Dehradun Crime News  कुटुंबातील व्यक्तीने सख्खी आई ,पत्नी व तीन  मुलांची केली निर्घृण हत्या 

CRIME BORDER | 28 August 2022 08:30 PM


Warning: Undefined array key "type" in /home/crimebod/public_html/state_news_info.php on line 79

डेहराडून :एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या राणीपोखरी येथील नागघेर गावात पाच जणांची एकत्र हत्या झाल्याने खळबळ Ranipokhari massacre उडाली आहे. गावात शोकाकुल वातावरण आहे. उत्तराखंडमधील राणीपोखरी येथे असलेल्या नागघेर गावात भीषण क्रूर हत्याकांड घडले आहे. या ठिकाणी  आपल्याच कुटुंबातील पाच जणांची एका व्यक्तीने हत्या केली आहे. या निर्दयी व्यक्तीने आपली तीन मुले, पत्नी आणि आई यांची हत्या केली आहे. आरोपीला  पोलीसांनी अटक केली आहे. मारेकरी किती निर्दयी व क्रूर  असावा, याचा अंदाज यावरून लावता येतो. त्याने आपल्या तीन निष्पाप मुलांनाही सोडले नाही. सात जन्म सोबत ठेवण्याचे वचन देऊन त्याने लग्नात आणलेल्या जीवनसाथीचीही हत्या केली. एव्हढेच नव्हे तर जन्म देणाऱ्या आईलाही मारेकऱ्याने Five people killed in Dehradun district मारले.

 

गावात शोकाकुल वातावरण आहे. या व्यक्तीने एवढी भीषण हत्या का केली हे लोकांना समजू शकलेले नाही. पोलीसांनी हत्येतील आरोपीला अटक केली आहे. घर आणि अंगण रक्ताने माखले होते . तिथले दृष्य पाहून प्रत्येकाचा थरकाप उडाला.

 

सुदैवाने एका मुलीचा जीव वाचला या व्यक्तीला चार मुले होती. त्याने तीन मुलांची हत्या केली. ही मुलगी तिच्या मावशीकडे गेली होती. पाच जणांची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव महेश असल्याचे सांगण्यात येत आहे. महेश हा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील अररिया भागातील रहिवासी आहे. सध्या हा व्यक्ती राणीपोखरीच्या शांतीनगरमध्ये राहत होता. राणीपोखरी एसओ शिशुपाल राणा यांनी आरोपी महेशला घटनास्थळावरून अटक केली आहे.