ह.भ.प. रमेश काठे यांची क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर नियुक्ती
ह.भ.प. रमेश काठे यांची क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर नियुक्ती जाहीर करतांना क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे
डोंबिवली प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर वृत्तपत्राच्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील प्रख्यात उद्योगपती ह.भ.प. रमेश झिपरु काठे यांच्या सामाजिक/आध्यात्मिक /पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी सदर मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे. ते गेल्या ६ वर्ष पासून क्राईम बॉर्डर परिवारात कार्यरत आहेत . ते गेल्या काही वर्षपासून ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत होते . त्यांची आता पदोन्नती करण्यात आली आहे .
ह.भ.प. रमेश काठे यांना सामाजिक/आध्यात्मिक /पत्रकारिता व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
ह.भ.प. रमेश काठे यांची क्राईम बॉर्डर च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर नियुक्ती जाहीर करतांना क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे