CRIME BORDER | 26 December | 12:52 PM
पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसचा ममता दीदींचा अभूतपूर्व विजयांत इंदिरा काँग्रेसला आणि कम्युनिष्टांना होणारा आनंद म्हणजे स्वतः वांझोटे असल्याचे दुःख नसून शेजाऱ्याला झालेल्या मुलाचा आनंदात सहभागी होण्यासारखाच प्रकार आहे.तर हरलो तरी नाक वर आणि पराभुत झालेल्या काँग्रेस व कम्युनिष्टांच्या प्रेतावरील टाळूवर पोळी शेकणाऱ्या व पंतप्रधान, गृहमंत्री अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यांनी ठाण मांडून एखाद्या राज्याचा निवडणुकीत भाग घेवून स्वतःच कोरोना काळाचे प्रोटोकॉल न पाळता लाखोंच्या जनसमुदाय एकत्रित करून आणि निवडणूक आयोग,लष्कर, प्रचंड फौजफाटा,अमाप धनसंपत्ती,प्रसार माध्यमांचा वापर करून आणि सि.बी.आय.चा वापर करून ममता बॅनर्जी को बीजेपी के बब्बर शेर सुभेंदू अधिकारीने नंदिग्राम सीटसे हराया,ममता भूल गई थी नंदिग्राम मे अंतमे राम आता है.असे वक्तव्य करणारे मात्र विसरतात की त्याच तृणमूल काँग्रेसमधूनच घरभेदीपणा करून फुटून आलेल्या बाटलेल्यांनाच कुंकू लावून पतिव्रतेचा आव आणून लढण्याचा हा युद्धप्रकार नौटंकी आणि धुर्तडाव असून अशाही युद्धात महाकाली रुपाने एक नारी सबपर भारी होऊन गड राखण्यात यशस्वी झाली म्हणून अपयशाचा स्वीकार न करता आम्ही 3 जागेवरून 77 जागांवर विजय प्राप्त केल्याचा टाळ्या वाजून शेकी मिरवण्याचा राजकारणी व्यक्तींच्या अगर राजकीय पक्षाचा आनंद आणि विश्लेषण हा प्रकार राजकीय मुत्सद्देगिरीचा नसून निर्लज्जपणाचा प्रकारातच मोडतो.
"बंगालमे 35 टक्के बटा नही 65 टक्के एकजूट हुआ नाही. (35 टक्के विभाजित झाले नाहीत आणि 65 टक्के संघटीत होऊ शकले नाही.)* अशा पद्धतीने धार्मिक विभागणीच्या निकषांवरच फुट पाडून आणि ममता बॅनर्जीच्या एका सीटचा पराभवाला मर्दानी स्वरूप देणाऱ्या लढाईचे यश अपयशाचे गणित मांडणारे एकूणच राजकारण आणि राजकारणी म्हटले म्हणजे राष्ट्रभक्ती नसून सत्तेसाठी काहीपण अशा पद्धतीने वेश्येलाही लाजवतील अशा प्रवृत्तीचा विचारांचा खेळाला देशभक्ती समजणेच मुर्खपणा राहील.
राष्ट्रीय दुष्टीकोनातून आसाम राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले हे एका अर्थाने सध्या स्थितीतील राष्ट्रीय दृष्टीने योग्य घडले.पांडेचेरी या केंद्रशासीत प्रदेशातील मिळवलेली सत्ता राजकीय बेरीज,वजाबाकीच्या मोजमापाच्या विशेषत्वाने बेरजेत बसणारे नाही.बंगाल आणि तामिळनाडू या मोठ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे तुलनेने भाजपचे असलेले नगण्य अस्तित्व तर 100 टक्के सुशिक्षित असलेल्या केरळ सारख्या राज्यात असलेल्या अंकुराचे रूपांतर सुद्धा प्रसारण न पावता आहे ते अस्तित्व सुद्धा संपले. यापूर्वी सुद्धा बिहार राज्यातील भागीदारी सुद्धा प्रादेशिक पक्षाच्या पायधरणीचाच आणि मुल्ये व तत्त्वे गुंडाळून मजबुरीनेच चालत असलेला संसार आहे.तर केवळ आणि केवळ अहंकाराच्या आणि स्वार्थी मनोवृत्तीचा व अन्य मित्र पक्षांचा खात्मा करण्याचा कुटील डाव खेळण्याचा नादात आपल्याच मित्रांपासून पारखा झालेल्या भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावलेली आहे,मात्र चुक मान्य करून सुधारण्याचा स्वभाव नसलेल्या अहंकारी वृत्तीने भाजपला सत्तेपासून वंचित रहावे लागलेले आहे.यालाच फाजील आत्मविश्वास म्हणतात.
