CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाकुर्ली येथील अतिधोकादायक असलेली इमारत जमीनदोस्त

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

CRIME BORDER

डोंबिवली (- अविनाश वाकचौरे ) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र अंतर्गत ठाकुर्ली पोलीस चौकी समोरील ठाकुर्ली स्टेशन रोडवरील शिवकृपा नावाची ही इमारत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षा पूर्वीची जुनी असून ही सध्या अतिधोकादायक झाली होती. सदर इमारतीस कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडुन गेल्या सहा वर्षांपासून नोटीसही देण्यात येत होती अखेर ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे महानगरपालिकेने कारवाई करत ती जमीनदोस्त केली सदर वेळेस नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठाकुर्ली म्हसोबा नगर ते ठाकुर्ली स्टेशन हा रस्ता ही रहदारीसाठी बंद करण्यात आला होता सदर वेळेस या ठिकाणी महानगरपालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील,तसेच महानगरपालिका कर्मचारी, डोंबिवली वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश्री शिंदे,वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी या आधीही ठाकुर्ली तसेच डोंबिवली परिसरातील अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करून त्या जमीनदोस्त केल्या व यापुढेही ते अशाच अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करतील असे समजले.