योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार यांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे दिल्लीचे निमंत्रण

जळगाव :- येथील मु.जे .महाविद्यालयाच्या सोहम विभागाचे संचालक आणि आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार यांना दिल्ली येथे आयोजित स्वातंत्र्य दिन दिनांक .15 ऑगस्ट 2025 येथे मुख्य कार्यक्रमात आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा विशेष अतिथी म्हणून सपत्नीक निमंत्रण करण्यात आले. आहे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना संबोधित असणार आहे त्याचबरोबर दिनांक 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथील मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान योग प्रमाणीकरण मंडळ आयुर्वेद संस्थान पंतप्रधान संग्रहालय आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या स्थळांना भेटीचे सुद्धा आयोजन करण्यात आल्याचे आयुष मंत्रालय भारत सरकार द्वारा कळविण्यात आले आहे.