प्रियकराने प्रेयसीचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये केला खून

CRIME BORDER | 24 April 2024 05:40 AM

लिव्ह इन रिलेशन चे प्रकरण चव्हाट्यावर -पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी 22 वर्षीय अनिशा ही तिचा पार्टनर मुल्ला याच्यासोबत लिव्ह इन पार्टनर शिप मध्ये राहत होती पोलिसांनी काही दिवसापूर्वीच या गुन्ह्यातील आरोपीला पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी मीनाजुद्दीन अब्दुल अजीज मुल्ला उर्फ रवींद्र रेड्डी 26 याला पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 वर्गाना जिल्ह्यातून नुकतीच अटक केली आहे. 

या संदर्भात समजते की मुल्ला पश्चिम बंगालचा रहिवासी आहे त्याने डहाणू मध्ये भाड्याने खोली मिळवण्यासाठी स्वतःचे नाव बदलून रवींद्र रेड्डी असे ठेवले मयत मुलगी आपली पत्नी असल्याचे त्याने भासविले शेजाऱ्यांनी खोलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार खोली मालंकाकडे  केल्यानंतर सदर गुन्हा उघडकीस आला. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने खरे कारण सांगितले की अनिशा ही मला लग्नासाठी तकादा लावत होती म्हणून मी तिचा खून  केला.पोलिसांना मयत तरुणीचा प्रियकर हा बंगालमध्ये असल्याची माहिती मिळाली होती त्याला पकडण्यासाठी डहाणू पोलीस स्टेशनचे एक पथक पश्चिम बंगालला रवाना झाले होते 

डहाणू : त्यादिवशी डहाणू पोलीस ठाण्यात सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते . त्यावेळेस एक इसम  पोलीस ठाण्यात आला व म्हणाला की साहेब माझे नाव पिंटू गुप्ता वय ३८ असून मी राहायला सोमवार मार्केट मधील द्वारका बिल्डिंगच्या बाजूला राहायला आहे माझी एक चाळ असून ती चाळ लोणीपाडा या ठिकाणी आहे.  त्या चाळीमध्ये मी काही भाडेकरू ठेवलेले आहेत .त्या चाळीतील चाळ क्रमांक चार मधील रूम नंबर ५ तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी अनिशा रेड्डी उर्फ बरस्ता खातून वय वर्ष 22 हीराहायला आहे तिचे मुळगाव मोहिरामपुर फलटा, दक्षिण 24 , परगना,, जिल्हा परगना राज्य पश्चिम बंगाल असे आहे.मला माझ्या चाळीतील चाळकऱ्यांनी व काही लोकांनी सांगितले की अनिशा हिच्या घरातुन दुर्गंधी येत आहे म्हणून मी खात्री केली असता ती खरंच  दुर्गंधी येत होती . दरवाजा बंद होता तो उघडला असता घरातून भयंकर  दुर्गंधी येत होती . घरात अनिशा मयत झाल्याचे दिसते म्हणून  पोलिसांना सदर माहिती देण्याचे ठरवले . अशी माहिती त्याने पोलिसांना दिलीघटनेची शहानिशा करण्यासाठी डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पिंटू गुप्ता याच्या चाळ क्रमांक चार मधील रूम नंबर पाच या ठिकाणी पोहचले असता त्या ठिकाणी एक तरुण महिला वीस-बावीस वर्षाची ही निपचित पडून मरून पडलेली तर तिची बॉडी कुजत व्हायला लागली होती .

ताबडतोब पोलिसांनी तिची तपासणी केली व ती मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी सदर माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली तात्काळ दोन पंचांना बोलवून घटनास्थळाचा व मयत महिलेचा इनक्वेस्ट पंचनामा करून सदर मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी डहाणू सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. त्यावेळेस सदर घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी तात्काळ अकस्मात मृत्यूची नोंद रजिस्टर क्रमांक १०/२०२४ सी आर पी सी कलम 174 प्रमाणे दाखल करून घेतली.सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्याकडे सोपविला. सदर मयत अनिशा हिचा मृतदेह वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय डहाणू यांच्याकडे पाठवून तात्काळ विनंती रिपोर्ट करून मृत्यूचे कारण समजण्यासाठी पोलिसांनी विनंती केली. 

