व्यक्ती विशेष : अंतरंग आणि काचेचा चंद्र - लिलाधर कांबळीं च्या निमित्ताने : राजन शंकर कोठारकर
मी तेव्हा २००५ साली आविष्कारची - आकार(गांधी आंबेडकर-प्रेमानंद गज्वी;गांधी विरूद्ध गांधी-अजित दळवी;आणि हत्या एक आकार की-ललित सेहगल; या ३ नाटकांच कोलाज);सापडली युक्ती सापडली-विभावरी देशपांडे आणि न आलेल १ नाटक अशी ३ नाटके तालमी आणि प्रयोग करत होतो तेही नट म्हणून मेटा अवार्ड पर्यंत गेलेल्या-चेतन दातार दिग्दर्शित(त्याचं शेवटचं नाटक "संगीत गिरीबाला" साठी ;चेतन दा ची मदत करता करता त्याला म्हटलं बदलापूर ला असंच workshop घेता येईल का?अंबरनाथ,बदलापूर,कर्जत च्या अनेक इच्छुक होतकरू कलाकारांना माहीमला आविष्कार ला येणं शक्य होत नाही मी तेव्हा बदलापूरला राहायला होतो आणि माहीमला तालमीना रोज जायचो याचंच त्याला अप्रूप होत त्याने मिनिटभर माझ्याकडे बघून म्हटलं तू मुलं जमव,तारीख ठरव,मी येईन झालं मी जाहीरात zerox बदलापूरात सर्वत्र रात्रभर चिकटवल्या ; त्यावेळी 2005 ला whatsapp / facebook वैगेरे असलं काही नव्हतं ७५ मुलं;(कलाकारांनी) नावे नोंदवली.
बदलापूर पूर्व स्टेशन जवळचा संजीवनी हाॅल महीनाभरासाठी बुक केला;त्याला कळवलं तसं; तर त्याने हात वर केले माझी तब्येत बरी नसते इतक्या लांब मी कसं येणार तूच Conduct कर Workshop इथे आपण करतो तसंच शिकवं,जमेल तुला,मिश्किल हसत तो म्हणाला माझ्यासाठी हा धक्काच होता आणि challenge ही किंवा कदाचित जबाबदारीही -अंतरंग थिएटर्स- असं नाव ठेवलं; पण उदघाटन कोणाच्या हस्ते करायचं ?,मी पुन्हा त्यालाच गळ घातली.
ठाण्यापासून कर्जत पर्यंत सन्मानाने बोलावता येतील असे कुणी ज्येष्ठ रंगधर्मी नाहीयत का ? शोध तू असे उलटे सुनावले त्याने ओळख नसतानाही रोटरी क्लब च्या बदलापूरातील ताम्हाणेंचा कसा काय तो अचानक फोन आला,म्हणाले तुम्ही गाडी ची व्यवस्था करा फक्त,मी लिलाधर कांबळीजी ना घेऊन येतो उद्घाटनाला तेव्हा माझ्याकडे गाडीच काय,साधी सायकलही नव्हती जिग्नेश गुप्ता या माझ्या मित्राचे(नेरळ मधील पत्रकार) वडील स्वयंप्रेरणेने तयार झाले, त्यांच्या गाडीने त्यांना घेऊन आले व लीलाधरजींच्या हातून श्रीफळ फोडून आणि ज्योत प्रज्वलित वैगेरे सोपस्कार करून अंतरंग थिएटर्सची स्थापना झाली.
वर्कशाप आणि नाट्य प्रशिक्षक म्हणून माझी सुरुवात झाली त्यावेळच्या लीलाधरजींच्या भाषणात " मी शक्यतो कुठल्या कार्यक्रमाना जात नाही, पण राजन कोठारकर बद्दल जे चेतन ने सांगितलं म्हणून नवीन "अंतरंग" तयार करायला आलोय हे ऐकलं आणि माझे गुरू चेतन दातार यांची ही पडद्यामागची अनोखी लीला आणि connections आणि त्याच्या अंतरंगातला plan तिन्ही लक्षात आलं १५ वर्षात अंतरंग Theatres workshops मधून अनेक कलाकार दिग्गज झाले;सवाई झाले; सिरीयल झाले आणि काही काही झाले, घडले अंतरंग थिएटर्स आणि श्री स्वामी प्राॅडक्शन्स ही होऊन १ चित्रपट ९ नाटके,अनंतकोटी सारखं आगळया शैलीचं चरीत्र नाटक आणि एकंदर ३५०० हून अधिक प्रयोग झाले बहरले पण त्याचे रोप याच काचेच्या चंद्राने लावले हे आमचं अहोभाग्यच ! भावपूर्ण श्रद्धांजली
- राजन शंकर कोठारकर : अंतरंग थिएटर्स आणि श्री स्वामी प्राॅडक्शन्स परीवार