प्रेम प्रकरणातून मित्राने केला अल्पवयीन मित्राचा निर्घुण खून 

CRIME BORDER | 15 May 2024 06:38 AM

घाटकोपर : त्या दिवशी एक दक्ष नागरिक आपले काम संपवून त्याच्या घरी जात होता. तेव्हा त्याला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर माऊली मित्र मंडळ कार्यालयाच्या बाजूला डी.जी.क्यू.ए . कॉम्प्लेक्स समोर ,श्री सूर्यमुखी साई बाबा मंदिराजवळ ,इंदिरानगर गोळीबार रोड, घाटकोपर पश्चिम ,मुंबई या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा निपचित पडलेला दिसला .त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्या मुलावर कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी जखमी केल्याचे त्याला दिसले, असता त्याने तात्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली.

सदर ठिकाणी घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पोहोचले त्यांनी घटनास्थळी एक अल्पवयीन पंधरा-सोळा वर्षाचा मुलगा जखमी अवस्थेत पडलेला दिसला असता त्यांनी तात्काळ त्याला ॲम्बुलन्स बोलवून त्याला रुग्णालयात दाखल केले तो कोण ?व कुठला ? आहे याची पोलिसांना माहिती नव्हती.त्यावेळी साधारणतः साडेसात वाजले होते . त्या जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या मुलाला तात्काळ वैद्यकीय उपचाराकरिता राजावाडी रुग्णालय येथे आणले असता तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून दाखल पूर्व मयत असल्याचे घोषित केले.  सदर वेळी नमूद मुलाच्या खिशातील पाकिटातीत बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड मिळाले त्यावरून पोलिसांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले.पोलिसांनी त्या क्रेडिट कार्ड वरून महत प्रयासाने मयत मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता. गणेश साळवी  राहणार संजय गांधी नगर, लुंबिनी बुद्ध विहारा जवळ ,विक्रोळी पार्क साईट, मुंबई यांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले पोलिसांनी तात्काळ गणेश यांना त्यांच्या मुलांबाबत चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे असे सांगितले.

पोलिसांनी त्यांच्या लहान मुलाबाबत चौकशी केल्यावर ते म्हणाले की तो खेळायला गेला आहे परंतु पोलीस म्हणाले की तुम्ही जरा राजावाडी रुग्णालयात या म्हणून त्यांनी त्यास रुग्णालयात बोलावले  व  रुग्णालयात ठेवलेली डेड बॉडी त्यांना दाखवली असता त्यांनी ती ओळखली व ते म्हणाले की हा तर माझा लहान मुलगा सुरेश आहे त्याला बघून ते धाय मोकलून  रडू लागले पोलिसांना आता मयत मुलगा कोण आहे? याचा उलगडा झाला होता गणेश यांचा लहान मुलगा सुरेश असे त्याचे नाव होते तो अवघ्या सोळा वर्षाचा होता.

गणेश साळवी वय वर्ष ४९ हे एका ठिकाणी नोकरीवर आहेत ते विक्रोळी पार्क साईट मुंबई या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासह रहायला आहे त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी रीता वय वर्ष ४४ मुलगा संतोष वय २० वर्ष लहान मुलगा सुरेश वय वर्ष १६ असे रहायला आहेत तर त्यांची मोठी मुलगी रुपाली  वय वर्ष २३ ही तिच्या सासरी पतीसोबत राहते तर गणेश साळवी हे इंडियन ऑइल गॅस कंपनी मध्ये गॅस डिलिव्हरी चे काम करतात त्यांचा मोठा मुलगा हा एका खाजगी कंपनीत नोकरी करतो व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालतो सर्व कुटुंब एकंदरीत सुखी व समाधानी होते कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती.त्यांचा लहान मुलगा सुरेश हा महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चार पार्कसाईट येथे रात्र शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता त्याची शाळेची वेळ सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ अशी असल्याने तो रोज संध्याकाळी सहा वाजता घरातून शाळेसाठी निघत असे व शाळा संपल्यावर परत घरी येत असे. त्यादिवशी एप्रिल महिन्यातील रविवार असल्याने त्याच्या शाळेला सुट्टी असल्याने तो दिवसभर घरीच होता संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास तो त्याच्या आईला म्हणाला की मी जरा बाहेर खेळायला जाऊन येतो असे सांगून तो खेळायला बाहेर गेला रात्रीचे नऊ वाजले तरी तो घरी परत आला नव्हता .  गणेश साळवी यांच्या मोबाईल फोनवर घाटकोपर पोलिसांनी फोन करून त्यांना  राजावाडी रुग्णालयात तात्काळ यायला सांगितले आणि ते रुग्णालयात पोहोचले.राजावाडी रुग्णालयात उपस्थित असलेल्या घाटकोपरच्या पोलिसांनी गणेश साळवी यांना त्यांचा मुलगा सुरेश याच्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर हकीगत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी शवागृहातील स्ट्रेचरवर असलेला रक्ताने माखलेला मृतदेह दाखविला असता सदरचा मृतदेह हा त्यांनी त्यांचा मुलगा सुरेश याचा असल्याचे त्यांनी ओळखले त्यानंतर पोलिसांनी सांगितले की सदर मृतदेह हा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मित्र मंडळ कार्यालयाच्या बाजूला डी. जी.  क्यू.  ए. कॉम्प्लेक्स समोर श्री सूर्यमुखी साई बाबा मंदिराजवळ ,इंदिरानगर, गोळीबार रोड ,घाटकोपर मुंबई पश्चिम या ठिकाणी संध्याकाळी सात साडेसात वाजेच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळला असल्याने त्याला वैद्यकीय उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून दाखल पूर्व माहीत असल्याचे घोषित केले आहे . 

