टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा आरंभ
डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचाराला मंगळवारपासून सुरुवात झाली टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडाकेबाज कामगिरी आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्याकडून झालेली विकास कामे या जोरावर मतदार आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवतील असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन झाले.
त्यानंतर मंगळवारी लगेचच विश्वनाथ भोईर यांनी टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत आपला निवडणूक प्रचार सुरू केला यावेळी मंदिर परिसरापासून वाजत गाजत भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्या त्या ठिकाणी स्थानिकांचा विश्वनाथ भोईर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तर कोविड नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत धडाकेबाज लोक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू असून ती पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील जनता आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवणार असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला या रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे विधानसभा संघटक मयूर पाटील संजय पाटील महिला शहर संघटक नेत्रा उगले माजी नगरसेवक जयवंत भोईर संतोष आप्पा तरे माजी नगरसेविका वैशाली भोईर उपशहर प्रमुख विजय देशेकर युवा सेना उपशहर प्रमुख विकास भोई शाखाप्रमुख रोशन चौधरी यांच्यासह किरण पाटील अशोक चौरे बबलेश पाटील नीता देशकर असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते