कल्याण मध्ये कलियुगी मुलाने आपल्या जन्मदात्या आईला दिला गळफास,आत्महत्येचा रचला बनाव,व.पो.निरी.एम.आर.देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली एपीआय. निशा चव्हाण यांचा उत्कृष्ठ तपास
: कल्याण :
गेल्या काही दिवसापूर्वी माथेफिरु सुशिक्षित मुलाने टिटवाळा येथे आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निर्घुनपणे खून केल्याची घटना ताजी असतानांच कल्याण पूर्व मध्ये अशाच एका नराधमाने आपल्या विधवा आईचा खून केल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत असून अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सरोजा पुमणी वय ६४ ह्या त्यांचा मुलगा रवी पुमणी वय ३४ याच्यासोबत कल्याण पूर्वेतील हनुमान नगरात असलेल्या प्रभू राम अपारमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर २३ मध्ये राहायला होत्या. सरोजा यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगी पुष्पलता हिचे लग्न झाले असून ती कल्याण पूर्वेतच त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर तिचा मुलगा व पती सेंथिवेल मदस्वामी व ४३ यांच्या समवेत राहायला आहे.पुष्पलताचा संसार अगदी आनंदी व सुरळीत सुरू असून तिचा पती एका चांगल्या कंपनीत नोकरीला आहे .त्यामुळे मुलीचा संसार आनंदी पाहून सरोजा खुश होत्या.
रात्री दीड वाजेच्या सुमारास आई आणि मुलामध्ये पैशांवरून वाद झाला आणि आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर रवीने नायलॉनच्या दोरीने आईला बेदम मारहाण केली आणि गळा आवळला आणि या मध्ये आईचा मृत्यू झाला.कोळसेवाडी पोलिसांनी सत्य उलगडले - व. पो. निरी. एम.आर. देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली महिला सहायक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण यांचा उत्कृष्ठ तपास
सरोजा पुमणी यांचे पती हे रेल्वेमध्ये नोकरीला होते .यापूर्वी हे कुटुंब धारावी या ठिकाणी राहायला होते परंतु रेल्वेतून रिटायरमेंट घेऊन हे कुटुंब कल्याण पूर्वेत भाड्याने घर घेऊन राहत होते. कारण की मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहील व आळी अडचणीच्या वेळी आपण एकमेकांना मदत करू या उद्देशाने सरोजा यांनी कल्याण येथे भाड्याने घर घेतले होते.सरोजा यांचा अगदी सुखी संसार होता कसली काळजी नव्हती परंतु मागच्या वर्षी सरोजा यांच्या पतीचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी सरोजा यांच्यावर येऊन पडली पेन्शनवर घरातील उदरनिर्वाह चालत होता. मुलगा रवी याने काहीतरी करून आपल्या पायावर उभे राहावे असे सरोजा यांना वाटत होते. रवी हा शिकलेला असल्याने त्याच्याकडून आई व बहिणीची खूप अपेक्षा होती.
रवी हा तापट स्वभावाचा असल्याने तो मनाला येईल तसे वागत होता. रवी हा ऐरोली येथील एका कंपनीत गेल्या काही वर्षांपूर्वी लागला होता आणि तो लॉकडाऊन च्या वेळी वर्क फ्रॉम होम करत असल्याने तो फक्त अधून मधूनच कंपनीत जात असे.रवीला कोणी म्हणणारे व बोलणारे नसल्याने त्याची हिम्मत वाढून तो सुरुवातीला मौज मजा म्हणून दारू पिऊ लागला.सुरुवातीला मौजमजा म्हणून पिणारी दारू आता त्याचे व्यसन बनली होती. त्याला आता दररोज प्यायला दारू लागत होती तो फक्त दारू पिऊन व खाण्यापिण्यातच त्याचा पगार खर्च होऊ लागल्याने त्याला पैशाची चंणचण भासू लागली म्हणून तो त्याच्या आईकडून दारू पिण्यासाठी पैसे मागायचा सुरुवातीला आई त्याला पैसे द्यायची परंतु मुलाचे लग्न करावे असा विचार करून आपण मुलाला पैसे दिले नाही तर तो दारू पिणार नाही अशा या भोळ्या समजुतीने सरोजा यांनी त्याला पैसे देणे बंद केले. त्यामुळे रवी चिडला आणि त्याचे व आईचे भांडण होऊ लागले ही बाब सरोजा यांनी त्यांच्या मुलीला सांगितली बहीण पुष्पलताने भावाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु रवीचे व्यसन आता हे हद्दीपलीकडे गेले होते, त्याला दारू पिल्याशिवाय काहीच सुचत नव्हते आणि या व्यसनामुळे त्याचे कामाकडेही दुर्लक्ष होऊ लागल्याने त्याच्या कामातही अनेक चुका होऊ लागल्या त्यामुळे त्याला कंपनीमधून सुद्धा खडे बोल सुनावल्या जात होते आणि या अशा ताण तणावातून तो पुन्हा दारू पिऊन यायचा.आई सरोजा ह्या मुलाच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंताग्रस्त झाल्या होत्या .त्यांना मुलाची काळजी वाटत होती आपले वय आता ६४ आहे .आपले कधी काय होईल हे सांगता येत नाही .आपल्या मुलाने लग्न करावे व सुखाचा संसार थाटावा यासाठी त्या प्रयत्नशील होत्या परंतु रवी मात्र ऐकत नव्हता.
