महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे काय ?

CRIME BORDER | 11 September 2022 04:14 AM

महाराष्ट्राची ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये विभागणी केली याला महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग असे म्हणतात.

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती व कोणते आहेत?

महाराष्ट्राचे एकूण प्रादेशिक विभाग पाच आहेत आणि ते पुढील प्रमाणे आहेत:-

1) विदर्भ 

विदर्भ हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील पहिला प्रादेशिक विभाग आहे या मध्ये २ प्रशासकीय विभाग येतात नागपूर विभाग आणि अमरावती विभाग. 

महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण ६ जिल्हे येतात ते म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली होय.

महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण ५ जिल्हे येतात ते म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम होय.

महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये एकूण 11 जिल्हे येतात. (6 जिल्हे नागपूर विभागात आणि 5 जिल्हे अमरावती विभागात येतात.)

2) मराठवाडा 

मराठवाडा हे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील दुसरा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे औरंगाबाद विभाग.

महाराष्ट्राच्या मराठवाडा या प्रादेशिक विभागामधील औरंगाबाद या प्रशासकीय विभागात एकूण ८ जिल्हे येतात ते औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी होय.

3) खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग 

खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील तिसरा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे नाशिक विभाग.

खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागातील नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण ५ जिल्हे येतात ती पुढील प्रमाणे आहे : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर.

4) कोकण 

कोकण हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील चौथा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे कोकण विभाग.

कोकण या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागामधील कोकण या प्रशासकीय विभागात एकूण ७ जिल्हे पुढील प्रमाणे येतात : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

5) पश्चिम महाराष्ट्र

कोकण हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील पाचवा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे पुणे विभाग.

पुणे विभाग या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागामध्ये ५ जिल्हे पुढील प्रमाणे येतात: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.