भाजप म्हणजे हिंदूंचा पक्ष भाजपला मत म्हणजे हिंदुत्वाला मत आणि अन्य राजकीय पक्ष आणि अन्य राजकीय पक्षातील पुढारी, नेते म्हणजे हिंदू नाहीत ते राष्ट्रद्रोहीच आहेत असा प्रचार आणि विचारांची मानसिकता ही सुद्धा फार मोठी बनवाबनवी आणी फसवणुकीचाच मतलबीपणा आहे.अखंड भारताला आणि हिंदू धर्माला विभाजित करण्याचाच हा प्रकार असून सर्व पक्षीय पुढाऱ्यांना धर्म आणि राष्ट्रप्रेमाने बांधून ठेवता येईल असा आपला व्यवहार आणि विचार जन्माला घालून तो जोपासण्याची आवश्यकता आहे.वास्तविक असा विचार कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या ह्रदयात होता मात्र आता तो अटलजी प्रमाणेच कालबाह्य झालेला दिसत आहे.राष्ट्रीय प्रश्नांसाठी अगर कोरोना सारख्या जागतिक रोगाच्या परीस्थीती मध्ये राष्ट्रीय नितीने सर्वांना एकत्रित घेऊन राष्ट्रीय निती बनवून सर्वांनी मिळून सामना करण्याऐवजी एकमेकांना आरोप,प्रत्यारोप करून बदनाम करण्याचे अगर सत्ताप्राप्तीसाठीच श्रेयवादाचे राजकारण करण्याची दुष्ट प्रवृत्तीमुळेच वाढता द्वेष,हिंसाचाराला जन्म देत असून असा राजकीय स्वार्थच देशभरातील सर्व प्रकारच्या अन्याय,अत्याचार,शोषण,काळाबाजार आणि छळवादाचा जन्मदाता असून कोणालाही आपली जबाबदारी आणि कर्तव्य कळत नसल्याने शेमडी पोरं सुद्धा आता पुढाऱ्यांचे, नेत्यांचे सल्लागार झालेले व पुढारी त्यांचा सल्ला ऐकतांना दिसत आहे.
रतनजी टाटा पारशी आहेत म्हणून देशासाठी त्यांच्या सर्वस्वाच्या आर्थिक त्यागाची भुमिका दुर्लक्षित केली जाणार काय?अजिज प्रेमजी मुसलमान असल्याने त्यांच्या दातृत्वाची कोठेच दखल घेतली जाणार नाही काय? आणि अंबानी व अदाणी हिंदु आहे म्हणून त्यांचे हातात देशाच्या अर्थचक्र चालवण्याचा समृद्धी रथाचे सारथी म्हणून गौरवले जाणार याचाही हिंदू विचाराने भारावलेल्यांनी संयमाने विचार केला पाहिजे.हिंदु व्यतिरीक्त अन्य धर्मियांनी सुद्धा धर्माच्या पलीकडे जावून राष्ट्रहीत जोपासतांना धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नजरेने बघितल्या पाहिजेत.