सदर प्रकरणी पोलिसांनी त्यांना सांगितले की संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे त्या मुलाच्या उजव्या डोळ्यावर छातीवर मानेवर हाताच्या दंडावर मनगटावर अशा गंभीर स्वरूपाच्या प्राण घातक जखमा असल्याचे दिसून आल्या सदर गंभीर स्वरूपाच्या प्राणघातक जखमा मुळे झालेल्या अतीरक्तश्रावामुळे सुरेश याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सदर अल्पवयीन मुलाचा खून कोण? व कशाकरता करेल? हा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता मयत सुरेश याच्या आई-वडिलांकडे विचारले की त्याचे कोणासोबत भांडण वगैरे झाले होते का यावर ते म्हणाले की त्याचे असे कोणासोबत भांडण वगैरे झालेले नव्हते तो परिसरात सर्वा सोबत चांगला राहत होता त्यामुळे पोलीस विचारात पडले  की सुरेशचा खून का बरे झाला असावा म्हणून पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावले व गुप्त माहिती काढायला सुरुवात केली असता पोलिसांना एकदम धक्कादायक  माहिती समोर आली.पोलिसांनी या गुन्ह्यात अधिक माहिती मिळवली असता या संदर्भात पोलिसांना समजले की मयत सुरेश याचा एक मित्र आहे त्याचे नाव ऋषिकेश असे असून तो १९ वर्षाचा आहे आणि हल्ली तो दिवा येथे मुंब्रा कॉलनीत रहायला आहे.  सुरेश व ऋषिकेश हे दोघे चांगले मित्र होते ते एकत्र राहायचे, खायचे ,प्यायचे, हिंडायचे, फिरायचे खेळायचे .ऋषिकेश याची एक प्रेयसी होती हे सुरेशला माहिती होते त्यांचे प्रेम प्रकरण बरेच वर्षे चालले पण ऋषिकेश च्या आई वडिलांनी मुंबई सोडून दिवा येथे राहायचा निर्णय घेतला व हे कुटुंब दिवा येथे एक वर्षांपूर्वी राहायला गेले त्यामुळे ऋषिकेशचे व त्याच्या प्रेयसीचे भेटणे मुश्किल झाले.  त्याच्या भेटीगाठी होत नव्हत्या त्यांच्यात या कारणावरून दुरावा निर्माण होत गेला आणि हळूहळू सुरेश व ऋषिकेशची प्रेयसी प्रियंका हि सुरेशच्या जवळ येऊ लागली आणि त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झाले. सदर प्रकरणाची माहिती ऋषिकेशला माहिती पडली व त्याला आपला मित्र सुरेश याचा खूप राग आला आपल्याच मित्राने आपलीच प्रेयसी पळवावी व तिला नादाला लावावे याचा भयंकर राग आला होता आणि म्हणून त्याने याचा बदला घेण्याचे ठरवले . त्याने त्या दिवशी गोड बोलून सुरेशला सोबत घेतले त्याने कमरेला एक धारदार चाकू घेतला व निर्जन स्थळी घेऊन जाऊन सुरेशला याचा जाब विचारला आणि त्याच्याबरोबर बाचाबाची झाली ऋषिकेशने सुरेशच्या पोटात अंगावर विविध ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले व त्याला तिथेच सोडून दिले त्या जखमामधून अतिरक्तस्रावामुळे सुरेशचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली.अज्ञात इसमाच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गणेश साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१८/२४ भा . द . वि कलम ३०२, सह १३७,(१),(आ) म पो का अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याचे नाव समजले होते तपासा दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ ७, मुलुंड मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व गुप्त बातमीदारा मार्फत सदर आरोपींचे नाव ऋषिकेश गणेश गुरव वय वर्ष १९ राहणार ठिकाण दिवा, जिल्हा ठाणे असे असल्याचे समजले म्हणून नमूद संशयित आरोपी याचा युनिट ७, गुन्हे प्रकटीकरण शाखा व गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई यांच्या मदतीने शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी दिवा मुंब्रा कॉलनी येथे मिळून आला .  त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली . 

या गुन्ह्या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पोलीस ठाण्याचे व. पो. निरी. बळवंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पो. निरी. (प्रशा.) सुशांत बडगर, पो. निरी.(गुन्हे) दिपाली कुलकर्णी यांनी त्यांचे सहकारी एपीआय कैलास तिरमारे, पो.  उप. निरी. , सुरेश पाटील,फिरोज करीम मुलाणी व शरद शेटे  यांच्यासह पो.  हवा.  विद्याधर  कोयंडे ,दीपक भारती देवारडे संदीप, पो.  शि.  सुरेंद्र भाकरे, संतोष तांगरे यांनी परिश्रम घेतले असून पुढील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पो.  उप. निरी.   सुरेश पाटील करीत आहेत. 

राजेंद्र वखरे