मु .जे.महाविद्यालयात महाराष्ट्र योग शिक्षक संघ आयोजित गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

CRIME BORDER | 16 July 2025 10:18 AM

 कु.प्राजक्ता चौधरी /नयना चौधरी यांजकडून 

जळगाव : गुरु पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा गुरुपौर्णिमा उत्सव मु .जे.महाविद्यालयाच्या सोहम योग डिपार्टमेंट मध्ये साजरा करण्यात आला .याप्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या अध्यक्षा चित्रा महाजन , सोहम योग डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉ. देवानंद सोनार, संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे  विभागप्रमुख सुनील गुरव,  प्रमुख पाहुणे मोहन चौधरी सर उपस्थीत होते.  

 

डॉ. प्रिती पाटील यांनी ओंकार प्रार्थना आणि गुरुवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगून महर्षी व्यास यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. गुरूंचे जीवनातील महत्त्व याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केली. 

 

निरामय योग केंद्राच्या संचालिका नीलिमा लोखंडे यांच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना व गुरुवंदना सादर केली, योगशिक्षिका प्रिया दारा यांच्या विद्यार्थ्यांनी शिवस्तुती सादर केली. सुत्रसंचालन ॲड. स्वाती निकम तर प्रास्ताविक प्रा. चित्रा महाजन,  तर योग शिक्षिका अर्चना गुरुव यांनी आभार प्रदर्शन केले. शांतीपाठ करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन चौधरी, कविता चौधरी, व सोहम योग डिपार्टमेंटचे सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

nc