कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या अहवालाचे प्रकाशन-  महायुतीची कामे हीच ओळख 

CRIME BORDER | 14 November 2024 06:34 AM

कल्याण : शिवसेना शिंदे गट व भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युतीच्या संयुक्त घटक पक्षातर्फे 18 ऑक्टोबर 2024 रोजी कल्याण पश्चिम महाजनवाडी सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ,जिल्हाप्रमुख अरविंद मोरे ,शहर प्रमुख रवी पाटील ,माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, मोहन उगले, जयवंत भोईर ,किरण समीर ,नेत्रा उगले ,भाजपचे माजी नगरसेवक वरूण पाटील, सुनील खारुक व सेना-भाजपा राष्ट्रवादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार ,शिवसेना शिंदे गट विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रवी पाटील एकाच व्यासपीठावर दिसून आले विशेष म्हणजे व्यासपीठावर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर इच्छुक उमेदवार रवी पाटील हे आगामी पश्चिम विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी धडपडत आहेत .आजच्या पत्रकार परिषदेत हे तिघे एकत्र दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आहे परंतु अद्याप कल्याण पश्चिम 138 विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा खरा उमेदवार कोण आहे? कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून स्थानिक वाद मिटला का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्व मतदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे .

कोण लढविणार विधानसभा मतदारसंघाची रणभूमी ?महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकारी पातळीवर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे लवकरच जाहीर होणार आहे .निवडणुकांचे बिगुल वाजले असल्या कारणाने कल्याण पश्चिमेतील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजूट असल्याचे पत्रकार परिषदेत दिसून आले .उमेदवार घोषित झाल्यावर महायुतीत बिघाडी होते का ? हे आहे औत्सुक्याचे ठरणार आहे