CRIME BORDER | 26 December | 01:48 PM
ठाणे : सर्व जग कोरोनाच्या संकटाशी सामना करतोय . सर्व सण घरातच साजरे होत आहेत. पण रायता तालुका कल्याण येथे गेल्या काही वर्षांपासून राहत असलेले रशीद शेख व सलीमाबी शेख या कुटुंबाने अनोखी ईद साजरी केली.याठिकाणी अंध व अपंग अशा निर्मला व धुरपता जाधव दोन्ही बहिणी राहतात.हे यांच्या घरी जाऊन रशीद शेख व सलीमाबी शेख यांनी त्यांना घरात लागणारे रेशन सामन ईद मध्ये लागते तेच सामन ईद मुबारक म्हणून सप्रेम भेट देऊन त्यांनी ईद साजरी केली.
ह्या दोन्ही बहिणीनां जन्मताच डोळ्याने दिसत नाही . प्रत्येक वर्षी आपण आपल्या परिवारासह ईद साजरी करतो.पण ह्या वर्षी आपण या दोन बहिणी च्या घरी जाऊन ईद साजरी करू असा निर्णय त्यांनी घेतला व शेख परिवार त्या दोघी बहिणीच्यां घरी गेले.या दोन्ही अंध बहिणीवर काही दिवसापासून उपासमारीचे संकट कोसळले होते .गेल्या १६ वर्षांपासून रशीद शेख हे संपादक राजेंद वखरे यांच्या सोबत सामाजिक कार्यात सहभागी आहेत.तसेच ते रोड रोलर चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.