CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ओला'टॅक्सी चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या,आरोपी फरार

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर-न्यूज नेटवर्क) : एका ओला टॅक्सी चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पूलाखाली घडली आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. प्रभाकर गंजी(वय:४३)रा.कन्हेरी,भिवंडी असे हत्या झालेल्या ओला टॅक्सी चालकाचे नाव आहे.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने'ओला टॅक्सी'वर चालक : मृतक टॅक्सी ड्रायव्हर प्रभाकर हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता.मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटूंबाच्या उपजिवेकीसाठी ओला कारवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून कार चालक म्हणून कार्यरत होता.त्यातच ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मृतक प्रभाकरची कार मुबंई-नाशिक मार्गावरील माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती.बराच वेळ झाला कारमध्ये चालक ड्रायव्हर सीटवरच जागचा हलला नसल्याने काही स्थानिक नागरिकांना त्याचा संशय आला.त्यामुळे पुलावर तैनात असलेल्या वाहतूक पोलीसांना घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्याने पोलीसांनी कारजवळ जाऊन पहिले तर प्रभाकर मृत अवस्थेत दिसला. त्यांनतर स्थानिक नारपोली पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रभाकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी'स्वर्गीय इंदिरा गांधी'उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

हत्येचे कारण मारेकरी पकडल्यानंतर येणार समोर : मृतकच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा अज्ञात मारेकऱ्याविरोधात दाखल केला गेला आहे.आता पोलीसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली असून मारेकरी पकडल्यानंतर प्रभाकरच्या हत्येचे कारण समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश वाघमारे व त्यांचे गुन्हा प्रकटीकरण शोध पथक करीत आहेत असे नारपोली पोलीसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.