Body of 15 year old girl found in bag नायगावमध्ये बॅगेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे कोडे उलगडले  सापडलेली तरुणी अंधेरीची 

CRIME BORDER | 28 August 2022 06:30 PM

पालघर :  नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या झाडी झुडपात एक मृतदेह एका बॅगेत भरून टाकण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी एक प्रवासी बॅग आढळून आली होती . दक्ष नागरिकाने याची पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन बॅगेची तपासणी केली. या बॅगेत चादरीमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह गुंडाळून टाकण्यात आला होता. तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. वालीव पोलीसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलीस त्याच्या कसून शोध घेत आहेत. 

वालीव पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून ती अंधेरी येथे राहणारी आहे. गुरूवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर अंधोरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता.मारेकरी ट्रेनमध्ये घेऊन आला मृतदेह प्रवासी बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपी लोकल ट्रेनमधून उतरून या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 

 

या प्रकरणी ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अल्पवयीन मुलीच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला करुन हा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे वालीव पोलीसांनी सांगितले. तिची ओळख पटली आहे.आम्ही आरोपीची ओळख पटवली असून लवकरच त्याला अटक करू अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे व.  पो.  निरी. कैलास बर्वे यांनी दिली.