CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

क्राईम बॉर्डरचे पत्रकार फकीरबा नेव्हार यांचा सत्कार

CRIME BORDER | 26 December | 04:51 PM

डोंबिवली : क्राईम बॉर्डर चे पत्रकार फकीरबा नेव्हार हे गेल्या आठ वर्षापासून क्राईम बॉर्डर परिवारामध्ये मेंबर ,प्रतिनिधी, तालुका ,जिल्हा, विभाग पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे व व्यवस्थापक संपादिका सौ . सीमा वखरे यांनी त्यांची नुकतीच मानसेवी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर नियुक्ती केली.सदर नियुक्तीने त्यांच्या आप्त स्वकीय व मित्र परिवारामध्ये आनंद व्यक्त होत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून ते राहत असलेल्या डोंबिवली पश्चिम येथील कस्तुरी ग्राम सोसायटी मधील सर्व सोसायटी चे पदाधिकारी व रहिवाशांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. निमित्त होते त्यांचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर नियुक्तीचे.सदर सोसायटीचे अध्यक्ष सेक्रेटरी, खजिनदार व पदाधिकारी आणि रहिवाशांना जेव्हा नेव्हार यांच्या नियुक्तीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला.‌फकीरबा नेव्हार हे सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यात कार्यरत असून ते एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे त्यांची डोंबिवली व परिसरामध्ये मोठी ओळख आहे.

कस्तुरी ग्राम सोसायटी चे अध्यक्ष सिताराम पाटील व सचिव रवींद्र हरेर यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम सरकुंडे व सचिव रवींद्र हरेर यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमाच्या वेळी मिलिंद शिंदे , अनिल उत्तेकर, क्राईम बॉर्डर चे माजी पत्रकार रमेश कदम, वामन पवार , पाटोळे, ईश्वर पाटील , थॉमस फर्नांडिस, जयवंत दळवी ,आंचन, नेवले व आदी उपस्थित होते.