CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

डोंबिवलीकर भजन भवन - विठ्ठल मंदिर डोंबिवली पश्चिमेत नामस्मरण सोहळा संपन्न

CRIME BORDER | 14 January | 11:25 AM

डोंबिवली (क्राईम बॉर्डर टीम) :- राम कृष्ण हरी भजन मंडळ ,डोंबिवली आयोजित षटतिला एकादशी सोहळा दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी षटतिला एकादशी निमित्ताने आणि मकर संक्रांतीच्या शुभ दिनाचे औचित्य साधून नामस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी दुपारी साडेतीन वाजता श्री पांडुरंगाचे पूजन व दीप प्रज्वलन क्राईम बॉर्डर चे उपसंपादक व ह. भ .प . रमेश काठे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन ह.भ. प. हुनुमंत महाराज तावरे यांनी केले . 

सायंकाळी ४ ते ५ या वेळेत प्रसिद्ध ह. भ .प . गुरुवर्य बाबुलनाथ महाराज म्हात्रे, चिंचोली पाडा यांचे प्रवचन 

तर सायंकाळी ५ ते ७ वाजता भजन व हरिपाठ ,हम साथ साथ भजनी मंडळ, रिजन्सी, अनंतम, डोंबिवली पूर्व 

तर रात्री आठ ते दहा वाजता सुश्राव्य कीर्तन प्रसिद्ध ह. भ. प. नारायण महाराज सलते , 

रात्री दहा वाजता उपवास फराळ 

तर साडेदहा वाजता भजन व जागर, डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था,  प्रकाश चिलेबुवा, सतीश राणेबुवा , दिलीप धुरी बुवा ,संजय वासुदेव पवार बुवा यांचे भजन व जागर आयोजित करण्यात आले . 

यावेळी या कार्यक्रमात खालील  मंडळांनी सहभाग घेतला. त्यात 

हरी ओम भजन मंडळ डोंबिवली, (स. ९.४३, कल्याण ते सीएसएमटी )

श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, डोंबिवली ( रात्री ९.२८ सीएसएमटी ते बदलापूर) 

श्रीमद भगवत गीता भजन मंडळ कल्याण (स.८.३३ कल्याण ते सीएस एमटी) 

ओमकार भजन मंडळ कल्याण (स. ९.४७ कल्याण ते दादर) 

सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण ( स. ९.०२)

डोंबिवली प्रासादिक भजन मंडळ ( स.८.१४ डोंबिवली फास्ट) 

हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ (दिवा, डोंबिवली स. ९.०४ )

ओम साई भजन मंडळ डोंबिवली (रात्री ८.०४ सीएसएमटी ते टिटवाळा स्लो) ,

आवड हरिनामाचे भजन मंडळ ,दिवा (रात्री ८.४७ सीएसएमटी ते अंबरनाथ) 

श्री सिद्धिविनायक प्रा.भजन मंडळ डोंबिवली (स .८.१४ कल्याण ते सीएस एम हा श्रीटी 

श्री अष्टविनायक भजन मंडळ ,कल्याण (रा. ८.४४ सीएसएमटी ते कसारा) 

साईनाथ भजन मंडळ डोंबिवली ( स. ७.२९ स्लो) व इतर रेल्वे प्रवासी भजनी मंडळ 

या सर्वांसह भक्तगण व नागरिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे निमंत्रक होते राम कृष्ण हरी भजन मंडळ डोंबिवली