CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

अवैद्य गॅस सिलिंडर व रिफलिंग, जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

CRIME BORDER | 27 December | 01:09 PM

Dr.Shashikant Kale /Kalpesh Chaudhari

जळगाव : जळगाव जिल्ह्यात काही काही ठिकाणी घरगुती गॅस च्या सिलिंडर मधून ४ चाकी वाहने व रिक्षा यामध्ये गॅस भरण्याचे अवैद्य प्रकार सुरू असल्याची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने अर्थात एलसीबीने जळगाव शहरांमधील पिंप्राळा हुडको विभागात गॅस सिलिंडर व रिफलिंग असलेले साहित्य एका घरात ठेवले असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन सदर साहित्य असलेल्या घरावर एलसीबी पोलीसांनी कारवाई करत तेथून साहित्य जप्त केले या प्रकरणी शेख अरबाज शेख अब्बास याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीला पिंप्राळा हुडको परिसरामधील एका घरामध्ये अवैद्य गॅस रिफलिंग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तातडीने त्यांच्या पथकाला बोलावून कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पथकाने सापळा रचून सदर घरावर छापा मारला असता पथकाला त्या ठिकाणी एक सिलिंडर , मोटार वजन काटा, गॅस भरण्याची नळी असे एकूण 24 हजार रुपयांचे साहित्य प्राप्त झाले या संदर्भात पोलीस हवालदार प्रवीण भालेराव यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार शेख अरबाज शेख अब्बास त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास फौजदार सचिन रणशेवरे करीत आहेत.