CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
लोणावळा (चित्रा कामत) : जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार हे आपला जीव धोक्यात घालून दिवसभराच्या घडामोडी कव्हर करत आहेत.राज्यात ५४ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे व हि संख्या वाढतच आहे.पत्रकारांच्या सुरक्षे बाबत आजपर्यंत कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही.पण रोटरी क्लब ऑफ लोणावळा व क्लब महिंद्रा यांनी याची दखल घेऊन लोणावळा शहर पत्रकार संघाला व लोणावळ्यातील सर्व पत्रकारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. यात मास्क,सेनेटायजर, हॅन्ड ग्लोज व फेस शिल्ड ईत्यादी सेफ्टी कीटचे साहित्य करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय पाटील ,रोटरियन धनंजय साखरेकर ,रोटरियन रवींद्र कुलकर्णी ,रोटरियन आशिष मेहता ,रोटरियन दिलीप पवार , क्लब महिंद्रा चे एच. आर. मिस्टर अहमद व मिस्टर सतीश ईत्यादी उपस्थित होते.पत्रकारांना केलेल्या सहकार्याबद्दल लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड.संजय पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.