CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

भाजपा चे पाचोऱ्यातील मध्यवर्ती कार्यालय हे जनसेवेचे केंद्र ठरेल- मंत्री गिरीश महाजन

CRIME BORDER | 27 December | 01:09 PM

Dr. Shashikant Kale

पाचोरा :- जनसेवा, राष्ट्रभक्ती आणि संघटनशक्तीचा नवा अध्याय ठरलेला शिवतीर्थ भाजपा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा नेत्या वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या, आजचा दिवस फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाचा नाही, तर भाजपाच्या विचारांचा पाया अधिक भक्कम करण्याचा दिवस आहे. हे कार्यालय जनतेसाठी खुले असून सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीच्या प्रवासाचा हा प्रारंभ आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत जर आपण संघटितपणे, समन्वयाने आणि ताकदीने लढलो, तर भाजपाचा विजय निश्चित आहे.” मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ वैशाली सुर्यवंशी यांच्या पुढाकारातून सुरू झालेले हे भाजपा मध्यवर्ती कार्यालय जनसेवेचे केंद्र ठरेल.

केंद्रात मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह देशात विकासाची घोडदौड सुरू आहे. आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करून भाजपाचा भगवा पुन्हा फडकवूया.” या सोहळ्याला जिल्हा सरचिटणीस अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,, उपाध्यक्ष सुभाष पाटील, दीपक माने, अनिल पाटील, विनोद नेरकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.साभार तरुण भारत