रमेश कदम यांची क्राईम बॉर्डर च्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती
रमेश कदम यांची क्राईम बॉर्डर च्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती जाहीर करतांना क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे
डोंबिवली प्रधान कार्यालय : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील रमेश लक्ष्मण कदम यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.
रमेश कदम यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.