यशोगाथा-हॅंडीकॅप तरुणाने घडवला इतिहास-दररोज २२५ कि.मी.चा प्रवास
CRIME BORDER | 31 January 2022 07:30 PM
Warning: Undefined variable $getNews in /home/crimebod/public_html/popular_news.php on line 77
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/crimebod/public_html/popular_news.php on line 77
हॅंडीकॅप तरुणाने घडवला इतिहास - CRIME BORDER NEWS NETWORK -
राजेंद्र वखरे यांनी शब्दबद्ध केलाय ठाणे जिल्ह्यातील एकमेव राणावत डायमंड फॅक्टरीच्या विक्रमजी राणावतचा थक्क करणारा प्रवास
मुलाखतकार : विक्रमजी राणावत आपले यशोगाथा - ग्रेट व्हिजिट सदरातील मुलाखतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
विक्रमजी राणावत : धन्यवाद
मुलाखतकार : विक्रमजी आपलं मूळ गाव कोणतं आहे.
विक्रमजी राणावत : आमचं मूळ गाव हे राजस्थान आहे, परंतु माझे आजोबा, वडील हे डोंबिवली मध्येच राहायला आहेत म्हणजे आमची ही तिसरी पिढी डोंबिवलीत असल्याने मी डोंबिवलीकर आहे असं म्हणायला हरकत नाही. माझा जन्म सुद्धा डोंबिवलीमध्ये झालेला आहे.
मुलाखतकार : विक्रमजी आपले प्राथमिक शिक्षण कुठे झाले?
विक्रमजी राणावत : माझं प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतील एन.एस.इ. एस. मध्ये तर सेकंडरी चे शिक्षण डी.एन.सी. हायस्कूल मध्ये झाले.बारावी सायन्स नंतर उल्हासनगर येथील के.एम. कुंदनानी याठिकाणी मी फार्मसी चा कोर्स २००२ साली पूर्ण केला..
मुलाखतकार : विक्रमजी आपण मूळचे राजस्थान येथील आहात परंतु आपले पूर्वज डोंबिवलीमध्ये व्यापारा निमित्त कोणत्या वर्षी आले.
विक्रमजी राणावत : आमचे पूर्वज १९७६ साली डोंबिवलीत आले. माझ्या बाबांनी यापूर्वी राणावत मेडिकल सुरु केले होते. या माध्यमातून लोकांची सेवा घडावी हा त्या मागचा उद्देश होता.
मुलाखतकार : आपल्या कुटुंबाबद्दल काय सांगाल.
विक्रमजी राणावत : माझे वडील व ५ काका आणि त्यांच्या पाठी आम्ही एकूण ९ मुलं असा आमचा परीवार आहे.
मुलाखतकार : मुलांनी शिकून कोणता व्यवसाय करावा त्यांनी काय करावं असं तुमच्या बाबांना वाटत होतं.
विक्रमजी राणावत : माझ्या वड़िलांना व कुटंबाला असे वाटत होते की, आम्ही सर्वानी फार्मासिस्ट व्हावे. आमच्या डोंबिवली मध्ये एकूण ४ ब्रांचेस कार्यरत होत्या. त्यातील मानपाडा येथील मुख्य ब्रांच होती. साधारणत: ५० वर्षे आम्ही मेडिकल व्यवसायात होतो..
मुलाखतकार : विक्रमजी आपण कोणतं शिक्षण घेतलं आणि मेडिकल फील्ड मध्ये आपण किती वर्ष काम केलं?
विक्रमजी राणावत : आमचं मेडिकल असल्या कारणाने मी स्वत:फार्मसी केलेले आहे. मेडिकलचं प्रशिक्षण घेवून जवळजवळ २० वर्ष मी मेडिकल फील्डमध्ये काम केले आहे. मी १२ वर्षाचा असतानांच मेडिकल मध्ये माझ्या वडिलांना मदत करीत होतो.
मुलाखतकार : तुम्ही किती भाऊ आहेत.
विक्रमजी राणावत : मला एक भाऊ आहे मी मोठा आहे व तो लहान मी विसाव्या वर्षी फार्मसीची डिग्री घेतली.
मुलाखतकार : राणावत डायमंड फॅक्टरीचा जन्म कुठे,कधी व कसा झाला?
विक्रमजी राणावत : खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. माझं लग्न २००६ साली झालं होतं.मी माझ्या मिसेजला घेऊन हनिमून साठी काश्मीरला गेलो होतो. त्या ठिकाणी मला प्रश्न पडला की, नीलम या स्टोनचे दोनशे मिली ग्रेमचे लोकं हे दोन लाख रुपये कसे देतात. मग मी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने राणावत डायमंड फॅक्टरीचा जन्म काश्मीर येथे २२ जून २००७ साली झाला.यासाठी मला जेमॉलॉजी करावी लागली. नंतर जयपूर येथे जाऊन शिकलो त्यानंतर जी आय ए इंन्स्टीस्टबूट ऑफ अमेरिका तेथून मी 'मोती'चे डीप नॉलेज घेतले.
