लोकांनी पैशाच्या हव्यासापाई प्रवीणचा खून करून त्यांना खऱ्या अर्थाने अनाथ केले आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह ,पोलीस सह आयुक्त जय जाधव ,पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील परिमंडळ - २ , एसीपी भागवत सोनवणे पनवेल, एसीपी धनाजी क्षिरसागर पोर्ट विभाग नवी मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर पोलीस निरीक्षक अंकुश खेडेकर (गुन्हे), गुन्हे प्रगटीकरण पथकाचे एपीआय संजय गळवे, एपीआय अविनाश पाळदे ,एपीआय निलेश फुले ,एपीआय विवेक भोईर ,फौजदार आकाश पवार पो. हवा. महेश धुमाळ, सुनील कुदळे, विकास साळवे, संजय सूर्यवंशी, पो. ना. चंदिले, प्रकाश मेहेर, राकेश मोकल, जयदीप पवार ,पोलीस शिपाई मिरज पाटील, भीमराव खताळ ,तुकाराम भोई , पो. हवा.वैभव शिंदे पो. ना. प्रवीण पाटील या पथकाने परिश्रम घेतले असून पुढील तपास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पो. निरी. रवींद्र दौंडकर करीत आहेत.

संशयित मुख्य आरोपी नरेश शांताराम बेटकर हा मूळचा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट मेघे, तालुका संगमेश्वर येथे राहणारा असून त्याचे आईवडील, पत्नी व मुलं हे गावी असतात. त्याला दोन भाऊ असून एक अमेरिकेमध्ये सेटल झालेला आहे . दुसरा मुंबईमध्ये आहे. बेटकर हा त्याच्या कुटुंबासह लॉकडाऊन च्या अगोदर पनवेल या ठिकाणी राहायला होता. नरेश हा छंदी फंदी असल्याचे समोर आले आहे .त्याच्यावर यापूर्वी एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा डी.बी. मार्ग मुंबई पोलीस ठाण्यात २०१५ साली दाखल असून त्याला भा.द.वि. ३५४ व ३५४ ए गुन्ह्याअंतर्गत २०१८ मध्ये अटक होऊन शिक्षाही लागली होती. अशा प्रकारचे व इतर गुन्हे त्याने कुठे केले आहेत का याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत..

मयत प्रवीण शेलार  याचे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला होते ते पूर्वी मुंबईतील अँटॉपहिल या ठिकाणी कुटुंबासह राहत रिटायरमेंट नंतर हे  सर्व कुटुंब पनवेल तालुक्यातील गालडुंगे गाव ,पोस्ट वाजे. या गावी राहायला आले पुढे प्रवीणच्या वडिलांचे निधन झाले. त्याचा भाऊ प्रकाश व प्रवीण हे मिळेल ते काम करून पैसे कमवत होते. प्रकाश हा हिंदी विषयातून एम ए झालेला असल्याने त्याला बरेच नॉलेज होते.परंतु यांची आई ही मानसिक रुग्ण होती त्यामुळे तिची देखभाल हे दोघं करत असताना अचानक प्रकाशच्या डोक्यातही फरक झाला व तो सुद्धा मनोरुग्न झाला घरात आई व भाऊ हे दोघेजण मनोरुग्न असल्याने घरातील सर्व कामाचा ताण व खर्च प्रविणवर येऊन पडला. आईला पेन्शन येत होती. तो त्या दोघांची खूप काळजी घेत असे. प्रवीणच्या भावाने पनवेल जवळच एका गावात वन आर के रूम हा विकत घेऊन ठेवला होता परंतु तो तेथे रहायला गेलेला नव्हता आणि ते हल्ली ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे घर बांधले आहे ते तिथे राहत होते.*प्रविण व संशयित आरोपींची मैत्री* प्रवीण हा पनवेल मधीलच एका कंपनीत डाटा एन्ट्री चे काम करीत असे त्याच इमारतीमध्ये प्रवीणची व नरेश बेटकर याची तोंड ओळख चार-पाच वर्षांपूर्वी झाली होती त्या ओळखीचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत झाले मग ते एका ठिकाणी चहा पिणे ,जेवण करणे एवढेच नव्हे तर नरेश हा प्रवीणच्या घरी अधून मधून जाऊन तिथे एक दोन दिवस मुक्कामी ही राहत असे.