काश्मीरची स्वायत्तता नष्ट करून त्याला भारतात एकसंघपणे ठेवण्यासाठी राष्ट्रहित जोपासणाऱ्या आणि माणसातला राम जिवंत रहावा म्हणून राममंदीराचा तिढा सोडवून राममंदीर निर्माण करणाऱ्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी आता गावागावांतील माणूस माणुसकीने जिवंत राहून जीवन जगू शकेल, भेदाभेद आणि लुटालूट व शोषण,अन्याय,अत्याचार होणार नाही पुढाऱ्यांचा आणि जनसामान्यांचा व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अधिकाराचा वेगळा दर्जा असू शकेल मात्र माणुसकीचा दर्जा एक समान रहावा यासाठीची आमची नीती आणि धोरणे असावी.देशातील सर्व आमदार,खासदार, लोकप्रतिनिधी यांचे पगार,भत्ते,मानधन संपवून सेवेचे मुल्य नसावे आणि कालबद्ध न्यायप्रक्रिया व्हावी असे रामराज्य निर्मितीच्या स्वप्नासाठीच देशवासीयांचे तन-मन-धन असावे तरच आम्ही हिंदुस्तानातील हिंदु म्हणून गौरविण्याचा आनंद होऊ शकेल.जोपावेतो असे होत नाही तोपावेतो आम्ही डुप्लिकेट भोंदू,साधूचा रूपातील *"रावण"* म्हणूनच संबोधले जाणार हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
भाजपच्या देशभरातील आमदार-खासदार यांनी आता महाराष्ट्रातील हिंगोली सारख्या मागास भागातील श्री.संतोष बांगर सारख्या आमदाराचा आदर्श घ्यावा असा आदेश आणि उपदेश करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.आमदार संतोष बांगर यांनी स्वतःची 90 लाखाची बँक डिपॉझिट मोडून लोकांच्या इंजेक्शन्स व उपचारासाठी वापरली तर नगरसारख्या ओसाड भागातला पत्र्याच्या घरात राहणारा निलेश लंके सारखा दरिद्री नारायण असलेला आमदार लोकांच्या पाठिंब्याने 1100 बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारतो आणि स्वतः तेथे अहोरात्र राबून आपल्या लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपडतो.हे पाहून आम्ही प्रगत भागातल्या लोकांनी वर्षानुवर्षे पोसलेले धनदांडगे पुढारी किती कामाचे आहेत?आणि नेमके कसल्या कामाचे आहेत?याची प्रचिती आम्हाला कोरोनाने दिली. लाखोंच्या गाड्या फिरवणारे व निवडणुकीत करोडो रुपये खर्च करणारे भाजपचे खासदार,आमदार सत्तेमुळे सुस्तावलेले पुढारी हे निव्वळ घरबसे ठरले आहेत.जसा कंसाला मारण्यासाठी कृष्णाला,रावणाला मारण्यासाठी रामाला, दुर्योधनाला मारण्यासाठी अर्जुनाला,हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंहाला जन्म घ्यावा लागला.तसेच जनतेला जनतेच्या खऱ्या हिताचे पुढारी आणि माणसातली माणुसकी कळायला कोरोनाला यावं लागलं असेच म्हणावे लागेल. कोरोनाचा हैदोस आणि जनतेचा आक्रोश देशभर सुरू असताना पुढारी नुसते भोंग्याचा गाड्यांचा पोलिस ताफा घेऊन गावागावात जाऊन नुसता लॉकडाउन कसा चाललाय याची पाहणी करण्याची नौटंकी करत आहेत.काय दुर्दैव आहे आमचं! विकासाची दोन-चार रस्त्यांची,समाज मंदीराची कामे सुद्धा टक्केवारी वसूल करूनच केलेल्या पुढार्यांची माणुसकी आणि लायकी कोरोनाने उघडी पाडलेली आहे.गावातील आणि शहरातील रस्ते व गल्ली निर्जंतुकीकरण करू न शकणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढारी आणि अधिकाऱ्यांनी या काळात जनतेचा छळवाद करून केवळ हुकूम गाजवलेले आहेत,यामुळेच भविष्यातील माणूस नावाची जमात माणुसकीहीन होण्याच्या परीस्थितीला सत्ताधारी नेते व सरकारच जबाबदार ठरणार असल्याने जनतेला धर्माची गोळी पचेल की नाही आणि राष्ट्रप्रेमाची किंकाळी ऐकू येईल की नाही हे सांगणे कठीण आहे.