CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

आरटीई अंतर्गत पहिल्या टप्यातील प्रवेशासाठी ०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

CRIME BORDER | 26 December | 04:36 PM

जि.प. ठाणे, दि. ०१- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दि.०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

पहिल्या टप्यात निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही त्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पडताळणी समितीस भेट देऊन कागदपत्रे तपासून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.