तृतीयपंथीय संदर्भात अनेक गैरसमज ,डॉ. योगा नंबियर यांचे व्याख्यान संपन्न ,रोटरीचा पुढाकार

रोटेरियन - प्रशांत दामले - पत्र पेटी
आपल्या समाजामध्ये तृतीयपंथीय संदर्भात अनेक गैरसमज आहेत. आपण त्यांच्याकडे घृणास्पद नजरेने बघतो.हेच गैरसमज दूर व्हावेत आणि तृतीयपंथीय लोकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे सांगण्यासाठी डॉ. योगा नंबियर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम दिनांक २४ जून,२०२५ रोजी शुभम बँकवेट, डोंबिवली येथे पार पडला. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी यांनी डोंबिवली नॉर्थ, डोंबिवली विनर्स, डोंबिवली अपटाउन आणि डोंबिवली सिटी या रोटरी क्लब्सच्या सहकार्याने आयोजित केला होता.
याप्रसंगी, जिल्हाध्यक्ष श्री. दिनेश मेहता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. योगा नंबियार यांनी 'Transgender and their life' या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले. तसेच त्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही विवेचन केले. बरोबरच, त्यांच्या संस्थेतर्फे तृतीयपंथीय लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला DCC सौ किर्ती वडाळकर, DCEO श्री. शिरीष सोंगडकर, तसेच चार ही क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, डॉ. योगा यांच्या संस्थेला रोटरी क्लबतर्फे देणग्या देण्यात आल्या.