युवा नेतृत्व मदतीसाठी धावून जाणारे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष बंटी (भाऊ) नेरपगारे

डोंबिवलीहून CRIME BORDER मुख्य संपादक, मा.विशेष कार्यकारी अधिकारी,राजेंद्र वखरे व्यक्ती विशेषसदरात लिहतात आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या जाती जमाती गुण्यागोविंदाने नांदताहेत. परतुं आजही अनेक समाजामध्ये गरिबीही प्रकर्षाने जाणवते .मुलभूत गरजाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही अन्न, वस्त्र ,निवारा व शिक्षण या मूलभूत गरजांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.आपल्या राष्ट्रीय महापुरुषांनी राष्ट्रीय मानवता ,एकता आपल्या देशात कशी नांदेल यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. एवढेच नव्हे तर विविध समाजातील अनेकांनी देश स्वातंत्र्यासाठी बलिदाने दिलेले आहेत, परंतु ब्रिटिशकालीन अन्याय व अत्याचार ,स्वातंत्र्यासाठीचा लढा ज्यांनी ज्यांनी लढला त्यांनाच त्याचा त्रास माहिती आहे ,परंतु त्यांनी आपल्या येणार्या पिढ्यांसाठी बलिदान दिले ते मात्र आपण सोयीस्कर पणे विसरलेलो आहोत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपल्या देशात सुख शांती नांदावी यासाठी प्रत्येक भारतीयांचे व प्रत्येक समाजातील व्यक्तींचे कर्तव्य आहे .जे शिक्षित आहे त्यांनी इतरांना शिक्षित केले पाहिजे परंतु दुर्दैवाने जे शिक्षित आहे ते आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही तसेच जे पुढारी आहेत तेही आपले कर्तव्य विसरलेले दिसत आहे पण सर्वच पुढारी नेते सारखे आहेत असं म्हणता येणार नाही.समाजकारणासाठी नव्या तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे पण तसे होताना दिसत नाही परंतु आजही असे तरुण युवक आहे की ते समाजासाठी झोकून देताना आपल्याला दिसतात.
नाभिक समाजाला इतिहास आहे संत सेनाजी महाराज, हुतात्मा वीर भाई कोतवाल , वीर जीवाजी महाले असे अनेक आपल्याला सांगता येतील.आज प्रत्येक समाजाच्या संघटना आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही नाभिक समाजासाठी कार्यरत आहे. आता अलीकडे नाभिक समाजाच्या अनेक संघटनाही कार्यरत आहेत जो तो आपापल्या परीने काम करतो परंतु निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या युवक-युवतींची समाजाला गरज आहे. देखाव्यासाठी पद घेणारे अनेक आहेत. परंतु कार्य करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तरुण युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी शभाऊ ) नेरपगारे यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली तेव्हांपासून त्यांनी जळगाव जिल्हा पिंजून काढला व सर्वांच्या समस्या जाणून ते त्यावर कार्य करीत आहेत .त्यांनी विविध योजना आखल्या असून त्यासाठी ते जुनेजाणते समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच युवा तरुण-तरुणींच्या ते संपर्कात राहून नियोजन करताना दिसतात. (त्यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका बैठका घेऊन जिल्हाध्यक्ष समाजबांधवांच्या दारी हा उपक्रम राबविला) .
रवींद्र (बंटी) नेरपगारे,जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र नाभिक महामंडळ. जळगांव जिल्हा प्रभाग समिती सदस्य म.न.पा. जळगांव पदावर कार्यरत आहेत.पण त्यांनी कधीही आपल्या पदाचा टेंभा मिरवलेला दिसत नाही .ते समाजातील बांधवांच्या झोपडीत जाऊन त्यांच्याशी बोलतात त्यांच्या समस्या जाणून घेतात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या पाठीशी ते उभे राहतात.
जळगाव शिवारातील एका समाज बांधवावर गावातील धनदांडग्यांनी शेताच्या बांधावर अन्याय केला असता. त्यांच्या बाजूने कोणीही उभे नव्हते त्या वेळेस पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर व महाराष्ट्र नाभिक चे संस्थापक संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांच्याशी वार्तालाप करून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ही विनंती केली असता रवींद्र (बंटीभाऊ) नेरपगारे यांनी ताबडतोब त्यांच्यासोबत कमिटी घेतलीव थेट अन्यायग्रस्त समाजबांधवांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना तात्काळ मदत केली.
हल्ली लॉक डाऊन मुळे नाभिक समाजाचे प्रचंड हाल होतांना दिसत आहेत. आजही नाभिक समाज हा शिक्षणापासून वंचित राहिला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये नववी दहावीपासूनच पालक विद्यार्थ्यांच्या हाती वस्तारा देतांना आपल्याला दिसतात .अनेक खेड्यापाड्यांमध्ये एक किंवा दोन घर वगळता आपली जास्त वस्ती नाही. त्यांच्यावर अन्याय ,अत्याचार झाला तर समाजाचे पुढारी त्यांच्या पाठीशी उभे राहत नव्हते असे चित्र गेल्या अनेक वर्षापासून दिसत होते . (याला काही चांगले पदाधिकारी अपवाद आहेत ) परंतु आता जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाज हा एकत्र झाला असून नाभिक समाजातील दुफळीही कमी होताना दिसत आहे.
बंटीभाऊंना कोणतेही काम सांगा ते नाही म्हणत नाही ,काम कोणतेही असो ते हजर असतात नुकतेच जळगाव येथे एका नाभिक समाजातील व्यक्तींच्या दवाखान्यातील बिला संदर्भात मी फोन केला असता तासाभरात ते त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी त्यांच्या वतीने बिल कमी केले.
अशा या हरहुन्नरी व तरुण तडफदार तसेच समाजाच्या बांधवांसाठी तात्काळ पाठीशी उभे राहणार्या बंटी भाऊ नेरपगारे मुळे जळगाव जिल्ह्यात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. लवकरच सर्व समाज हा बंटी भाऊ एका माळेत ओवतील यात शंकाच नाही .त्यांच्यासारखे पदाधिकारी युवा नेते,अनेक कार्यकर्ते समाजाला आवश्यक आहेत . अन्याय ग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणारे असे तरुण युवक ,युवती ,पुढारी, कार्यकर्ते तयार झाले तर कुणीही समाजाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही .यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून बंटी भाऊ च्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक तरुण युवक युवती तसेच गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारे असणारे पदाधिकारी सुद्धा नव्या जोमाने कार्य करताना दिसत आहेत.
जळगाव जिल्ह्यात नाभिक समाजासाठी नाभिक समाज भवन गरजेचे आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नाभिक समाजाचे वस्तीगृह असणे गरजेचे आहे .त्याचबरोबर प्रशासनात आपल्या समाजातील तरुण-तरुणींनी जायला पाहिजे त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे राहण्याची, खाण्यापिण्याची व क्लासची व्यवस्था जर झाली तर प्रशासनात नाभिक समाजाचे अनेक तरुण-तरुणी दिसतील .यासाठी सर्वांनी एकत्र येऊन तसेच शासनाची व राज्यकर्त्यांची तसेच दानशूर व्यक्तींची मदत घेऊन हे कार्य बंटी भाऊ लवकरच हाती घेतील अशी आशा बाळगू या.
राजेंद्र वखरे , मा. विशेष कार्यकारी अधिकारी
संस्थापक अध्यक्ष : क्राईम बॉर्डर व महाराष्ट्र नाभिक , कल्याण-डोंबिवली व्हिजन (वृत्तपत्र) ,श्री स्वामी सखा (मासिक), पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट , क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ,संस्था (एन.जी.ओ )डोंबिवली