दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी-नाभिक समाजाला नाभिक समाज संघटना डोंबिवलीचे आवाहन 

CRIME BORDER | 19 August 2025 06:22 AM

डोंबिवली : - नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या वतीने दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी पाच वाजल्यापासून समाजाच्या हॉलमध्ये केलेले आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आणि वेळेच्या अभावामुळे सर्वांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून आमंत्रण देता येणे शक्य नाही . 

याबद्दल नाभिक समाज बंधू भगिनींची  क्षमा मागून या क्राईम बॉर्डर च्या वृत्तानुसार आपल्या सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे.  या सर्वांनी सदर बातमी हेच आमंत्रण समजून आपल्या परिवारासह या कार्यक्रमाला आवर्जून हजर  राहावे त्याचबरोबर सदर बातमी आपल्या समाज बांधवांपर्यंत  व आपल्या मित्रमंडळी पोहोचवावी .  

जेणेकरून त्या सर्वांना या कार्यक्रमाला हजर राहता येईल असे आवाहन नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.