घटनास्थळी दोन सरकारी पंच बोलवून पंचनामा करून घटनास्थळावर श्वान पथकाला बोलवून आवश्यक त्या बाबी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. घटनास्थळी अंगुली मुद्रातज्ञ ,श्वानपथक व फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना बोलवून त्यांच्या मार्फत पाहणी करून आवश्यक त्या बाबी पोलिसांनी ताब्यात घेतल्या पोलिसांना संशय होता की सदर महिला ही नैसर्गिक रित्या मेलेली नसून तिचा कुणीतरी खून केलेला असावा परंतु सदर घटनाही सत्य किंवा असत्य हे वैद्यकीय अधिकारी ठरवतील हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना विनंती केली की तात्काळ आम्हाला सदर मृत्यूचे कारण मिळावे त्यानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसांना प्राथमिक अहवाल दिला व त्या अहवालामध्ये सदर महिलेचा मृत्यू हा गळा दाबल्याने व श्वास कोंडल्याने झाल्याचे त्यांनी सांगितले सदर महिलेचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिचा खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले व तसे वैद्यकीय अधिकारी यांनीही त्यांना प्राथमिक अहवालात सांगितले म्हणून सदर घटनेबाबत आकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती त्यामध्ये वाढ करून आणखी आयपीसी 302 हे कलम लावण्यात आले व खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 78 /2024 भारतीय दंड विधान कायदा कलम 302 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करून गुन्ह्याचा तपास स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी डहाणू श्रीमती अंकिता कणसे यांनी स्वतःकडे घेतला. 

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग यांनी स्वतः तपास हाती घेतला व तांत्रिक माहितीच्या आधारे व गुप्त खबऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला असता संशयित आरोपी मिनाजुद्दीन अब्दुल अजीज मुल्ला उर्फ रवींद्र रेड्डी वय 26 वर्ष राहणार बागदा ठाणा, डायमंड हार्बर, दक्षिण 24 पर गणा राज्य , पश्चिम बंगाल असे असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीच्या शोधार्थ डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे ,पोलीस नाईक मनोज भरसट, पोलीस शिपाई सुरज लोहार असे पोलीस पथक आरोपीच्या मूळ गावी पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात आले . त्या ठिकाणी सतत सात दिवस राहून भाषेची समस्या असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिताफीने व कौशल्यपणास लावून आरोपींचे ठाव ठिकाणाची माहिती काढून आरोपी यास ताब्यात घेतले व ट्रांझिट ऑर्डर घेऊन त्यास मुदतीत डहाणू न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची  पोलीस कोठडी मंजूर केली .

संशयित आरोपी त्याच्याकडे त्या संदर्भात माहिती घेतली असता सदरचा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले व मीच अनिशाचा गळा दाबून खून केला अशी त्याने कबुली दिली सदर गुन्ह्यासंदर्भात संशयित आरोपी त्याच्याकडे माहिती घेतली असता तो कामधंदाच्या शोधात त्याच्या मूळ गावाहून पालघर जिल्ह्यातील डहाणू या ठिकाणी आला होता मिळेल ते काम करीत तो काम करत होता तो व त्याची प्रेयसी अनिशा रवींद्र रेड्डी उर्फ अनिशा बरस्ता खातून वय वर्ष 22 हे डहाणूतील लोणी पाडा, पाण्याचे टाकीजवळ पिंटू गुप्ता याच्या चाळीत भाड्याने राहू लागले होते .ते पतिपत्नी असल्याचे शेजाऱ्यांना भासवत होते . 

एकंदरीत  त्यांचा  खोटा संसार  सुरू होता परंतु त्यांच्या संसारामध्ये कुरबुरी होत असत आणि छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असल्याने त्यांच्यात  बेबनाव येत होता.  याला तो कंटाळला होता आणि प्रेयसी  ही छोट्या छोट्या कारणावरून आपल्याशी भांडत असते . लग्नाचा तगादा लावते याचा त्याला राग येऊ लागला होता म्हणून त्यांने त्या दिवशी रागाच्या भरात अगदी  क्षुल्लक कारणावरूनप्रेयसी अनिशा हिचा  गळा दाबला व ती  मेल्याची खात्री होताच  त्याने तिला घरामध्ये झोपवून तिच्या अंगावर चादर टाकून दरवाजा ओढून तो तिथून फरार झाला होता परंतु पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तूवर असणारे ठसे हे संशयित आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि आरोपीने सुद्धा आपला गुन्हा कबूल केला असल्याने पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला सात दिवसाची पोलीस कुठली सुनावली पोलीस कोठडी दरम्यान त्याने आपण हा गुन्हा का व कशासाठी केला याची सविस्तर माहिती दिली. 

सदर गुन्ह्यासंदर्भात बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर ,पंकज शिरसाट अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग ,रणवीर बयेस पोलीस निरीक्षक डहाणू पोलीस ठाणे ,सहायक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी ,पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे ,वाचक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सोनवणे ,पोलीस उपनिरीक्षक पवार ,सहायक फौजदार कुंदन तरे, पोलीस हवालदार खांडवी ,रासम ,नांगरे ,पोलीस नाईक मनोज भरसट, पोलीस नाईक धोडी ,पोलीस शिपाई सुरज लोहार ,पोलीस शिपाई कदम सर्व नेमणूक डहाणू पोलीस ठाणे तसेच पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई वाल्मीक पाटील नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी परिश्रम घेतले. 

सदर गुन्ह्याचा पुढल  तपास श्रीमती अंकिता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू या करीत आहेत.

-राजेंद्र वखरे