वाडा पोलीसांनी अपहरण झालेल्या मुलीचा बारा तासात लावला छडा अपहरणाचा कथित टीईटी घोटाळ्याशी संबंध

CRIME BORDER | 15 September 2022 02:50 AM

वाडा/पालघर : पालघर जिल्ह्यात वाडा हा तालुका आहे. या तालुक्याच्या गावात पी.जे. हायस्कूल मध्ये  विश्वास शेलार वय ३८ यांची अल्पवयीन १२ वर्षाची मुलगी कु.पिंकी इयत्ता ७ वी त शिकत आहे. दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी दररोजच्या प्रमाणे सदर मुलगी शाळेमध्ये गेली. दिवसभर ती शाळेमध्ये होती परंतु शाळा सुटल्यानंतर ती घरी आली न आल्याने तिच्या घरात चिंतेचे वातावरण पसरले तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध सुरु केला परंतु सर्वत्र शोध घेऊन ही  ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे तिची आई वडील चिंताग्रस्त झाले . मुलगी कुठे गेली असावी या विचारात ते मित्रमंडळींच्या सहाय्याने शोध घेण्यास निघाले. खूप शोधूनही ती न सापडल्याने त्या सर्वांनी पोलिसात तक्रार देण्याचे ठरविले. त्यानंतर ते वाडा पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी सदर घटनेची माहिती तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिली . श्वास शेलार वय ३८यांच्या फिर्यादीवरून वाडा पो. स्टे. .येथे गु. र. नं . ३१५/२०२२ भा. द.  वि .प्रमाणे गुन्ह्यची नोंद केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिचा फोटो व वर्णन व माहिती तिच्या आई-वडिलांकडून पोलिसांनी घेतली. तात्काळ ही बाब वाडा पोलिसांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.व  मार्गदर्शन करीत मुलीचा तपास करण्याचे आदेश वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना दिले.

आपला भारत देश यावर्षी स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या पूर्वसंध्येला वाडा येथील एका मुलीचे अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली होती सोशल मीडियावर या मुलीच्या अपहरणाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरलीताबडतोब पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने बोलवून सदर घटनेची माहिती देऊन त्या मुलीचा तपास करण्याचे मार्गदर्शन करून त्यासाठी  पथकं तयार केले.ती मुलगी कुठे मिळू शकते? तिला कोण पळवून घेऊन जाऊ शकतो ? घरामध्ये काही वाद विवाद होता का? अशा विविध विषयावर तात्काळ पोलिसांनी तपासणी केला.विश्वास शेलार यांची मुलगी शाळेतून घरी परतली नसल्याची माहिती हळूहळू परिसरात सोशल मीडिया द्वारा  पसरत होती तिचे अपहरण  झाल्याने सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते.पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा यांची दोन पथके तयार करून त्यांना वेगवेगळ्या भागात तपासा करता पाठवून दिले.तर जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी हे वाड्यात तळ ठोकून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.त्याचबरोबर वाडा पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना कामाला लावले तपास करीत असताना. पोलिसांनी परिसरातील तांत्रिक गोष्टी व सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली.

 

पोलिसांनी परिसरातील तांत्रिक गोष्टी व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित स्विफ्ट डिझायर कार त्यांना आढळली पण त्या कारच्या नंबरची माहिती मिळत नसताना देखील पोलिसांनी त्या कारचा नंबर शोधून काढला व त्या मालकाच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले.पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना त्यांच्या खबऱ्याने माहिती दिली की वाडा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर व ऐनशेत पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलामधील फार्म हाऊस वर एका संशयित मुलीला डांबून ठेवले आहे.खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ सिव्हिल ड्रेस मध्ये वेशांतर करून एक पथक तात्काळ यांचे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या फार्म हाऊस जवळ पोहोचले. त्यांनी आजूबाजूचा अभ्यास करून चारी बाजूने त्या घराला घेरले व ते त्या घराच्या दरवाजा जवळ गेले आणि दरवाजा ठोठावला परंतु दरवाजा बंद होता पोलिसांनी आत प्रवेश केला असता हात पाय बांधलेल्या व तोंडात गोळा कोंबलेल्या अवस्थेत एक अल्पवयीन मुलगी पोलिसांना मिळून आली पोलिसांनी तात्काळ तिचे हातपाय सोडले व तोंडातील बोळा काढला. ती मुलगी रडू रडून दमली होती. पोलिसांनी तिचे नाव विचारले असता त्या मुलीने नाव सांगितले तेव्हा पोलिसांना अपहरण झालेली हीच ती मुलगी असल्याचे कळून चुकले त्यांनी घटनास्थळावरून वरिष्ठांना अपहरण झालेले मुलगी सापडल्याचे सांगितले. रात्रभर पोलीस मुलीचा कसोशीने शोध घेत होते पण पहाटे पहाटे पावणे सहा च्या सुमारास पोलिसांनी सुखरूपपणे त्या मुलीची सुटका केली.

