CRIME BORDER | 27 December | 01:09 PM
Dr. Shashikant Kale/Kalpesh Chaudhri
जळगाव : वाळू माफियांनी जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून वाळू वाहतुकीचे वाहन चालवण्यास मनाई न करता त्यावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजाराची लाच घेताना भुसावळ तहसील कार्यालया मधील तलाठी ,खाजगी पंटर व कोतवाल हे जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकल्याने लाच खोरांमध्ये खळबळ उडाली असून विविध चर्चांना ऊत आला आहे.
भुसावळला वाळू वाहतुकीचे वाहन चालू देण्यासह कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 73 हजाराची लाच मागण्यात आली होती. या लाच मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने जळगाव येथील एलसीबी कडे तक्रार नोंदवली होती सदर तक्रारीची गंभीर दखल घेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तहसील कार्यालया जवळ सापळा रचला त्या सापळ्यात भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी याच्यासह अन्य दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना सोमवारी रंगेहात पकडण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई जळगाव लाच नुकसान प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.