CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कल्याण येथील जरीमरी तिसाई मंदिर समाज हॉलमध्ये ३५० नागरिकांनी घेतला कोवीड लसीचा डोस

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कल्याण (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने जरीमरी येथील तिसाई मंदिर,समाज हॉल मध्ये स्थानिक लोकांसाठी कोवीड व्हॅक्सिन कॅम्प लावण्यात आला होता.या लसीकरण केंद्रांमध्ये एकूण साडेतीनशे लोकांनी याचा लाभ घेतला.याठिकाणी स्थानिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी विनंती मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.त्याची दखल घेऊन दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी हेल्थ केअर च्या कर्मचाऱ्यांनी रितसर टोकन वाटले.नंतर लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.

या केंद्रावर शिस्तबद्ध लसीकरण झाले.ज्यांना टोकन देण्यात आले होते ते टोकन येथील कर्मचारी घेऊन ते फाडून त्यांच्याजवळ ठेवत होते व नंतर त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेत होते,त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनधिकृत व अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती‌,तसेच ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत न ठेवता त्यांना प्राधान्याने लसीकरण देण्यात आले.

स्थानिक नागरिक व लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी माजी नगरसेवक अनंता गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते /स्वयंसेवक उपस्थित होते.ते येणार्‍यांना रांगेत उभे करणे,टोकण प्रमाणे आत सोडणे तसेच लस दिल्यानंतर पंधरा मिनिटं ऑब्झर्वेशन मध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवणे अशी कामं त्यांनी केली.

मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाचे व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले असून यापुढेही असेच सहकार्य करावे असे त्यांनी म्हटले आहे.

माजी नगरसेवक अनंता गायकवाड हे त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी सतत धडपडत असतात जेव्हापासून कोवीड लसीचे केंद्र सुरू झाले आहे ‌तेव्हापासून ते स्वतः केंद्रावर हजर राहून नागरिकांना व केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करत असतात असे येथील उपस्थित नागरिकांनी सांगितले.