CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

जळगाव पोलीसांच्या विशेष मोहिमेत १० गावठी कट्ट्यांसह २४ जीवंत काडतुसे जप्त

CRIME BORDER | 27 December | 01:09 PM

Dr. Shashikant Kale/ Kalpesh Chaudhri

जळगाव : जळगाव जिल्ह्यात पोलीसांकडून राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्रविरुद्ध विशेष मोहिमेमध्ये सात ठिकाणी छापे टाकून १० देशी बनावटीची पिस्तुलं व २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी १२ आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. यात पाचोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) याच्याकडून दोन कट्टे आणि १ काडतूस जप्त केले. त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

तसेच अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले (रा. अमळनेर) याच्याकडून २ कट्टे, चार काडतुसे, यावल येथील युवराज ऊर्फ युवा राजू भास्कर (रा. यावल) याच्यासह अन्य एका जणाकडून गावठी कट्टा, दोन काडतुसे, भुसावळ येथील अमर देवीसिंग कसोटे (रा. भुसावळ) याच्याकडून १ कट्टा आणि २ काडतुसे जप्त केली असून, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. वरणगाव येथील काविन बाबू भोसले (रा. हलखेडा) याच्याकडून गावठी कट्टा, दोन काडतुसे तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विठ्ठल वामन भोळे (रा. जळगाव, ह.मु. पुणे) याच्याकडून १ कट्टा आणि ४ काडतुसे जप्त केली असून, त्यांच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. साभार जळगाव लाईव्ह न्यूज