मुलाखतकार : विक्रमजी सर्व सामान्यांच्या माहितीसाठी सांगा की, डायमंडसाठी नेमकं शिक्षण काय असतं त्याचा फायदा काय आहे?
विक्रमजी राणावत : खूप छान आणि मौलिक प्रश्न विचारलाआहे. प्रत्येक खड्याची एक भौतिक रचना असते. त्याच्यातील ग्रेव्हिटेशनल फोर्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटीज ,ते खड़े कुठल्या फॅमिलीशी बिलॉँग करतात याचा सर्व तपशीलवार अभ्यास केल्या जातो.
मुलाखतकार : नीलम, हिरा, माणिक, पाचू, हा काय प्रकार आहे त्याबद्दल काय सांगाल.
विक्रमजी राणावत : हिरा, माणिक, पन्ना, पुष्फराज यातही खूप प्रकार असतात.
मुलाखतकार : आपण हे सर्व खडे खरे कि ,खोटे हे कशा प्रकारे तपासतात.
विक्रमजी राणावत: फिजिकल अफेअरन्स त्यानंतर स्पेसिफिक ग्रव्हिटी असते त्याचबरोबर प्रत्येक खड्याची स्वतंत्र गुरुत्वाकर्षण शक्ती असते त्याला स्पेसिफिक ग्रव्हिटी म्हणतात रिफ्रेक्टीव्ह इंडेक्स बघतो. त्यानंतर कळते की सदर स्टोन हा सिंथेटिक आहे का नॅँचरल आहे..
मुलाखतकार : तुमचा या डायमंडच्या क्षेत्रात येण्याचा उद्देश काय?
विक्रमजी राणावत : आपण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. खरंतर या क्षेत्रामध्ये अनेक लोकं हे फसवेगिरी करतात. लोकांना फसवतात. आणि कुठल्याही प्रकारचे खड़े अव्वाच्या सव्वा किंमती मध्ये विकत असतात. म्हणून लोकांसाठी इमाने-इतबारे काम करावे लोकांना चांगले मौलिक व त्यांना योग्य किंमतीत खड़े द्वावेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना खऱ्या खडया बद्दल काही एक माहिती नसते त्यांना फक्त चमकणारी वस्तू दिसते आणि ते विश्वासाने या लोकां कडून हे खडे घेत असतात.उदाहरणच द्यायचं म्हटलं तर पुखराज हा एक पिवळया रंगाचा खड़ा आहे. नार्मल सिटीजन खडा हा घेणाऱ्याला देऊन टाकतात. नॉर्मल खड्याची किंमत दोनशे रुपये आहे. तर पुखराजची किमत दोन हजार रुपये आहे. हे सर्व प्रकार थांबावेत असे मला वाटते.
मुलाखतकार : विक्रमजी ज्यांना हे पुष्कराज, पुखराज, नीलम वगैरे खडे हवे आहेत त्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे.
विक्रमजी राणावत : राजेंद्रजी आपण खूपच महत्वाचा आणि विश्वासाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे ,तर मी म्हणेन की, आपण असे काही खडे घेतांना त्या खड्याबरोबर एक सर्टिफिकेट दिले जाते. ते सर्टिफिकेट योग्य प्रकारे वाचा त्यामध्ये तो खडा कशाचा बनलेला आहे हे सर्व लिहिलेलं असतं परंतू आपण ते वाचत नाही ते वाचून आपल्याला लगेच समजेल की तो सिंथेटिक आहे का ? ओरिजिनल की,लॅब लिबरेशन आहे. तो नॅचरल बनलेला आहे का लॅब मध्ये बनलेला आहे हे सर्व त्यामध्ये मेंशन केलेलं असतं पण ते सामान्य माणसाला कळत नाही. इंडियन ट्रेड नेम, ट्रेंड व्हॅल्यु नेम,सिमोलंट शब्द वापरतात. पुष्कराज सारखा आहे पण पुष्कराज नाही असे अनेक शब्द प्रकार वापरल्या जातात.
मुलाखतकार : मग अशा खड़्यांचा काही उपयोग होतो का ?
विक्रमजी राणावत : होय ! होतो. परंतु तो फक्त काही कालावधी पुरताच असतो.
मुलाखतकार : राणावत फॅक्टरी टाकण्या मागचा आपला उद्देश काय ते सांगा.
