खैरा ता.नांदुरा जि. बुलडाणा येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसाद 

CRIME BORDER | 12 September 2023 10:43 AM

महाराष्ट्र नाभिक चमु 

खैरा ता.नांदुराजिल्हा बुलडाणा  :- दरवर्षी प्रमाणे यंदाही  दि.११ सप्टेंबर २०२३ सोमवारी  संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या ६५३ व्या पुण्यतिथी निमित्त सकाळी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

संध्याकाळी गावातून संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची दिंडी /मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमासाठी नाभीक समाज बांधव व जिवा सेना मित्र मंडळ तसेच टाळकरी मंडळी , स्वयंपाकी मंडळी गावकरी मंडळी  यांनी सहभाग घेतला.