ओम साईराम शासकीय कर्मचारी ग्रुपचा उपक्रम 'एक घर, एक अधिकारी'

CRIME BORDER | 23 September 2024 07:54 AM

एरंडोल ( निलेश चौधरी ) :- एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवासी परंतु बाहेरगावी पोलीस व भारतीय सैन्यात तसेच जी आरपीएफ मध्ये कार्यरत असून यांनी स्वखर्चाने 'एक घर, एक अधिकारी' हा उपक्रम ४ वर्षापासून सुरु केलेला आहे. यांच्यातर्फे १ सप्टेबर २०२४ रोजी श्री . संत सदगुरु गोविंद महाराज स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. कासोदा येथील सर्व शाळेमधील एकूण ३८९ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. यात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा या ग्रुपतर्फे बक्षीस वाटप करण्यात आले.

                या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचप्राणेश्वर अभ्यासिकाचे सर्वेसर्वा पांडुरंग पाटील, निवृत्त कृषि सहाय्यक हे होते. प्रमुख्य व्याख्याते म्हणून नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील व अमळनेर येथील परिक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार हे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर भाऊ चौधरी व जळगांव जिल्हा ग्रामीण पत्रकार लोकमत संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक केले.

                  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच पुरुषोतम चौधरी, मधुकर चौधरी, क्राईम बॉर्डर चे  जळगांव जिल्हा प्रतिनिधी  निलेश चौधरी, एरंडोल पोलीस स्टेशन चे पो. उप. निरी.  खोगे , संजय बोरसे, उज्ज्वला बाविस्कर, मुख्याध्यापिका वंदना चौधरी, जळूचे सरपंच गुलाबराव पाटील, डॉ. पी. जि. इंगळे, चुडामन जाधव व सर्व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलदीप पवार व सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी केले.

                   तर आभार ओम साईराम शासकीय ग्रुपचे सदस्य राहुल सोनवणे यांनी मानले. यशस्वी विद्यार्थी कौस्तुब वडगावकर, भावेश गायकवाड, तनिषा पाटील, करण पाटील, पूर्वा पाटील, दिव्या पाटील, मोहित पाटील, वर्षा मराठे, चेतन देवकर, खालीद बेग, महेश दाभाडे, नुतन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम भारती विद्या मंदिर कासोदा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमास परिसरातील सर्व शाळेचे मुख्याध्यापका, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी ओम साईराम ग्रुपचे सदस्य राहुल सोनवणे, अरुण चौधरी, प्रवीण चौधरी, योगेश चव्हाण, प्रविण शांताराम चौधरी, तुषार चौधरी, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.