अलीकडे रवीने पैसे मागितल्यावर सरोजा देत नव्हत्या आणि यावरून रवी हा आईला शिवीगाळ व अधून मधून मारहाणही करू लागला होता . म्हातारी सरोजा ही मुलाला शिव्या देऊ नको मला मारू नको मी तुझी आई आहे मी तुझ्या भल्यासाठीच तुला पैसे देत नाही असे त्या म्हणत होत्या परंतु रवी मात्र आईचे काहीच ऐकत नव्हता त्याला आई म्हणजे दुश्मन वाटू लागली होती कारण की, वडिलांच्या पेन्शनचे पैसे येत असतानांही आई आपल्याला खर्चासाठी व दारू पिण्यासाठी पैसे देत नाही याचा त्याला आईचा राग येत होता आणि मग त्याच्या डोक्यात रागातून अनेक विचार येऊ लागले होते.
त्यादिवशी सकाळपासूनच त्याच्या जवळच्या पैशाची दारू पिऊन रवी झिंगत होता मायलेकांमध्ये तू तू में में झाली होती त्याला त्याच्या आईचा खूपच राग आला होता ५ सप्टेंबर २०२२ च्या रात्री आईने त्याच्यासाठी जेवायला बनवले तो आईने बनवलेले जेवण जेवला परंतु त्याच्या डोक्यात आई बद्दल राग होताच त्याने त्या दिवशी आईचा खून करण्याचा प्लॅन रचला रात्री सगळीकडे सामसूम होण्याची तो वाट पाहू लागला तो राहत असलेल्या इमारतीमध्ये जास्त रहिवाशी नसल्याने व तिसऱ्या मजल्यावर रवी व त्याची आई आणि लांबच्या एका फ्लॅटमध्ये एक कुटुंब असे दोघे कुटुंब राहत असल्याने रवीच्या घरात काय होत आहे हे सहसा कुणाला समजत नव्हते.रात्री पुन्हा मायलेकांमध्ये वाद झाला आणि रात्री दीड दोन च्या सुमारास रवीने मागचा पुढचा विचार न करता आपल्या जन्मदात्या आईचा खून करण्याचे ठरवले आणि त्याने घरात असलेली नायलॉनची दोरी घेतली व त्याच्या आईच्या गळ्याभोवती अडकवून ती आवळायला सुरुवात केली. तशी त्याची आई सरोजाची तळमळ होऊ लागली त्या जीव वाचवण्यासाठी आटापिटा करू लागल्या मुलाच्या हाता पाया पडू लागल्या परंतु या निर्दयी मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या विनंतीकडे लक्ष न देता त्याने पूर्ण ताकदीने नायलॉनची दोरी आवळली थोड्याच वेळात पाय घासत घासत सरोजा शांत झाल्या आई-मेल्याची खात्री होताच रवीने शांतपणे पाच मिनिटे विचार करून आईच्या गळ्याला दोरीने फास लावला आई मेल्याची खात्री होताच आईला घरात असलेल्या एका मोठ्या टेबलावर स्टूलवर बसविले आणि गळ्यात दाखवलेली दोरी पंख्याला बांधली आणि त्यानंतर आईचा मृतदेह स्टूल वरून लोटून दिला त्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा बनाव तसेच आपल्यावर हल्ला असा शिन क्रिएट केला करण्यासाठी त्याने घरातून एक हातोडा घेतला व छिन्नी घेतली व स्वतःच्या डोक्यावर त्या अनुकुची दार छिन्नीने वार करुन घेतले व हातोड्यानेही मारून घेत रक्तबंबाड झाला जेणेकरून आपल्या आईने आपल्यावर हल्ला करून नंतर आईने पश्चातापातून आत्महत्या केली असा बनवत्याने रविने रचला .
