मिसळ पाव

CRIME BORDER | 12 September 2022 10:42 PM

साहित्य-पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, हिंग, लिंबूमोहरी, हळद, कढीपत्ता, मीठ, तेल, फरसाण.

कृती- मोड आलेली मटकी भाजून घ्या. कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका. अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता. त्यानंतर धान्य टाका. गरम पाणी टाकून गरम मसाला घाला. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू व फरसाण टाकून पावसोबत सर्व्ह करा.