अल-कायदाची दिल्ली मुंबईसह गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी

दिल्ली : भारतातील दिल्लीसह अनेक राज्यांवर हल्ला करण्याची अल-कायदाने धमकी दिली आहे. वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनेने हल्ल्याची धमकी देणारे निवेदन जारी केले आहे. पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार मारू, असे त्यात म्हटले आहे. पैगंबरांचा अपमान करणार्यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके जोडू. त्यांना कोणतीही माफी किंवा क्षमा मिळणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवणार नाही.
नवी दिल्ली : अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. अल कायदाने ६ जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात धमकी दिली आहे की ते दिल्ली ,गुजरात, यूपी, आणि मुंबई मध्ये आत्मघातकी हल्ले करण्यास तयार आहेत. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अल कायदाने ही धमकी दिली आहे.
"पैगंबरांच्या सन्मानासाठी लढण्यासाठी" दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करणार असल्याचे अल कायदाने म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही ठार करू, असे अल कायदाच्या पत्रात म्हटले आहे. आमच्या पैगंबरांचा अपमान करणार्यांना उडवण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या अंगावर स्फोटके बांधू... भगव्या दहशतवाद्यांना आता दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये त्यांच्या अंताची वाट पहावी लागेल. असाही त्यात इशारा दिला आहे. (etvbharat)