पोलीसातील माणूस दीपावली विशेषांक २०२१ साठी क्राईम बॉर्डर चे साहित्यिकांना आवाहन 

CRIME BORDER | 13 September 2022 01:28 PM

CRIME BORDER NEWS NETWORK

डोंबिवली (मुख्यालय) : कल्याण येथून गेल्या ११ वर्षापासून प्रकाशित होत असलेले  पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर महाराष्ट्रातील तमाम ज्येष्ठ / नवोदित साहित्यिक कवी यांना नम्र आवाहन करीत आहे की, पोलीसातील माणूस दीपावली विशेषांक २०२१ साठी आपले अप्रकाशित साहित्य मोबाईल टायपिंग करुन पाठवावे.

 

साहित्य आपण टायपिंग करून पोस्ट, कुरियर किंवा ई-मेलने ही पाठवू शकता. साहित्यासोबत परतीचे पोस्टेज अथवा पत्रोत्तरासाठी पाच रुपयाचे दोन स्टॅम्प असणे आवश्यक आहेत, ते नसल्यास कोणत्याही पत्राचे उत्तर दिले जाणार नाही. खास करून कवींनी याची नोंद घ्यावी.साहित्य पुन्हा पुन्हा वाचून शुद्ध केलेले असावे, चुका राहू देऊ नयेत ,तसेच झेरॉक्स पाठवू नयेत.

 

साहित्यांच्या प्रत्येक पानावर अनुक्रमांक असावा साहित्याच्या अगोदर आपले पूर्ण नाव, पत्ता ,फोन नंबर, मोबाईल नंबर व ई-मेल अवश्य असावा.साहित्य मिळताच २१ दिवसात त्याची पोच दिली जाईल व त्यानंतर च्या ४५ दिवसातच त्याबद्दलचा निर्णय कळविला जाईल, त्यासाठी पत्रोत्तराचे पोस्टेज नसल्याच साहित्य निकालात काढण्यात येईल .

 

आम्ही उत्तम ,दर्जेदार साहित्य असणाऱ्यांनाच प्रोत्साहन देतो असे नाही ,तर नवोदितांनाही आम्ही मार्गदर्शन करून प्रसिद्धी देतो.आपण आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे.

 

 क्राईम बॉर्डर मुख्यालय  : आई द्रोपदा बिल्डींग, ३०४, साई बाळाराम कॉम्प्लेक्स समोर ,खंडोबा मंदिर रोड डोंबिवली (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे . मुख्य संपादक मोबा. ९६१९६३००३५ / ९९८७४९६१३६

Email- crimeborder@gmail.com