दादा महाजनांची प्रामाणिक कोचिंग सेवा... माणुसकीचा ठरतोय अनमोल ठेवा !--- सागर बाणदार
गरिबीचे चटके आणि स्वतःच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून अविरत कष्टाची तयारी ठेवली की , आपोआपच कोणत्याही उद्योग -व्यवसायात चांगले यश साध्य करता येते,याचा प्रत्यय रांगोळी गावचे सुपूत्र व इचलकरंजीतील टिप - टाॅप कोचिंगचे दादा महाजन अर्थात सुशांत बंडू शेटे - महाजन ( 9764781550) यांनी आपल्या यशाच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
सुरुवातीला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हुपरीत आपल्या भावोजींकडे फोर व्हीलर ,टू व्हीलर सीट कोचिंग ,खुर्ची - सोफा रिपेअरी कामाचे प्रशिक्षण घेतले.यानंतर दहा वर्षापूर्वी त्यांनी इचलकरंजीत विकली मार्केट परिसरात स्वतःचे टिप - टाॅप कोचिंगचे दुकान सुरु करुनत्या माध्यमातून ग्राहकांना चांगली व वाजवी दरात सेवा देण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.यामध्ये कोणत्याही ग्राहकाला फसवायचे नाही किंवा प्रामाणिकतेशी तडजोड करायची नाही,यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.त्यामुळे व्यवसायातून कुटूंबाच्या आर्थिक उदरनिर्वाहासाठी पैसा कमावताना माणुसकी जपण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा हा त्यांचे खरेखुरे मोठेपण अधोरेखित करणारा ठरला आहे.कामात तत्परता व चांगल्या दर्जाच्या कौशल्यातून ग्राहकांना फोर व्हीलर, टू व्हीलर गाड्यांचे सीट कोचिंग , खुर्ची व सोफा कोचिंग रिपेअरी करण्याची त्यांची कामाची पध्दतच त्यांना कोचिंग व्यवसायातील चांगल्या यशासाठी मोठा हातभार लावणारी ठरत आहे.एकंदरीत ,दादा महाजन म्हणजे कोचिंग व्यवसायात प्रामाणिक सेवा देणारा भला माणूस अशीच त्यांची मोठी ओळख केवळ इचलकरंजी शहरातच नव्हेतर अगदी हातकणंगले - शिरोळ तालुक्याबरोबरच कर्नाटक सीमाभागात पोहचली आहे.खरंतर , यामागे सर्वसामान्य ग्राहकांना चांगली व वाजवी दरात कोचिंग रिपेअरीची सेवा द्यायची आणि त्यातून दोघांनीही समाधान मिळवायचे ,हाच त्यांचा प्रामाणिक हेतू आहे.त्यामुळेच ते व्यवसायापलीकडे माणुसकी जपणारा आणि आपल्या सेवेतून ग्राहकांना समाधान, आनंद देणारा भला माणूस म्हणून आदर्श व प्रेरणादायी ठरतात.त्यांच्या या प्रामाणिक कार्यतत्परतेला आमचा मनापासून सलाम व त्यांच्या यशस्वी वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा.( संपर्कासाठी पत्ता : टिप टॉप कोचिंग ,चांदणी चौक , इचलकरंजी )
-- सागर बाणदार