CRIME BORDER | 26 December | 04:24 PM
वैयक्तिक माहिती - पुसारला वेंकटा सिंधू-भारतीय बॅडमिंटनपटू-जन्म नाव पुसारला वेंकटा सिंधू जन्म दिनांक ५ जुलै, १९९५ (वय: २५) जन्म स्थळ हैदराबाद, भारत, उंची १.७९ मी (५ फूट १० इंच), वजन ६५ किलो (१४० पौंड), पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले.
सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली.देश भारत कार्यकाळ २००८ पासून हात उजवा प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद महिला एकेरी सर्वोत्तम मानांकन पुरस्कार:अर्जुन पुरस्कार (२०१३) पद्मश्री (२०१५) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१६) पद्मभूषण पुरस्कार (२०२०)