सदर मुलीला वाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले व तिच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली तेव्हा त्या मुलीने सांगितले की मला शाळा सुटल्यानंतर काही लोकांनी बळजबरीने गाडीत टाकून दूर जंगलात नेले त्यांनी माझे हातपाय बांधून तोंडात गोळा कोंबला होता व त्यांनी मला आरडाओरडा केल्यास चाकूने जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यामुळे मी शांत राहिले त्यांनी मला खायला व प्यायलाही काही दिले नाही असे त्या मुलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.अपहरण कर्त्याकडे चाकू व हातोडा अशा वस्तू होत्या त्यामुळे ती घाबरून गेली होती.यातील संशयित मुख्य आरोपी समीर श्याम ठाकरे व ३०  वर्ष राहणार एनशेत तालुका वाडा जिल्हा पालघर याला पकडले परंतु त्याचे दोन साथीदार मात्र पोलिसांना पाहताच तेथून फरार झाले परंतु तपासात त्यांची नावे निष्पन्न झाली असली तरी त्याबाबत कमालीची गुप्तता वाडा पोलिसांनी पाळली आहे.

 

पोलिसांनी समीर ठाकरे याच्याकडून विश्वास शेलार यांच्या मुलीचे अपहरण करण्यासाठी वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची   MH 48/BT 7429 ही पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.  ही कार कुणाची आहे याबाबत पोलिसांनी तपासणी केली असता ही कार एका पोलीस अधिकाऱ्याची असल्याचे निष्पन्न झाले सदर पोलीस अधिकारी हे  ऐनशेत म्हणजेच संशयित आरोपीच्या गावातील असून समीर ठाकरे याला ही बदली कार दिली असल्याचे समजते.या अपहरणा बाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पी जे हायस्कूल मधून सदर मुलगी ही घरी पायी जात असताना तिच्या घराजवळ तिला अनोळखी व्यक्तींनी थांबवत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कार जवळ बोलावले आणि त्यांनी तिला क्षणाचीही उसंत न देता तिचे तोंड दाबून कार मध्ये ओढले व तेथून कार पसार झाली ‌. परंतु तरीही मुलगीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला हा आवाज आजूबाजूच्या रहिवाशांनी ऐकला परंतु तोपर्यंत ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पाठीमागून जाताना काहींना दिसली.

पोलिसांनी सदर मुलीचे अपहरण का झाले याबाबत तपास सुरू केला असता सदर आरोपीकडून कथित टीईटी घोटाळ्याचा वारंवार उल्लेख होत होता.अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व पोलिसांनी गजाआड केलेला समीर श्याम ठाकरे हा उच्चशिक्षित तरुण असून त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वाडा या तालुक्याच्या ठिकाणी चाणक्य अकॅडमी  (खाजगी क्लासेस) सुरू केले. होते व अल्पावधीतच त्याचे हे क्लासेस नावारूपाला सुद्धा आले होते.अपहरण झालेल्या मुलीचे वडील विश्वास शेलार हे पालघर शिक्षण विभागात कार्यरत असल्याने त्यांची एकमेकांसोबत ओळख निर्माण झाली होती जेव्हा समीरने मुलीचे अपहरण केले हे बातमी विश्वास शेलार यांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण समीर असे काय करू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता एवढेच नव्हे तर वाडा व परिसरातील नागरिक सुद्धा त्याच्या या कृत्याने त्यांना धक्काच बसला आहे.आता प्रश्न निर्माण झाला आहे की समीर ठाकरे याने हे मुलीच्या अपहरणाचे पाऊल का उचलले असावे ? त्याच्या कृत्या मागे काही दडले आहे का ?अशा तर्क वितर्कांना जिल्ह्यात उधाण आले असून अनधिकृत पणे मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक भरती मधील कथीत टीईटी घोटाळा व गैरव्यवहार संबंधीचे धागेद्वारे पालघर शिक्षण विभागापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

