CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कडोंमपा परिसरात सुका कचरा संकलन मोहीम

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली ( क्राईम बॉर्डर ) : मा. डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगर पालिका व सिध्दी वेस्टटूग्रीन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्वच्छ डोंबिवली अभियान, दक्ष,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सौदामिनी,बि.के.बिर्ला महाविद्यालय,कमला महाविद्यालय, पर्यावरण दक्षता मंडळ,ऊर्जा फाउंडेशन,संस्कार संस्था,मनुसृष्टी,सहयोग सामाजिक संस्था,महिला बचत गट इ. यांच्या विशेष सहकार्याने आपल्या भागातील दर महिन्यात खालील दिवशी सुका कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

पहिला रविवार - ई-कचरा (E -Waste)

दुसरा रविवार - सर्व जुने व टाकाऊ कपडे ,गाद्या ,रेग्झिन बॅग्स इ.

तिसरा रविवार - काच आणि कागद

चौथा रविवार - चप्पल, बूट,फर्निचर इ.

तसेच या सर्व रविवारी स्वतंत्रपणे प्लास्टिक संकलन सुध्दा करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.तरी आपणास विनंती आहे की आपल्याकडील सर्व ई-कचरा (E -Waste), जुने व टाकाऊ कपडे,गाद्या ,रेग्झिन बॅग,काच, कागद,चप्पल ,बूट आणि फर्निचर खाली नमूद केलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळेत जमा करावेत जेणेकरुन काम पद्धतशीर व लवकर केले जाईल.आपल्या मदतीशिवाय कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ होणे अशक्य आहे.आपले अमूल्य सहकार्य आम्हास करा आणि हा संदेश सर्व नागरिकांना पोहचवून स्वच्छ आणि सुंदर कल्याण-डोंबिवलीचे स्वप्न लवकरच साकार करू.

नोट - सर्व प्रकारचा सुका कचरा व्यवस्थितपणे वर्गीकरण करून दिल्यास प्रत्येक रविवारी स्विकारला जाईल.

वेळ : सकाळी १० ते दुपारी १२

संकलन केंद्रे 1) लोकग्राम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन लिमिटेड, (कल्याण पूर्व ) लोकेशन https://goo.gl/maps/8VWvPfYePWNuaMvm7 ,

2) दि कल्याण जनता सहकारी बँके जवळ,दुर्गा माता मंदिर रोड (कल्याण पूर्व) लोकेशन : https://maps.app.goo.gl/6zFMqBasLXNPVfDa6,

3) 'ड ' प्रभाग क्षेत्र कार्यालय (कल्याण पूर्व ) लोकेशन : https://maps.app.goo.gl/py3s3jRLXPKseDbc9,

4) 'ब ' प्रभाग क्षेत्र कार्यालय ,सिने मॅक्स जवळ (कल्याण पश्चिम) लोकेशन : https://maps.app.goo.gl/7XVPVaAYQtL2oVNV6,

5) आचार्य अत्रे रंगमंदिर ,सुभाष मैदानाजवळ (कल्याण पश्चिम) लोकेशन : https://maps.app.goo.gl/Us8B3dVieXxTJnxV6 ,

6) फडके मैदान आधारवाडी (कल्याण पश्चिम) लोकेशन : https://maps.app.goo.gl/4XSDXsweZ9Sepbtv9 ,

7) रामबाग, एच डी एफ सी बँकेजवळ (कल्याण पश्चिम) लोकेशन : https://goo.gl/maps/pQpwFb7N1SoSwXhj7,

8) राणी लक्ष्मीबाई उद्यान,आयुक्त बंगल्या शेजारी,सिंडीकेट (कल्याण पश्चिम) लोकेशन : https://g.co/kgs/JAtRQt,

9) महानगरपालिका कार्यालय,इंदिरा चौक, (डोंबिवली पूर्व) लोकेशन https://maps.app.goo.gl/DmhBDxQ8j7g29ffJ9,

10) MIDC, गणेश मंदिर, (डोंबिवली पूर्व) लोकेशन : https://maps.app.goo.gl/EWqPBwmJLY7frM2WA,

11) सुनील नगर रिक्षा स्टँड (डोंबिवली पूर्व) लोकेशन : https://maps.app.goo.gl/ZzRbtdcxVQ7xXoic9,

12) गांधीनगर (डोंबिवली पूर्व) लोकेशन : https://maps.app.goo.gl/sRHe6qezukC3bf8k7 ,

13) भागशाळा मैदान, पाणपोई जवळ, गेट नंबर ३ (डोंबिवली पश्चिम), लोकेशन : https://maps.app.goo.gl/ysQsQQds7kicodVY9,

14) प्रल्हाद शिंदे मैदान (डोंबिवली पश्चिम)लोकेशन : https://maps.app.goo.gl/hJ3B5LbZ1mW53faW9 ,

15) पी.बी.भावे नाट्यगृह (डोंबिवली पश्चिम) लोकेशन : https://maps.app.goo.gl/aTxSNZuFS88yZC1a6,

16) एच वार्ड ऑफिस (डोंबिवली पश्चिम) लोकेशन : https://maps.app.goo.gl/zwSViyMRRaicSvm9A,

17) म्हसोबा चौक,ओपन जिम,इलेक्ट्रिक टॉवरच्या खाली ९० फिट रोड, ठाकुर्ली लोकेशन : https://maps.app.goo.gl/BPNHM6RWpy7hdsC97

संपर्क :1) रामदास कोकरे (क.डों.म.पा. उप- आयुक्त घन कचरा व्यवस्थापन) : ९८२३२२९०३३ , 2) मिलिंद गायकवाड (क.डों.म.पा. प्रकल्प उप अभियंता) : ८०९७९४२२६५, ८८७९५२७०४५ , 3) दिगंबर भोसले (सिध्दी वेस्टटूग्रीन लिमिटेड) : ९८३३७००१००, ७०२१४८३०६४ , 4) संतोष सोनवणे (सिध्दी वेस्टटूग्रीन लिमिटेड) : ९३२२८११५७४