विक्रमजी राणावत :आमचा उद्देश असा होता की हिऱ्या मध्ये जी फसवणूक चाललेली आहे हि.व्हि. एस, व्हि एस,एस आई, आय हे प्युअरिटीचे झाले. त्याच बरोबर कलर डी पासून सुरुवात होते डी, ई, एफ, जी , एच, आय, जे, के, एल, एम, डी , एच पर्यंत तुम्हाला सर्व हिरे हे व्हाईट दिसणार त्यानंतर त्याचा हळू पिवळेपणा दिसू लागणार क्ही व्ही एस डायमंड म्हणजे सुपर क्वालिटीचे त्यानंतर व्हेरी स्मॉल इन्क्लुजन स्मॉल इन्क्लुजन आणि इंक्लुजन असे प्रकार आहेत.
मुलाखतकार : तुम्ही फिल्ड कधी चेंज केली.
विक्रमजी राणावत :मी २०१२ साली फिल्ड चेंज करण्याचा निर्णय घेतला . मी २००२ साली जेमॉलॉजी चा अभ्यास करायला सुरुवात केली होती. ती नॉर्मल होती पण माझ्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने त्याला मूर्त स्वरूप आले. मी २००७ साली जेमॉलॉजी पूर्ण केले.यासाठी पुढील शिक्षण घेण्याकरता बँकॉकला गेलो माझ्या भावाला मी या विषयात ग्रेंज्यूएट केलं त्याला हॉँगकाँग ला पाठवले जेणेकरून ज्वेलरी व इतर डायमंडचे नेकलेस व विविध अलंकार कसे बनवावेत यासाठी सुद्धा आम्ही शिक्षण घेतले.
मुलाखतकार : डायमंडच्या व्यवसायात नव्याने येणाच्यासाठी आपण काय सांगाल.
विक्रमजी राणावत :या व्यवसायात येणाऱ्यांनी अगोदर या फिल्ड मधील सर्व क्लुप्त्या व डिग्री घेऊनच यावे, अगोदर थोडा फार अनुभव घ्यावा. या क्षेत्रात येणाऱ्यांनी जेमॉलॉजी केले पाहिजे. कारण त्यांना त्याच्यातलं ज्ञान असणे गरजेचे आहे.
मुलाखतकार : महाराष्ट्रात तुम्ही किती ठिकाणी डायमंड पोहोच करतात.
विक्रमजी राणावत :आम्ही पुणे, नाशिक, धुळे,नगर सह ऑल मोस्ट संपूर्ण महाराष्ट्भर आम्ही डायमंड ज्वेलरी पाठवत असतो.
मुलाखतकार: विक्रमजी याच प्रकारची अशी फेक्टरी ठाणे जिल्ह्यात आणखी कुठे आहे ?
विक्रमजी राणावत : ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव फक्त राणावत डायमंड फॅक्टरी डोंबिवली मध्ये आहे. आम्हाला डायमंडची फॅक्टरी इतरत्र टाकावी असे अनेक प्रपोजल आले होते परंतु बाबांचे डोंबिवलीवरजास्त प्रेम असल्याने आम्ही ही फॅक्टरी डॉंबिवली मध्येच सुरू केली.
मुलाखतकार : आपला संपूर्ण व्यवसाय डिस्ट्रीब्यूट कुठून होतो..
विक्रमजी राणावत : आमचा संपूर्ण माल हा मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर जवेरी बाजार, मुंबई येथील आमच्या मुख्य कार्यालयात जातो आणि तेथून मग तो संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केल्या जातो.
मुलाखतकार : विक्रमजी तुमच्याकडे बनवलेला अलंकार किंवा डायमंड यासाठी काही लोगो आहे का की जेणेकरून तो अलंकार तुमचाच आहे हे कळेल.
विक्रमजी राणावत : होय आमच्या प्रत्येक अलंकारावर RDF & RGJ असे दोन मार्क आहेत एक RGJ त्यावर हिऱ्याचे वजन व कॉलिटी प्युअरिटी यावर आमचा कोड नंबर असतो..
मुलाखतकार : जर कुणाला त्यांचा डायमंड किंवा अलंकार विकायचा असेल तर त्या साठी काय प्रोसिजर आहे.
विक्रमजी राणावत : इंटरनशनल ब्रांडची ज्वेलरी अम्ही देत असतो. आमच्या कडे जर कुणी डायमंड खरेदी केला असेल तर तो परत आमच्याकडे येऊन पुन्हा आम्हाला विकू शरकतो. आम्ही त्याची व्हॅल्यएशन काढून ते खरेदी सुद्धा करतो. इतकेच नव्हे तर ते आमच्या जवळून घेतला अलंकार दुसरीकडे ते कुठेही विकू शकतात. कुठलाही अलंकार /डायमंड ते आमच्या कडे आणून विकू शकतात ते आम्ही घेत असतो.