विशेष म्हणजे विश्वास शेलार यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची बातमी पालघरच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना मिळाली असता त्यांनी चक्क वाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.विश्वास शेलार हे जि . प. शाळेत शिक्षक आहेत   यांचे व शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांचे संबंध असल्याने हे प्रकरण आर्थिक हितसंबंधातून घडले आहे का ? आणि यामुळेच पालघर शिक्षणाधिकारी संगीता भागवत यादेखील आर्थिक व्यवहारात सहभागी आहेत का ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संदर्भात पोलीसांनी सखोल तपास करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.दुसरी विशेष भाग बाब म्हणजे मुलीचे अपहरण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी समीर ठाकरे हा देखील वाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात वावरत होता व पोलिसांच्या हालचालीवर नजर ठेवून होता त्यामुळे मुलीचे कुटुंबीय समीर ठाकरे विषयी अनभिज्ञ होते. परंतु विश्वास शेलार यांच्या मुलीचे अपहरण का केल्या गेले हे अजूनही गुलदस्त्यातच आहे परंतु पोलीस या प्रकरणाचा लवकरच छडा लावतील असे नागरिकांना वाटते कारण कि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील एक प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून जनमानसात व पोलिसात ओळखल्या जातात. ते ठाणे येथे वाहतूक शाखेत असतांना त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम राबविले होते . 

या प्रकरणातील संशयित आरोपी समीर याची याआधीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून त्याची व मुलीच्या वडिलांची ओळख असल्याने ते एकमेकांशी आर्थिक हित संबंधात गुंतलेले आहेत का ? आणि यामुळेच मुलीचे अपहरण करून दहशत निर्माण करणे की, अन्य त्यामधील कारण आहे का ? असे विविध पैलू तपासून चौकशी करून आरोपींना अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल अशी माहिती पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.परंतु टीईटीचा काही खरोखर घोटाळा आहेच का ? आणि तो असल्यास उघडकीस आणण्यासाठी समीर ठाकरे याने मुलीचे अपहरण केले का ? जर हा घोटाळा उघडकीस आणावयाचा होता तर समीरने कायदेशीर गोष्टीचा आधार का घेतला नाही ?  किंवा पोलिसात तक्रार का दाखल केली नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.परंतु शिक्षण पालघर  विभागातील टीईटी घोटाळा प्रकरण उघडकीस आणण्यासाठी समीर ठाकरे यांने अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यासाठी जे पाऊल उचलले हे नक्कीच चीड व संताप व्यक्त करणारे आहे. म्हणून मुलीच्या अपहरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करणे गरजेचे आहे. जर या संदर्भात सखोल चौकशी झाली नाही तर मुलीच्या अपहरणाची व त्या मागील दडलेल्या रहस्यमय (कथित TET प्रकरणाची) हे अपहरण प्रकरण फक्त अपहरणापुरतेच राहील आणि त्या मागील लपलेली रहस्यमय कहानी ही रहस्यमयच राहील.

 

मुलीच्या अपहरणाचा संबंध टीईटी घोटाळ्याशी जोडल्या जात असून या अपहरणाचा टीईटी घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय ही व्यक्त केल्या जात आहे यातून टीईटी शिक्षण घोटाळा बाहेर निघू शकतो मात्र परिसरात या सर्व घटनेचे संबंध टीईटी घोटाळ्याशी असू शकते अशी शंका व्यक्त केली जात आहे.  मुलीचे वडील व संशयित आरोपी यांच्यात शिक्षण क्षेत्रात काही गैरसमज झाल्यामुळे  या मुलीचे अपहरण केल्याची कबुली त्याने दिली आहे . याविषयी पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली . समीर व त्याच्या जवळच्यांनी नोकरीसाठी शेलारच्या माध्यमातूम पैसे दिले व ते वसूल व्हावे यासाठी मुलीला पाठवल्याचे पुढे येत आहे . तो पत्रकारांना एकच वाक्य बोलला पत्रकार बंधुनो टिईटी उघड झाला पाहिजे. सदर मुलीचे अपहरण कुठल्या कारणासाठी केले गेले आहे याचे कारण गुलदस्त्यात जरी असले तरी पालघर जिल्हा शिक्षण विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचार व कथित TET  घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे का?  म्हणूनच नैराश्येतून संशयित आरोपींनी मुलीच्या वडीलांना धडा शिकविण्यासाठी उचलले हे पाऊल आहे का ?असा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या चर्चेतून येत आहे.TET घोटाळा योग्य पद्धतीने उघड झाला तर अनेक जण गजाआड जातील अशी चर्चा सुरु आहे. 

याप्रकरणी पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.या गुन्ह्या संदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी यांनी एपीआय प्रेमनाथ ढोले ,पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे ,दीपक ढूस ,प्रदीप बोदडे, संतोष वाकचौरे, पोलीस नाईक सुशील बांगर ,पोलीस शिपाई भूषण खिलारे, गजानन जाधव , सर्फराज तडवी ,कमलाकर पाटील व बाबासाहेब घुगे य सहकारी  परिश्रम घेतले.

 

                                                                                                                                                                                                                                                    - राजेंद्र वखरे