CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जळगावच्या तरुणाचा कंडारीत खून ; मारेकरी पोलीसांच्या जाळ्यात

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:02 PM

जळगावच्या तरुणाचा कंडारीत खून ;  मारेकरी पोलीसांच्या जाळ्यात

 

Dr.Shashikant Kale


जळगाव :  भुसावळच्या कंडारीत किरकोळ वादातून जितेंद्र राजेंद्र साळुंखे वय वर्षे ४०, राहणार गेंदालाल मिल , जळगाव) या तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली .  या प्रकरणातील आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या आहे .


राजू उर्फ बाबू  सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव) आणि मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) असं अटक करण्यात आलेल्या दोघं संशयित आरोपींचे नाव असून प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते/कळते .जळगाव सिटीतील  गेंदालाल मिल परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेला जितेंद्र साळुंखे हा जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व इतर दोघांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर चौघांमध्ये वाद सुरू झाले. वादातून हाणामारी झाली. यानंतर जितेंद्र याला इतर तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जागीच संपवले.


घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले की खुनातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन प्रकरण उघडकीस आणावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने रात्रभर प्रयत्न करून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. प्राथमिक चौकशीत दोघा आरोपींची गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. साभार जळगाव लाईव्ह न्यूज