 

संशयित आरोपी नरेश बेटकर चे काम नरेश हा लहान-मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम करत असे तो पनवेल व परिसरातील कॉन्ट्रॅक्ट घेऊन तिथे लेबर कामाला लावून दोन ,चार, आठ दिवस तो इथे थांबत असे आणि त्यानंतर तो त्याच्या मूळ गावी रत्नागिरी जिल्ह्यातील मेघी येथे जाऊन येऊन असायचा तो त्याच्या कडे लेबर म्हणून काम करणाऱ्या कामगारांची खूप काळजी घेत असायचा त्यांना खायला प्यायला दारू मटन मच्छी देत असल्याने ते कामगार याला देव माणूसच म्हणत असत.*संशयित आरोपी नरेश बेटकर ची नियत बिघडली* नरेश बेटकर हा प्रवीणच्या घरी जाऊन येऊन असल्याने प्रवीणच्या घरासमोर राहणारी एक महिला नरेशला ओळखत होती. प्रवीण व नरेश हे दोघे मिळून दारूही पीत असत नरेशला प्रवीण कडून समजले की त्याच्या भावाने एक फ्लॅट घेतलेला आहे व त्याच्या घरात काही सोन्याचे दागिनेही आहेत.*मयत प्रविणला हवी होती बायको* एक दिवस प्रवीणने नरेशला लग्नासाठी मुलगी पाहायला सांगितली असता नरेशने त्याला भूल थापा देत आपण युपी वरून तुझ्यासाठी मुलगी आणू असे आश्वासन दिले आणि त्यासाठीच त्याने खर्चापोटी त्याच्याकडून चाळीस हजार रुपये घेतले ते सर्व पैसे नरेशने स्वतःसाठीच ठेवले पण महिना झाला तरी बायको मिळत नसल्याने प्रवीण वैतागला होता.

 

प्रॉपर्टीचा हव्यास  नरेश बेटकर यांने मनोमन एक कट रचला की आपण प्रवीण चा कायमचा काटा काढू त्याला जंगलात नेऊन मारून टाकू व त्याची डेड बॉडी कोणी ओळखणार नाही म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करून टाकू व घरातील डाग दागिने व सर्व ओरिजिनल पेपर्स घेऊन जाऊ त्यानंतर त्याच्या आईचे अंगठे घेऊन त्याचा फ्लॅट ही विकून टाकू व हे राहते घर सुद्धा विकून टाकू हे.*घर भाड्याचा करारनामा* घटनेच्या काही दिवस अगोदर नरेश प्रवीणला म्हणाला की मित्रा माझे गाव कोकणात असून माझ्या बिझनेसच्या कामासाठी मला इकडचा पत्ता हवा आहे परंतु त्यासाठी मला घर भाड्याने लागेल यासाठी तुझे घर मला 2025 पर्यंत भाड्याने देत आहे असा एग्रीमेंट करून दे या ठिकाणी तूच रहा फक्त मला एग्रीमेंट करून दे .त्याच्यावर माझे कामं होतील त्यातून तुला मी थोडेफार पैसे देईल.*मित्र असल्याने व त्याची गरज म्हणून प्रवीणने* नरेश बेटकर ला त्याचे राहते घर 2025 पर्यंत भाड्याने दिले व ते रजिस्टर भाडे करारही राजिस्ट्रार कडून करून दिली.घर भाड्याने घेताच त्या कागदपत्रावर नरेश बेटकरने त्याच्या आधार कार्ड वरील पत्ता बदलून घेतला जेणेकरून त्याचा मूळ पत्ता कोणालाच मिळणार नाही.