त्यानंतर त्याने त्याची बहीण पुष्पलता हिला एवढ्या रात्री फोन केला व म्हणाला की आई मला मारत आहे तू लगेच घरी ये परंतु पुष्पलता म्हणाली की अरे! रवी आता खूप रात्र झाली आहे आता मी येऊ शकत नाही कारण मुलगाही माझा झोपला आहे मी सकाळी येईल.तु आईकडे फोन दे बरं मी आईशी बोलते असे पुष्कलता म्हणाली परंतु रवीने तो फोन त्याच्या आईला दिला नाही तेव्हा ती म्हणाली की अरे ! रवि तू फोन आईला दे तेव्हा तो म्हणाला की , आई तुझ्याशी बोलायचं नाही म्हणते आणि फोन कट केला. सतत आई व भाऊ रवी यांच्यात भांडण होत असते हे पुष्पलताला माहिती असल्याने तिने फारसे मनावर घेतले नाही परंतु सकाळीच लवकर आंघोळ करून घरचे काम आवरून पुष्पलता आईच्या घरी आली .दरवाजा बंद होता पुष्पलता हीने दरवाजा वाजवला परंतु आतून दरवाजा कोणीही उघडत नव्हते जवळजवळ अर्धा तास दरवाजा वाजवून वाजवून आवाज देऊन देऊन ती थकली होती तिने तिच्या नवऱ्याला फोन करून सांगितले की मी केव्हाचीच माझ्या आईचा दरवाजा ठोठावत आहे परंतु आतून कोणीही दरवाजा उघडत नाही तेव्हा तिचा पती म्हणाला की थोडा वेळ वाट बघ नाहीतर मी येतोच.थोड्यावेळाने घरात काहीतरी धडपडल्याचा आवाज पुष्पलताला आला आणि कुणीतरी दरवाजा उघडायला येत आहे असे तिला वाटले आणि दरवाजा रवीने उघडला रवी हा रक्तबंबाळ झाला होता . त्याने दरवाजा उघडून तो पुन्हा त्या ठिकाणी पडला.पुष्पलताने बघितले की भाऊ हा रक्ताने माखलेला आहे तीने तात्काळ त्याला उचलून साईडला बसवले व पाणी घ्यायला गेली असता घरात त्याची आई पंख्याला लटकलेली तिला दिसली आणि तिने एकच हंबरडा फोडला तीने तात्काळ भावाला पाणी देत तिच्या पतीला बोलवून घेतले ती म्हणाली की तुम्ही ताबडतोब इथे या व कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये जा आणि पोलिसांना घेऊन या कारण माझी आई पंख्याला लटकलेली असून भाऊ हा रक्ताने माखलेला आहे. हे ए ऐकताच पुष्पलता यांचा नवरा सेंथिवेल मदस्वामी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती बघून तात्काळ कोळशेवाडी पोलीस स्टेशन गाठले त्यांनी ठाणे अंमलदार यांना सदर घटनेबाबत माहिती दिली असता ठाणेदार यांनी या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठांना माहिती दिली व बीट मार्शल यांना घटनास्थळी जाऊन शहानिशा करण्यासाठी पाठवले.
