CRIME BORDER | 27 December | 01:09 PM
Dr. Shashikant Kale /Kalpesh Chaudhri
जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात असून अशातच गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोम्बिंग ऑपरेशन जळगाव शहरात राबविण्यात आले. आज ९ गुरुवारी पहाटे ३ ते ६ वाजेपर्यंत जळगाव शहरात पोलिसांनी मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईत ८४ हून अधिक विविध गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहेया कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, काही संशयितांकडून धारदार शस्त्रे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागांना लक्ष्य करून ही मोहीम राबवण्यात आली.राबवलेल्या या अचानक कारवाईने हद्दपार गुंड आणि पाहिजे असलेले कुख्यात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले पकडलेल्या आरोपींना थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे सध्या त्यांची ओळख परेड आणि कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या झटपट कारवाईने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या कारवाईचे नियोजन केले. या कारवाईत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर ल, एमआयडीसीचे बबन आव्हाड, जिल्हापेठचे प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे आणि रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह प्रत्येक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस दलाने शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवून गुन्हेगारांना जरब बसवली आहे. भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत. sabhar जळगाव लाईव्ह न्यूज