प्रवीण चा बायकोसाठी तगादा प्रवीण ने नरेशला खडसावले की तू मला बायको दे अन्यथा माझे पैसे परत दे यामुळे नरेश सुद्धा वैतागला होता प्रवीणला ४०,०००/- रुपये देऊ लागू नये व त्याची प्रॉपर्टी हडपण्याचे त्याने ठरविले कारण की प्रवीण चे नातेवाईक कोणीही त्यांच्याजवळ येत जात नसल्याने प्रवीण जिवंत राहिला काय किंवा मेला काय याबाबत कोणीही चौकशी  करणारे नव्हते आणि याचाच फायदा त्याने घ्यायचे ठरविले.*आणि नरेश युपीत*  घटनेच्या काही दिवस अगोदर नरेशने पूर्ण प्लॅन केला यासाठी त्याने त्याच्याकडे असलेले कामगार यांचावापर करण्याचे ठरविले परंतु ते कामगार युपी मध्ये असल्याने तो प्रवीणला म्हणाला की मी तुझ्यासाठी मुलगी बघायला यूपीमध्ये जात आहे हे ऐकून प्रवीणला खूप बरे वाटले तो म्हणाला की मित्रा मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही कारण माझ्या घरी माझी आई व भाऊ मनोरुगण आहे त्यामुळे त्यांची सेवा करायला मला साथीदार मिळेल.*खूनाच्या कटकारस्थानात यूपी चे मित्र तयार* नरेशने उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील फुलपूर तालुक्यात असलेल्या खेमेपुर खैरुद्दिन्दपूर येथे राहणारे त्याचे मित्र दिलीप प्रेमराज शुक्ला वय ३४ व अमन सिंग दया शंकर सिंह वय २५ यांना सांगितले की मी तुम्हाला भेटायला येत आहे त्या दोघांनाही खूप आनंद झाला . कारण त्यांचा शेठ त्यांना भेटायला येणार होता.नरेश सुपरफास्ट एक्सप्रेसने त्यांच्या गावी गेला तिथे तो एक रात्रभर थांबला. 

 

प्लॅन  त्याने त्या दोघांना सांगितले की माझा एक मित्र आहे त्याला लग्न करायचे आहे यासाठी इकडून कुणीतरी एखादी मित्र मला मिळवून द्या की तो एखाद्या मुलीचा फोटो त्याच्या मोबाईल वरून प्रविणला पाठवू शकेल.*फोटोसाठी बिंद ची मदत* दिलीप व अमन सिंग यांनी तात्काळ बिंद नावाचा मित्र गाठला व नरेशची भेट घालून दिली तेथून नरेशने बिंदला कुण्यातरी एका मुलीचा फोटो प्रवीणला पाठवायला सांगितलातेथून बिंदने एका मुलीचा फोटो प्रवीणला पाठवला ती मुलगी प्रवीणला आवडले व तो त्या मुली सोबत लग्न करायला तयार झाला.आणि त्या दोघं मित्रांना गोड बोलून नरेश सोबत घेऊन आला रस्त्याने येताना त्याने सर्व प्लॅन त्यांना सांगितला तो म्हणाला की तुम दोनो को मेरे साथ  मिलकर एक आदमी को हमेशा के लिए उपर भेजना है उसके लिये मै आपको एक एक लाख रुपये काम होने के बाद दूंगा हे ऐकून ते म्हणाले की ठीक है साब हम ये काम करेंगे. प्रवीणला कशाप्रकारे मारायचे यावर तिघांनी सल्लामसलत केली तेव्हा दिलीप म्हणाला की साब हम उसको गमचे से मारेंगे गमचा गले मे डालेंगे और काम तमाम.ते कामांसाठी तयार झाले कारण की यापूर्वी या दोघांची खूप खातीर पानी नरेशने केलेली असल्याने ते नरेशला देव माणूसच मानत होते.

प्रविणकडे मुक्काम  24 ऑगस्टला हे सर्वजण पनवेल येथे आले यांना घ्यायला प्रवीण त्याची स्कुटी घेऊन गेला व त्या स्कुटीवर बसून हे सर्वजण प्रवीण कडे आले आणि रत्रभर त्याच्याकडे थांबले.दुसऱ्या दिवशी प्रवीणची कामवाली घरकाम करायला आली असता तिला तीन लोकांचे जेवण जास्त बनवावे लागले. तीने नरेश व इतर दोघेजण व प्रवीण ची आई व भाऊ यांना पाहिले व त्यांच्यासाठी जेवण बनवून दिलेप्रवीण च्या घरी कुणीतरी पाहुणे आले हे त्याच्या घरासमोर राहणाऱ्या एका महिलेने बघितले त्यातील नरेशला ती ओळखत होती परंतु दोघांना तिने पहिल्यांदा बघितले कारण ते दोघेजण प्रवीण कडे पहिल्यांदाच  आले होते.

