ज्ञानमंदिर शाळेला रोटरी मिडटाऊनची मदत

डोंबिवली : " सत्यम् शिवम् सुंदरा " प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात आई नंतर शिक्षक आणि घरानंतर शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच. म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते. प्रकल्प सुद्धा शाळेतीलच आहे. तर या ज्ञानमंदिराचे नाव आहे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - रामोसवाडी ता.जुन्नर जिल्हा - पुणे. पहिली ते चौथी एकूण विद्यार्थी संख्या ४२ आणि मुख्याध्यापक आहेत सौ. वनिता गडगे. जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळे डिजिटलीकरण काही अंशी नसल्यातच जमा, शासना कडून रोज रोज नवीन शालीय व्हिडिओ, जागतिक माहीत पट, पीडीएफ फायली येत असतात त्याच प्रमाणे शिक्षक स्वतः रिसर्च करून डिजिटल साहित्य मिळवत असतात. आणि हे डिजिटल साहित्य मुलांना दाखवण्या साठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते, त्यांच्याकडे हे डिजिटल साहित्य मुलांना दाखवण्यासाठी कुठलेच साधन नाही.
रोटरी मिडटाऊन क्लब मार्फत मुलांना हे डिजिटल साहित्य दाखवण्यासाठी हुशार (स्मार्ट) टेलिव्हिजन दिला आपणही याच प्रकारच्या विद्यामंदिरातून आलो आहोत याचा मनात कुठे तरी आपुलकी, जिव्हाळा नक्कीच असल्यामुळे आपल्या क्लब मधील योगिता व कैलाश सोनावणे, अजय कुलकर्णी, डॉक्टर गिरीश वालीयारे, विकास डोके, प्रदिप बुडबाडकर, सुहास आंबेकर, संदीप जाधव, डॉक्टर मनोहर अकोले, संदीप खापरे या सभासदंनी मुक्त हस्ते मदत केली. शनिवारी दिनांक १९/०६/२०२१ रोजी आम्ही रामोसवाडीतील या शाळेत टेलिव्हिजन देण्यासाठी गेलो. तर आमच्या स्वागतासाठी शाळेत मुख्याध्यापक, त्या गावातील काही निवडक माणसे , काही पालक आमच्या आधी हजर होते. टेलिव्हिजनचे आणि शालेय पुस्तकांचे लोकार्पण केल्या नंतर आपले अध्यक्ष कैलाश सोनावणे, अजय कुलकर्णी, डॉक्टर गिरीश वालीयारे, डॉक्टर मनोहर अकोले यांनी आपलया रोटरी क्लब डोंबिवली मिडटाऊनच्या कार्याबद्दल सर्व माहिती त्यांना दिली. त्याच प्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वनिता गडगे यांनी शाळेच्या मागील आणि पुढील वाटचालीची संपूर्ण माहिती आम्हाला दिली. सदर शाळेचा सभापती गुणवत्ता यादीत जुन्नर तालुक्यात दुसरा क्रमांक आहे. गावकऱ्यांच्या, शाळेतील मुलांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या भरपूरशा शुभेच्या घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. शिक्षकांचे समाधानी चेहरे आमच्या डोळ्यात होते आणि कर्म केल्याचा आनन्द हृदयात.