मुलाखतकार : डायमंड खरेदी नंतर त्याच्या कड़ील पेपर जर हरवले तर त्यासाठी काय सुविधा आहे का?
विक्रमजी राणावत : होय! त्यासाठी सुविधा आहे. त्यांच्या ज्वेलरी वर एक मार्किंग असते त्यावरून त्याची ऑनलाईन व्हेरीफिकेशन करता येते .
मुलाखतकार : विक्रमजी तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनर कडून या व्यवसाया साठी कशी मदत होते आणि आपण कुटुंबाला कसे वेळ देतात.
विक्रमजी राणावत : मला माझ्या पत्नीचा खूप सपोर्ट मिळतो. कुटुंबाचाही खूप सपोर्ट आहे. त्यामुळेच मी आज यशस्वी आहे या व्यवसायात तसा घरच्यांसाठी वेळ द्यायला कमी मिळतो.
मुलाखतकार : विक्रमजी तुमचं लव मँरेज आहे का अरेंज मेरेज व पत्नीचे नाव काय काय आहे ?
विक्रमजी राणावत : मी सुरुवाती पासूनच कामात व्यस्त असल्याने लव करण्यासाठी तसा वेळच मिळाला नाही माझं अरेंज मेरेज आहे.पत्नीचे नाव सेजल आहे. आम्हाला एक मुलगी असून तिचे नाव हीर आहे.
मुलाखतकार : विक्रमजी तुमच्या आई- वडिलांबद्दल सांगा.
विक्रमजी राणावत :माझ्या वडिलांची इच्छा नव्हती की, मी या डायमंडच्या व्यवसांयामध्य यावं परंतु माझ्या आईने मला स्पोर्ट केला व सुरुवातीला त्यांनी मला १५,०००/ - रुपये देऊन जयपूरला पाठवले होते. मला सांगताना विशेष आनंद होतोय की, आज माझ्या आईने दिलेला१५ ० ० ०/- रु.वरच माझा एवढा मोठा व्यवसाय भर भराटीला आलेला आहे. आजही माझ्या राणावत फेक्टरीची प्रोप्रायटॉशिप माझ्या आईच्या नावावर आहे. सुरुवातीला मी खूप कष्ट घेतले माझ्या फॅंक्टरीतील माल मी स्वतःहून विविध ठिकाणी घेऊन जात होतो. त्यांना दाखवत होतो आणि हे करत असताना मला खूप मेहनत करावी लागली. मी तीन वर्ष सुरुवातीला खूप कष्ट केले पण मला राणावत मेडिकल नावाचा खूपच फायदा झाला. नंतर मी जवेरी बाजार मुंबईत एक ऑफिस घेतले. मुंबईत सेंट्रेल, वेस्टन व हर्बल याठिकाणी आमचा माल जात असतो. मी सुरुवातीला दररोज शंभर ते दीडशे किलोमीटर माझ्या मोटर-सायकल वर फिरत होतो. माझ्या परिवारातील माझे भाऊ, जिजाजी, त्यांचे भाऊ यांना या व्यवसायात आणले व आमचा माल विविध ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य सुरू केले.
मुलाखतकार : तुम्हाला या क्षेत्रातील तुमच्या यशाबद्दल काय वाटतं.
विक्रमजी राणावत : मला हे सर्व बघून खूप चांगल वाटतं की, मी माझ्या राणावत या आड नावाचा ब्रँंड करु शकलो. मार्केटमध्ये एक स्वत:ची वेगळी इमेज निर्माण केली. विशेष म्हणजे माझ्या कुटुंबातील लोकांना मी या व्यवसायात आणले याचा मला खूप आनंद वाटतो.
मुलाखतकार : तुमचा सामाजिक उपक्रमात कसा सहभाग असतो
विक्रमजी राणावत: मला सोशल ऍक्टिव्हिटी करायला कॉलेजच्या जीवना पासूनच सवय आहे. आमची मेडिकल सोशल ऑर्गनायझेशन होती. त्या माध्यमातून आम्ही काम करत होतो. सोशल ऍक्टिव्हिटी करता आमच्या प्राध्यापकांची आम्हाला खूप मदत होत होती.
मुलाखतकार : तुम्ही आणखी कुठल्या ग्रुप सोबत कार्य करीत आह्त का ?
विक्रमजी राणावत :होय. मी बी एन आय कल्याण डोंबिवली चाप्टर मध्ये बीएनआय मेंबर आहे . या मधून मला अनेक चांगले मित्र व व्यवसायिक भेटले.
राणावत डायमंड फॅक्टरी ,डोंबिवली संपर्क : दीपक - ९८९ २०१ २३१०
मुलाखतकार : राजेंद्र वखरे -9619630035