प्लॅन आमलात  दुसऱ्या दिवशी दुपारी चार साडेचार वाजता हे तिघेजण बाहेर निघाले त्या स्कुटीवर हे तिघेजण बारीक असल्याने बसून मावून जात होते प्रवीणने हाफ पॅन्ट व तिघांपैकी एकाने हाफ पॅन्ट घातली होती.

बिअर शॉपी वरून दारू हे सर्वजण एका बिअर शॉपीवर गेले तिथे प्रवीणने मित्रांसाठी दारू विकत घेतली व तिथे त्याने त्याच्या मोबाईल वरून पेमेंट केले तिथून ते सर्वजण टावरवाडी वांगणी बदलापूर रस्त्याने जायच्या अगोदर ते सर्वजण माथेरान कडे जाणाऱ्या डोंगराकडे त्याला घेऊन गेले परंतु त्या ठिकाणी पर्यटक तुरळक असल्याने त्यांनी तो प्लॅन कॅन्सल करून वांगणी बदलापूर चा परिसर निवडला मग ते पायवाट्याने निघाले.टावरवाडी मालडुंगे गावाच्या हद्दीतील जंगलाकडे ते निघाले ती एक पायवाट होती .

काही अंतरावर एका ठिकाणी हे सर्वजण दारू पीत बसले त्यानंतर ते अंधार व्हायची वाट बघू लागले तोपर्यंत तिथे त्यांनी प्लास्टिकच्या ग्लासात दारू पिली ,चकणा खाल्ला ,विड्या सिगारेट ओढली आणि अंधार होताच नरेशने एकमेकाला खुणविले असता एकाने त्याच्या गळ्यातील गमचा ( मोठा पातळ रुमाल) काढला व प्रवीण च्या गळ्यात टाकला नरेश ने त्याचे पाय दाबून धरले तर दोघांनी त्याच्या गळ्यात तो रुमाल आवळायला सुरुवात केली तेव्हा नरेश केविलवाणे नरेशला म्हणाला नरेश मित्रा घरी माझी आई आहे रे तिचा व माझ्या भावाचा सांभाळ कोण करेल? मला मारू नकोस त्यावर नरेश म्हणाला प्रवीण तेरा टाइम खतम हो गया तुझे कोई बचा नही सकता असे म्हणून त्यांनी त्याचा गळा आवरून मारून टाकले.नरेशने विड्या सिगारेटचे धोकटं, माचीसच्या काड्या ह्या माचिसच्या खाली डेबिट टाकल्या,दारू पिली ते प्लास्टिकचे ग्लास दारूच्या बाटल्या एका काळ्या पिशवीत बांधून दूर झाडी झुडपात फेकून दिलेत्यानंतर त्याला कोणी ओळखू नाही म्हणून नरेशने एक दगड उचलून त्याच्या चेहऱ्यावर जोराने हल्ला हे बघून त्याच्या इतर साथीदारांनी दगडाने त्याच्या चेहऱ्यावर वार केले या वारात नरेशचे तोंड तुटून दातही इतरत्र उडाले.त्यांनी त्याचा चेहरा विद्रूप करून ते शांतपणे प्रवीणच्या घरी आले तेथे आता पुढे काय यावर विचार विनिमय केला असता शुक्ला म्हणाला की प्रवीण के चेहरे पर *अपने हाथ की निशान मिल सकते है हे ऐकून टेन्शन नको यासाठी....म्हणून हे सकाळी चार वाजता उठले व जवळच्याच एका पेट्रोल पंपावर गेले आणि म्हणाले की हमारे साथ फॅमिली है और पेट्रोल खतम हो गया है अशी विनंती करून त्यांनी तीन प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल घेतले आणि ते घटनास्थळी गेले घटनास्थळी गेल्यावर त्यांनी प्रवीणच्या चेहऱ्यावर व गळ्यावर आणलेले सर्व पेट्रोल जार टाकले आणि त्याला पेटवून दिले त्या पेट्रोलच्या ज्वाला ह्या झाडाखाली प्रायव्हेट चा मृतदेह होता त्या झाडाच्या फांद्यांना व पानांना लागला परंतु त्याची परवाना करता प्रवीण ओळखू येणार नाही याची खात्री करून ते सर्वजण तिथून निघाले त्यांनी ती स्कुटी एका निर्जन स्थळी असलेल्या एका अपूर्ण बांधकामाच्या घरामध्ये लावून दिली. आणि तेथूने तिघेजण रत्नागिरी येथील नरेशच्या घरी गेले तेथे रात्रभर राहिले दुसऱ्या दिवशी ते सर्वजण पनवेलला पुन्हा आले.