घटनास्थळी बीट मार्शल पोलीस हवालदार ए. व्ही .भांगरे व पोलीस शिपाई ए.एच.पवार हे गेले असता त्यांनी घटनास्थळी एक युवक रक्तबंबाळ झालेला असून एक वृद्ध महिला पंख्याला लटकून मृत अवस्थेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख* यांना दिली तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले घटनास्थळावरून वपोनिरी.एम.आर .देशमुख यांनी एसीपी उमेश माने व डीसीपी सचिन गुंजाळ यांना सदर घटनेबाबत बाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मार्गदर्शन करून सूचना देत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.तात्काळ पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलवून बाई रुक्मिणी बाई रुग्णालया कल्याण येथे सर्वप्रथम रवीला उपचारासाठी पाठविले त्यानंतर घटनास्थळाचा इनक्वेस्ट पंचनामा फौजदार निकिता भोईगड यांनी करून तो मृतदेह सुद्धा बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून रवीला पुढील उपचारासाठी सायन येथे शासकीय रुग्णालयात शासकीय रुग्णवाहिकेने पाठविले तर सरोजा पुमणी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती केली की आम्हाला तात्काळ प्राथमिक अहवाल मिळावा त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत सरोजा यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करून सरोजा यांचा मृत्यू हा गळफास दिल्याने झाला असा प्राथमिक अहवाल देऊन तो मृतदेह पोलिसांना दिला. परंतु रवी हा पोलिसांना सांगत होता की माझ्या आईने माझ्यावर हल्ला करून तिने आत्महत्या केली आहे पण पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर हा खून रवीनेच केला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी सायंकाळी रुग्णालयात असलेल्या रवीला कल्याण येथे आणण्याचे ठरविले सायंकाळी सायन रुग्णालयांनी रवीचा सिटीस्कॅन एक्स-रे काढून तो नॉर्मल असल्याचे पोलिसांना सांगितले तेव्हा पोलिसांनी त्याला सायन येथून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आणले येताना पोलीस त्याला म्हणाले की तुझ्या आईच्या अंत्यविधीसाठी तुला जावे लागेल पोलिसांनी तो मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्या मृतदेहावर सरोजा यांच्या नातलगांनी अंत्यसंस्कार केले या अंत्यसंस्कारात रवी सामील झाला होता अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी रवीला ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला पोलीस त्याला म्हणाले की घरामध्ये तू व तुझी आईच होती दरवाजा तूच उघडला तुमच्या दोघा व्यतिरिक्त घरात कोणीच नव्हतं तर तुझ्या आईला गळफास कोण देईल ? या प्रश्नावर रवी हा गप्प झाला पोलिसांच्या प्रश्नांचा बळीमार झाल्याने त्याला काय करावे हे सुचत नव्हते.छिन्नीने स्वतःच्या डोक्यावर करून घेतलेले वार हे स्पष्ट सांगत होते की ,त्याने हा बनाव रचला आहे कारण की त्याच्या डोक्यावर पंचवीस तीस वेळा वारकरे पर्यंत रवी हा प्रतिकार कसा करणार नाही शिवाय वृद्ध असलेली आई तरुण मुलावर वार कशी करू शकेल या एक ना अनेक अशा गोष्टी पोलिसांच्या समोर होत्या.
सुरुवातीला अकस्मात मृत्यूची १३८/२०२२ प्रमाणे नोंद करण्यात आले होती. फौजदार डी. एन. पवार यांनी फिर्याद नोंदविली. पण वैद्यकीय अहवालानंतर सदर तपास हा महिला सहायक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला.
घरातील सर्व पुरावे हे रवीच्या विरोधात होते परंतु रवीला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप दिसून येत नव्हता अशा या निर्दयी रवी वर पोलिसांनी गुन्हा रजि.क्रमांक ४५८/२०२२ भा.द.वि.३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्याला कल्याण कोर्टात पाचव्या न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली कोठडी दरम्यान पोलिसांनी रवीकडून इत्यंभूत माहिती घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्ताने माखलेली चादर नायलॉनची रस्सी, एक लोखंडी हातोडा व लोखंडी छिन्नी हस्तगत करून जप्त केली.
या गुन्हा संदर्भात पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ व सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. निरी. एम.आर.देशमुख* यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण यांनी फौजदार डी.एन. पवार , महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता भोईगड, रायटर पो.हवा. राजेंद्र तात्याभाऊ ठोंबरे , बीट मार्शल पो.हवा. ए. व्ही. भांगरे ,पो.शि.ए एच पवार यांच्या सहकार्याने केला.
पोलीस सूत्रानुसार या गुन्ह्यात आरोपी रवी याने दारूच्या व्यसनातून आपल्या वृद्ध आईचा नायलॉनची दोरी तीच्या अडकवून खून केला व तिचा मृतदेह पंख्खाला लटकवून आईने आपल्यावर रागाच्या भरात हल्ला करून त्यानंतर मुलाला मारल्याचा पश्चाताप करून आत्महत्या केली असल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले . त्यानंतर पोलिसांनी रवीची बहीण पुष्पलता व तिचे पती सेंथिंवेल मदस्वामी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता रवी हा सतत दारूच्या नशेत असायचा व आईला त्रास द्यायचा अशी माहिती दिली असून त्यानेच आईचा खून केला असल्याचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला. असून तपासात त्यानेच आईचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. कथा लिहीपर्यंत आरोपी हा न्यायालयीन कस्टडी आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय . निशा चव्हाण करीत आहेत.
कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. आर .देशमुख म्हणाले की ,कुटुंबात समन्वय हवा व अशा व्यसनाधीन कुटुंबांच्या सामूहिक समोपदेशनाची गरज असून सामाजिक संस्थांनी असे प्रयत्न केल्यास अशा घटना घडणार नाहीत.
- सौ.सीमा रा.वखरे