कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४५ जनावरांची सुटका

CRIME BORDER | 12 January 2023 06:01 PM

बीड : कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ४५ जनावरांची पोलिसांनी तातडीने  सुटका केली आहे . याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडच्या खडकत गावात पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्यासह पथकाने  केली. गेल्या ६ महिन्यांमध्ये पोलीसांनी जवळपास २५० पाळीव जनावरांची सुटका  करून त्यांना जीवदान देण्याचे कार्य  केले आहे.