चपला नविन घेतल्या घाई गडबडीमध्ये चपला सुटल्या म्हणून नरेशने पनवेलला दोघांनाही नवीन चपला घेऊन दिल्या त्या ठिकाणी त्याने नरेशीचा मोबाईल व पाकीट अशा वस्तू काढून घेतल्या असल्याने त्याच्या एटीएम वरून चपलाचे बिल द्यायचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न त्याचा फसला.*महाराष्ट्र पुलिस युपी तक नहीं पहुंचेगी नरेशला आत्मविश्वस*  परंतु पनवेलला फक्त नरेश उतरला तो म्हणाला की दिलीप और अमनसिंग तुम दोनो बिलकुल डरना नही क्यूकी महाराष्ट्र की पुलिस युपी तक नहीं पहुंचेगी तुम लोग बिनधास्त रहना मै इधर सब कुछ संभाल लूंगा.आणि ते दोघेजण त्याच गाडीने त्यांच्या गावी निघून गेले.नरेशने इकडे काय हालचाल आहे याचा कानोसा घेतला. आणि पुन्हा तो त्याच्या गावी निघून गेला. *पोलीस पाटील महादेव नथू जाधव* मालडुंगे  गावचे पोलीस पाटील यांना सदर माहिती मिळतात त्यांनी तात्काळ पनवेल तालुका पोलिसांना फोन केला असता स्टेशन हाऊसला एपीआय विवेक भोईर हे होते त्यांनी तात्काळ येऊन घटनेची शहानिशा केली व पुढील तपास सुरू झाला.

वपोनिरी. रवींद्र दौंडकर पोलीसातील माणूस     सदर गुन्ह्यांमध्ये कुठलाही धागा दोरा नसतांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संजय गळवे एपीआय अविनाश पाळदे एपीआय निलेश फुले एपीआय विवेक भोईर पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार या तपासी पथकाने अत्यंत कुशलता पूर्वक भरपूर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून कडेला कडे जोडून खरे आरोपी शोधून काढले.परंतु प्रवीण च्या घरी गेल्यानंतर त्याची आई व भाऊ मनोरुग्न असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या लक्षात आले त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा जेवणाचा प्रश्न सोडविला असून त्यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात ही त्यांनी पुढाकार घेतला.एक नव्हे तर तीन मर्डर* संशयित आरोपी नरेश शांताराम बेटकर या नराधमाने त्याच्या मित्रांच्या सहाय्याने फक्त नरेशचाच खून केला नाही तर मनोरुग्ण असलेल्या त्याची आई व भावाचा ही एक प्रकारे खूनच केला आहे कारण की आता त्या दोघांचे पालन पोषण करणारे व त्यांच्यावर लक्ष देणारे त्याचे जवळचे असे कोणीच नातेवाईक नाही त्यामुळे हा एक नव्हे तर ट्रिपल खून आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत बारीक-सारीक गोष्टी वस्तू घटनास्थळावरून मयताचे दात केस जळालेले कपडे तसेच आरोपींच्या चपला जप्त केल्या असून न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे देऊन प्रवीणला न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

गुन्हयाची नोंद नवीन कलम समाविष्ट  नरेश बेटकर ला कोर्टाकडून 14 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली तर पूर्व येतो का आरोपींना एपीआय गळवे यांनी युपी वरून आणल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांनाही 14 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली कोठडी दरम्यान यांनी आपला गुन्हा कबूल केला असून *यापूर्वी नोंदवलेल्या गु. रजि. क्रं. १७०/२०२२ भा.द.वि. कायदा कलम ३०२,३८२,२०१,१२०(ब) ,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली* असून या गुन्ह्यात डीसीपी शिवराज पाटील परिमंडळ 2 यांची महत्त्वाची भूमिका होती. पुढील तपास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर करीत आहेत.

- राजेंद्र वखरे