घरफोडी करणाऱी महिला चतुर्भुज : डोंबिवली रामनगर पोलीसांची कामगिरी
डोंबिवली : कधी कोण? काय करेल? याचा काही भरोसा नाही. आपल्याकडे काम करणारी महिला कशी आहे ? हे आपण ओळखू शकत नाही आणि तसे मशीन अजून तरी तयार झालेले नाही.
अशाच प्रकारे डोंबिवली येथील राजाजी पथ डोंबिवली पूर्व या ठिकाणी राहणारी फिर्यादी महिला ही पतीबरोबर डोंबिवलीतील चार रस्ता या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गेली असता तिच्या घरी घरकाम करणारी महिला सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम हिने फिर्यादीच्या घराची डुप्लिकेट चाबी तयार करून फिर्यादी महिलेच्या घरातून सुमारे दोन लाख ९० हजार रोख रक्कम व दागिने चोरून नेले होते .त्या संदर्भात डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८४/२०२३ कलम भा.द.वि.३८१,४५४ गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
यासंदर्भात डीसीपी परिमंडळ ३ चे सचिन गुंजाळ व डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित व. पो. निरी.नितीन गीते यांनी तातडीने एक पथक तयार केले .त्यामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे एपीआय योगेश सानप ,पो. हवा. विशाल वाघ ,कुरणे ,प्रशांत सरनाईक, पोलीस अंमलदार पोटे ,सांगळे ,महिला पो. हवा. जाधव महिला पो. कॉ.राजपूत पो.कॉ.निलेश पाटील , पो.ना.दिलीप कोती यांची एक तातडीची मीटिंग घेऊन त्यांना तपासाचे आदेश दिले.
त्यानुसार तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी त्याचबरोबर वाचमनच्या चौकशीच्या आधारे या गुन्ह्यातील पाहिजे असलेली संशयित आरोपी सीमा गावडे उर्फ नेहा सदानंद ढोलम वय वर्ष ४१ धंदा घरकाम, राहणार मद्रासी मंदिराजवळ, राजाजी पत डोंबिवली पूर्व हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असता तिने सुरुवातीला ताकास तूर लागू दिली नाही परंतु पोलीसांच्या प्रश्नांच्या सरबत्ती पुढे व सीसीटीव्ही फुटेज च्या पुढे तिचे काही एक चालले नाही आणि तिने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलीसांना दिली .त्यानुसार पोलीसांनी तिला रितसर या गुन्ह्यात अटक केली.तिच्याकडून पोलीसांनी रोख रक्कम पंधरा हजार रुपये तसेच एक लाख चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे एक सोन्याचा २१.८८० ग्रॅम वजनाचा हार तसेच अकरा हजार पाचशे रुपये किमतीचा एक रोझ गोल्डची १.८६० ग्रॅम वजनाची अंगठी त्याचबरोबर ८७ हजार रुपये किमतीची एक १४ ९१० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि दोन बनावट चाव्या तिच्याकडून हस्तगत केल्या. या महिने कडून रामनगर पोलीसांनी सुमारे दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.