जनता आता सांगणार आहे ज्यावेळी देशात युद्धजन्य परीस्थिती अगर राष्ट्रीय संकटे निर्माण झालीच तर त्यावेळी रक्ताची आणि आर्थिक रकमेची आवश्यकता पडली तर सर्वात प्रथम देशभरातील सर्व आमदार,खासदार, स्थानिक सर्व पक्षीय पुढारी, नगरसेवक आणि देशभरातील सर्व क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या शरीरातील रक्त एकाच दिवसात प्रथम गोळा करा,त्यांच्याचकडून लाखांच्या पटीने आर्थिक मदत घ्या.त्यांच्या मदतीनंतरच जनतेला आवाहन करा त्याशिवाय धर्म आणि राष्ट्र अगर युद्धाचे समयी तन-मन-धन पुर्वक समर्पणाच्या भावनेची शिकवण आता जनता समजून घेणार नाही,म्हणून वेळीच राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी,शासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच भानावर येणे गरजेचे असून आवश्यक आहे,असे मनापासून सांगावेसे वाटते.तसेच विरोधकांना देशद्रोही आणि राष्ट्रद्रोही संबोधूनच "दीदी ओ दीदी" अगर "पप्पू" म्हणून खिल्ली उडविण्याचा जिव्हारी प्रकार व प्रचार तसेच भारत देश धर्मशाळा नाही म्हणून घुसखोरांना रोखणे व त्यांना शोधून देशा बाहेर काढण्यासाठीचा एन आर सी कायद्याची राष्ट्रीय गरज, आवश्यकता आणि काळानुरूप महत्त्व असल्याने त्या कायद्याचा मी पुर्णपणे समर्थक आहे तसेच मी रामभक्त सुद्धा आहे तरीसुद्धा राजकारणाच्या निवडणूक प्रचारात जय श्रीराम चा नारा देऊन हेतुपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न ज्याला रामाची आरती म्हणता येत नाही अगर जो दररोज मंदीरात जात नाही त्यांनी धर्माची गल्लत करावी हे संयमी आणि समंजसपणाचे राजकारण नाही.बंगालच्या निवडणुकीत 36 मुस्लिम आमदार निवडून आले म्हणून टाहो फोडण्याची सुद्धा आवश्यकता आणि गरज नाही.250 चे पुढे हिंदू आमदार आहेत ना.काय ते हिंदूंचे रक्षक अगर रामाचे पुजक नाहीत?अगर मुस्लिमांनी निवडणूक लढवूच नये,निवडून येऊच नये अशी आपली भुमिका असावी काय? बंगालला अगर आसाम,केरळ या राज्यांना घुसखोरांचा धोका असला तरी त्याला काश्मीर संबोधता येणार नाही. गृहयुद्ध रोखण्यासाठी पोरकटपणाचे,द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे. सबका साथ सबका विकास आणि विश्वास हा मुलमंत्र विसरून शेकडो दिवसांपासून चाललेल्या शेतकरी आंदोलनाकडे अहंकारी वृत्तीने दुर्लक्ष करून,रेल्वेपासून विमानतळे विकून खाजगीकरणाद्वारे अंबानी,आदानी यांच्या हातात देश विकून फुकटची फौजदारी करण्यासाठी हिटलर शाहीचा वापर जनता जास्त काळ सहन करणार नाही.म्हणूनच संयमी नेतृत्वाचे आणि कृतीशील व माणुसकीयुक्त विकासाचे संपर्क अभियान भाजपच्या शिर्षस्त नेत्यांनी तळागाळा पावेतो राबवून सर्वांना बरोबर घेऊनच करण्यासाठी जागृत होण्याची वेळ अजूनही गेलेली नाही.
हिंदू धर्म हा पौराणिक धर्म असून वैचारीक सिद्धांताचा आणि मानवतावादी संस्कृतीचा दया,दान,क्षमा बाळगणारा धर्म असल्याचे प्रतिपादन करणाऱ्या नेत्यांनी वर्तमान काळातील अतिउत्साहाच्या भरात धर्म आणि मंदीराचे नावाखाली आक्रमकपणे आपल्याच बांधवांचे राजकीय बळी घेऊ नये यासाठी विशेष प्राणायाम करणारे संस्कार शिबिर वेळीच घेण्याची गरजही आहे.माजी खासदार म्हणून मिळणारी 75 हजार रुपयांची पेन्शन,सरकारी मानधन नाकारून, आयुष्यभर इकॉनोमी क्लासमधून प्रवास करणाऱ्या व प्रवास भत्ताही न घेता स्वतःचे वाहन वापरणाऱ्या साध्या राहणीच्या ममता बॅनर्जींच्या आदर्श भाजप खासदार आमदारांनी घेतला तरी ते धन्यवादास पात्र ठरतील असे खेदाने सांगावेसे वाटते.
लक्ष्मण हिरालाल कदम, शहादा.- 9422787500